वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०१ पृ. ८
  • करमणुकीला योग्य जागी ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • करमणुकीला योग्य जागी ठेवा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • फावला वेळ
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • वेळेचा सदुपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • जगाच्या आत्म्यामुळे तुम्हाला विषबाधा होत आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ८/०१ पृ. ८

करमणुकीला योग्य जागी ठेवा

१ या शेवटल्या दिवसांत, आपल्या सर्वांनाच वेळोवेळी थोडासा बदल हवा असतो. विशिष्ट काळापुरते मनोरंजन उचित आहे. परंतु, आपला अधिक वेळ करमणूक, मनोरंजन यात आणि मित्रांसोबत घालवल्याने आध्यात्मिक कार्यांत आपण मागू पडू शकतो. तेव्हा, करमणुकीला योग्य जागी ठेवले पाहिजे. (मत्त. ५:३) हे कसे शक्य आहे? इफिसकर ५:१५-१७ मधील सल्ल्याचे अनुकरण केल्याने हे शक्य होईल.

२ मर्यादा ठेवा: ख्रिस्ती लोक किती सुज्ञपणे आपले जीवन व्यतित करत आहेत याविषयी त्यांनी “जपून” राहावे असे पौलाने लिहिले. खरोखर आवश्‍यक तितका आराम करण्यात वेळ घालवण्यासाठी मर्यादा आणि संयम यांची गरज आहे. आपण आपला मोकळा वेळ कोणत्या प्रकारे घालवतो यावर गंभीरपणे विचार करणे उचित आहे. आपण मनोरंजन करतो तेव्हा त्यातून आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे; पुष्कळ वेळ वाया गेला किंवा थकून गेलो असे आपल्याला वाटता कामा नये. एखाद्या कार्यात भाग घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारची पोकळी जाणवत असेल, समाधान मिळाले नसेल, अपराध्यासारखे वाटत असेल तर यावरून हेच सूचित होते, की आपण ज्याप्रकारे आपला वेळ घालवतो त्यात काही फेरबदल करण्याची आवश्‍यकता आहे.

३ समजदारी दाखवा: आपण “मुर्खासारखे होऊ” नये तर जीवनातील अधिक महत्त्वाच्या गोष्टींकरता “वेळेचा सदुपयोग” केला पाहिजे, असा पौलाने सल्ला दिला. समर्पित ख्रिस्ती, करमणुकीवरच आपले जीवन केंद्रित करू शकत नाहीत. आराम व थोडासा बदल आपल्याला तरतरी आणत असला तरी, देवाची कार्यकारी शक्‍ती आध्यात्मिक शक्‍तीचा खरा स्रोत आहे. (यश. ४०:२९-३१) मनोरंजनातून नव्हे तर ईश्‍वरशासित कार्यांतून जसे की बायबलचा अभ्यास करताना, मंडळीच्या सभांना उपस्थित राहताना, क्षेत्र सेवेत भाग घेताना आपल्याला त्याचा आत्मा मिळतो.

४ कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरवा: “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या,” असे पौलाने ख्रिश्‍चनांना सांगितले. येशूने देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणाऱ्‍या कार्यांना आपल्या जीवनात प्राधान्य देण्यास शिकवले. (मत्त. ६:३३) यहोवाला आपण केलेल्या समर्पणानुसार जगू देणाऱ्‍या गोष्टी आधी करणे महत्त्वाचे आहे. नंतर, करमणुकीला तिच्या योग्य जागी ठेवले पाहिजे. असे केल्याने हितकारक परिणाम मिळतील आणि आपणही अधिक आनंदी राहू.—उप. ५:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा