ईश्वारशासित सेवा प्राशालेची चाचणी
ईश्वारशासित सेवा प्राशालेत मे १ ते ऑगस्ट २१, १९९५ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्राश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्राश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्राश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या संदर्भात प्रात्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. देवाची भक्ती हा व्यक्तिगत प्राश्न असून तो इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर अवलंबून नाही. (१ योहान ४:२०) [uw पृ. १३४ परि. ७]
२. मूर्तिपूजा, रक्त आणि जारकर्म यापासून दूर राहण्याचा विदेशी ख्रिश्चनांना नियमन मंडळाने दिलेला सल्ला मोशेच्या नियमशास्त्रावर आधारित होता. (प्रोषितांची कृत्ये १५:२८, २९) [uw पृ. १४९ परि. ८]
३. सुरवातीला, मोशेचे नियमशास्त्र सर्व मानवजातीला बंधनकारक होते. (स्तोत्र. १४७:१९, २०) [uw पृ. १४७ परि. ५]
४. यशयाचा ५३ अध्याय ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी साधारण ७०० वर्षांआधी लिहिण्यात आला ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचे आणि त्याला कसे वागवण्यात आले त्याचे प्रात्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदाराप्रामाणे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. [si पृ. ११९ परि. ८]
५. उपदेशक ३:१, २ मधील शलमोनाचे शब्द एखाद्याच्या पूर्वनियतीला सूचित होत नसून ते केवळ जीवन आणि मरणाच्या अविरत चक्राला सूचित होतात. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९१ १०/१५ पृ. ५.]
६. कौटुंबिक बाबींच्या सल्ल्यासाठी बायबलमध्ये सर्वोत्तम उपदेश आहे आणि या उपदेशाच्या तुलनेचा कोणताही जगीक स्रोत नाही. [uw पृ. १४४, परि. ११]
७. आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवावा असा सल्ला देत असताना नीतीसूत्राचे पुस्तक आपल्या समस्यांचे मूळ जाणते. [si पृ. १११ परि. ३५]
८. पालकांनी मुलांना दूरदर्शनवरील कोणतेही कार्यक्रम बघण्यासाठी परवानगी देणे हे त्यांना मोकळे सोडून देण्यासारखे आहे. (नीतीसूत्रे २९:१५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR ८९ ३/१ पृ. ११ परि. ८.]
९. जेव्हा विवाहामध्ये समस्या उद्भवतात तेव्हा खरा ख्रिस्ती स्वतःच्या जबाबदाऱ्या डावलण्यासाठी सबब म्हणून तो आपल्या जोडीदाराच्या उणीवा काढणार नाही. [uw पृ. १४०-१ परि. ४, ५]
१०. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत, हे शलमोनाने उपदेशाच्या पुस्तकात घोषित केले ते विनापवाद सर्व गोष्टींना लागू होते. [si पृ. ११४ परि. १५]
पुढील प्राश्नांची उत्तरे द्या:
११. निर्गम २०:७ चे मूलभूत तत्त्व काय आहे? [uw पृ. १५२]
१२. यशया संदेष्टा म्हणून सेवा करीत असताना यहूदावर राज्य करणाऱ्या चार राजांपैकी दोन राजे कोण होते? [si पृ. ११८ परि. ३]
१३. यशया १४:४, १२-१४ मध्ये वर्णन केल्यानुसार बॅबिलोनच्या राजाद्वारे कोणाची मनोवृत्ती प्राकट झाली? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८५ ३/१५ पृ. १६ परि. २.]
१४. निर्गम १९:१०, ११ नुसार यहोवा त्याच्या उपासकांकडून कोणती अपेक्षा करतो? [uw पृ. १५२]
१५. आधुनिक दिवसांतील पहारेकरी कोण आहे आणि तो काय घोषित करत आहे? (यश. २१:८, १२) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८७ ३/१ पृ. १२ परि. १०.]
१६. उपदेशक १२:१२ मध्ये पुस्तकांविषयी एवढा नकारात्मक दृष्टिकोन का आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR८७ १२/१ पृ. ३०.]
१७. नीतीसूत्रे १:२-४ च्या एकवाक्यतेत नीतीसूत्राचे पुस्तक कोणत्या गोष्टीला ठळकपणे मांडते? [si पृ. १०९ परि. १९]
१८. करिंथकरांना “विशाल” होण्यासाठी पौलाने बोध केला तेव्हा त्यामागील त्याचा अर्थ काय होता? (२ करिंथ. ६:१३) [uw पृ. १३७ परि. १४]
१९. प्रोम “मृत्यूसारखे प्राबळ” कसे? (गीतरत्न ८:६, ७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR८८ १/१, पृ. ९.]
२०. सुंदर गीतरत्नामध्ये कोणते व्यावहारिक धडे शिकवण्यात आले आहेत? [si पृ. ११७ परि. १६]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी ते आधारित असलेल्या _________________________ यथार्थ ज्ञानाने व त्यात अंतर्भूत असलेल्या _________________________ नमुन्यांनी आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. [uw पृ. १५३ परि. १४.]
२२. निर्गम २०:४-६ मधील नियम _________________________ मनाई करतो आणि शास्त्रवचनच प्राकट करते, की यहोवा _________________________ अपेक्षा करतो या तत्त्वावर हा नियम आधारित आहे. [uw पृ. १५२]
२३. अनुवाद ७:१-४ मधील तत्त्व स्पष्ट दाखवते की, देवाच्या सेवकांनी _________________________ सेवा न करणाऱ्याशी _________________________ करू नये. [uw पृ. १५२]
२४. गीतरत्न २:१-३ मधील भाषालंकार _________________________ नम्रता आणि विनयशीलता त्याचप्रामाणे तिच्या प्रिय _________________________ मोहक गुणलक्षणे व योग्यता प्राकट करण्यासाठी वापरले आहेत. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR८८ १/१, पृ. ८.]
२५. यहोवाचे विश्वासू सेवक _________________________ विचारण्याच्या प्राथेला नाकारतात कारण अशा प्राकारचे दळणवळण प्रात्यक्षात _________________________ आहे. (यश. ८:१९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR९० ८/१ पृ. ११ परि. ११.]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२६. नीतीसूत्रे २६:२०, २१ नुसार विस्तवात सरपण टाकण्याऐवजी आणि इतरांना उद्दीपित करण्याऐवजी आपण (तत्काळ उत्तर देणारे; सडेतोड बोलणारे; शांत स्वभावाचे), असल्यास त्यांच्याबरोबर (व्यक्तिगत समस्या; दळणवळणाचा अभाव; उत्तम नातेसंबंध) निर्माण होईल. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९१ १०/१५ पृ. १३ परि. १६.]
२७. नीतीसूत्रे २७:६ नुसार तुमच्यावर प्रोम करणारी व्यक्ती (तुमच्या भावना दुखवल्या जातील असे बोलणारच नाही; तुमच्या बाबतची सत्य गोष्ट सांगण्यास संकोच करील; तुम्हाला गरज आहे तेव्हा सल्ला देईल). [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९० ९/१५ पृ. २८.]
२८. उपदेशक या पुस्तकाचा लेखक शलमोन असल्याचा पुरावा (त्याचे नाव सबंध पुस्तकामध्ये आढळते; बायबल पुस्तकांचे इतर लेखक त्याला या पुस्तकाचा लेखक म्हणून संबोधतात; स्वतः हे पुस्तक शलमोनाचे नाव न लिहिता त्याला या पुस्तकाचा लेखक असल्याचे दाखवते) हा आहे. [si पृ. ११२ परि. ४]
२९. आजची कोणतीही न्याय्य नसलेली अथवा काहीही चालेल अशी मनोवृत्ती तेजोमय करते असा विचार करणारे लोक, प्रात्यक्षात (निरुपद्रवी; केवळ सहनशील; आध्यात्मिक अंधकारात) आहेत. (यश. ५:२०) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९३ ३/१ पृ. ११.]
३०. गीतरत्न (राजा या नात्याने शलमोनाची भूमिका; शलमोनाची गर्भ श्रीमंती; गावातील मुलीचा मेंढपाळ मुलाविषयीचा विश्वासूपणा) या गोष्टीला ठळकपणे मांडते. [si पृ. ११५ परि. २]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
नीती. २२:३; उप. ७:२१, २२; यश. १३:१९, २०; मत्त. ५:२३, २४; कलस्सै. ३:१८-२०, २३, २४
३१. यहोवा त्याच्या लोकांना अपघात, यादवी युद्ध किंवा गुन्हेगारी यांपासून आपोआप संरक्षण देत नाही तरी देखील बायबलप्राणीत व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग मोलाचा ठरू शकतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९२ १/१ पृ. १७ परि. २३.]
३२. प्रोरित भविष्यवाणीबद्दल केव्हाही शंका न घेण्यास उत्तम कारण आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९३ ५/१५ पृ. ६.]
३३. खरा ख्रिस्ती त्याच्या बांधवांबरोबर शांतीदायक नातेसंबंध विकसित करण्यास स्वतः होऊन पावले उचलतो. [uw पृ. १३५ परि. १०]
३४. दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी करावे याची वाट पाहून नव्हे, तर स्वतःची भूमिका चोखपणे पार पाडून कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रागती होते व अशा तऱ्हेने तो स्वतः घरात ईश्वारी भक्ती आचरल्याचे दाखवितो. [uw पृ. १४३ परि. १०]
३५. तुमच्या स्वतःच्या बाबतीत आणि इतर अपरिपूर्ण मानवांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाच्या बाबतीत परिपूर्णतेची अवास्तविक अपेक्षा बाळगू नका. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९० ३/१ पृ. ८.]