यशस्वी पुनर्भेटींकरता परिणामकारी शिक्षणाची गरज आहे
१ पुनर्भेटी आपल्या क्षेत्र सेवेचा महत्त्वपूर्ण व आनंददायक भाग आहेत. आस्थेवाईक जणांना पुन्हा भेट देण्याकरता आपण मेहनती का असले पाहिजे? या शिष्य बनवण्याच्या कार्याकरवी यहोवाचे नाव जाहीर व सन्मानित केले जाते आणि देव-भिरु जणांना जीवनाचा मार्ग शोधण्यात मदत दिली जाते. (२ करिंथ. २:१७–३:३) यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व इतरांचे जीव यात गोवलेले आहेत हे जाणल्याने आपण पुन्हा जाण्याआधी चांगली तयारी करण्यास प्रावृत्त झाले पाहिजे.
२ एक चांगला शिक्षक आधीच घातलेल्या पायावर बांधणी करण्यास विद्यार्थ्याला मदत करील. विद्यार्थ्यांना प्रात्येक दिवशी प्राप्त होणारे ज्ञान शाळेतील शिक्षक वाढवतात तसेच एकाच विषयावर अधिक विवेचन मांडून आपण आपल्या पहिल्या भेटीचा मागोवा घेतला पाहिजे. हे, विचाराची अखंडता व प्रागतीशील विचार करण्यामध्ये परिणीत होते.
३ “देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक दिल्यावर तुम्ही परत जाल तेव्हा हे परिणामकारक असल्याचे तुम्हाला आढळेल:
▪ “माझ्या पहिल्या भेटीत, बायबलमध्ये उल्लेखिलेल्या ‘शेवटल्या काळाविषयी’ व त्याचा आपल्याकरता काय अर्थ होतो याची आपण चर्चा करत होतो. आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे आपल्याला कसे ठाऊक आहे याचा तुम्ही विचार करत असाल. (२ तीम. ३:१) त्या प्राश्नाचे उत्तर मिळवण्याकरता येशूचे शिष्य उत्सुक होते. [मत्तय २४:३ वाचा.] उत्तरे देताना येशूने आपण आज पाहत असलेल्या परिस्थितींचे वर्णन दिले. यामध्ये आधी कधीही पाहण्यात न आलेली विपत्ती व हिंसा गोवलेली आहे.” पृष्ठ १९ वर परिच्छेद ३ आणि ४ वर चर्चिलेल्या चिन्हाचे वैशिष्ट्य दाखवा. प्रातिसाद चांगला असल्यास, पृष्ठ २० वरील परिच्छेद ५ ते ८ मध्ये दिलेल्या चिन्हाची इतर वैशिष्ट्ये दाखवा. तुम्ही परत येऊन माहितीपत्रकाच्या मुखपृष्ठावर उपस्थित केलेल्या प्राश्नांची उत्तरे द्याल असे सांगा.
४ “जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?” या माहितीपत्रकातील आस्थेचा मागोवा घेण्याकरता तुम्ही म्हणू शकता:
▪ “जीवन जगण्याचा आपला काय उद्देश आहे याबद्दलचे आपले संभाषण पुन्हा सुरू करण्याविषयी मी उत्सुक होतो. मला असे वाटते की, आपण या पृथ्वीवर आज अनुभवतो त्या दंगलीत जगण्याऐवजी आनंदात व शांतीमय परिस्थितींमध्ये जगावे असा देवाचा आपल्याकरता हेतू होता याबद्दल आपल्या दोघांचेही सहमत असेल. तो त्याचे अभिवचन पूर्ण करील असे तुम्हाला वाटते का?” प्रातिसादासाठी वाव द्या. यशया ५५:११ वाचा आणि मग पृष्ठ ३० वरील परिच्छेद २५ ते २७ मधील विचारांवर चर्चा करा. जीवनात योग्य उद्देश शोधण्याचा उत्तम मार्ग वैयक्तिक बायबल अभ्यास आहे असे सांगा.
५ “भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!” माहितीपत्रकाविषयी दाखवण्यात आलेल्या प्राथम आस्थेचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही ते पुन्हा दाखवून असे म्हणू शकता:
▪ “या माहितीपत्रकाच्या मुखपृष्ठावर दाखवण्यात आलेल्या सुंदर जगाविषयी आपण बोललो होतो. तेथे जगण्याची इच्छा असणाऱ्यांना येशू ख्रिस्तावर विश्वास करणे इतके महत्त्वाचे का आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.” चित्र क्रमांक ४१ काढा आणि यशया ९:६ वाचा. चित्र क्रमांक ६२ चा उल्लेख करा व योहान ३:१६ वाचून आज्ञाधारक असण्याच्या गरजेवर जोर द्या. बायबलचा अभ्यास करून व त्याच्या सल्ल्यानुसार जीवन व्यतीत करून विश्वास कसा प्रादर्शित करावा हे शिकण्यास यहोवाचे साक्षीदार लोकांना मदत करत आहेत हे समजावून सांगा.
६ प्रात्येक पुनर्भेटीनंतर, तुमची परिणामकारकता वाढवण्याच्या हेतूने तिचे परीक्षण करा. स्वतःला विचारा: माझ्या मनात निश्चित असे सांगण्यासारखे काही होते का? मी बायबलवर लक्ष केंद्रित केले होते का? प्राथम भेटीत घातलेल्या पायावर मी बांधणी केली का? माझी सादरता बायबल अभ्यासाकडे नेणारी होती का? यांची सकारात्मक उत्तरे, तुम्ही देवाच्या वचनाचे चांगले शिक्षक असण्याचा प्रायत्न करत आहात याची खात्री देतात.