माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
१ सत्य जाणून सुवार्तेची आवेशाने घोषणा करणाऱ्यांपैकीचे असणे किती हर्षाचे आहे! देवाच्या संघटनेच्या बाहेर असलेल्या लोकांना राज्य सुवार्ता ऐकणे अगत्याचे आहे. आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि “पहा! मी सर्व नवे करतो” या माहितीपत्रकांमध्ये अगदी सरळपणे राज्याबद्दलचे सत्य समजावून सांगितले आहे. ही माहितीपत्रके देवाच्या राज्याधीन असलेल्या पृथ्वीवरील जीवनाचे हुबेहूब चित्र रेखाटतात, आणि देवाच्या वचनात समजावलेल्या राज्याच्या वास्तविकतांकडे वाचकाला निर्देशित करतात. अर्थात, एखाद्या आस्थेवाईकाला माहितीपत्रक देणे ही आपल्या कार्याची केवळ सुरवात आहे. (१ करिंथ. ९:२३) सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून अभ्यास सादर करण्याच्या हेतूने आपण सर्व वाटपांचा तत्परतेने मागोवा घेऊ या. ऑगस्ट दरम्यान आपण हे कसे साध्य करू शकतो?
२ “आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?,” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “मी ज्यांच्याशी बोललो अशा लोकांनी हे जाणून घेतलंय की आज जगात मोठ्या समस्या आहेत आणि ते म्हणतात की त्या सोडवल्या जाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. [बेकारी, वाढती गुन्हेगारी, किंवा मादक औषधांचा दुरुपयोग अशा स्थानिक समस्यांचा उल्लेख करा.] या गोष्टींमुळे आपलं तसेच आपल्या प्रियजनांचं भवितव्य अतिशय असुरक्षित वाटतं. या प्रकारातील कोणतीच समस्या नसेल असा एखादा समय येईल असं तुम्हाला वाटतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] कदाचित बायबलचे काही भाग वाचायची संधी तुम्हाला मिळाली असेल. मिळाली असल्यास, भवितव्याबद्दल ते कोणती अभिवचने देते हे तुम्ही वाचलंय का?” आपल्या समस्या या माहितीपत्रकातील पृष्ठे १९ आणि २० काढा, आणि तेथे नवीन जगाबद्दल उद्धृत केलेली काही उत्तेजनात्मक शास्त्रवचने वाचून दाखवा, जसे की, यशया ३३:२४; ३५:५, ६, ७ आणि स्तोत्र ४६:९ किंवा ७२:१६. माहितीपत्रक सादर करा.
३ “आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?” हे माहितीपत्रक दिले असल्यास, पुनर्भेटीच्या वेळी असे म्हणून तुम्ही चर्चा सुरू करू शकता:
◼ “देवाने आपल्या समस्या सोडवण्याबद्दल आणि एक उत्तम जग स्थापन करण्याबद्दल कोणती अभिवचने दिली आहेत त्याची आपण आधी चर्चा केली होती. मी तुम्हाला दिलेलं माहितीपत्रक याबद्दल चर्चा करतं की, आपण बायबलवर विश्वास करू शकतो का आणि आपल्या दिवसांमध्ये उत्तम परिस्थिती येईल हे आपल्याला कसं ठाऊक आहे. उदाहरणासाठी, ते दाखवतं की आपल्या दिवसांमध्ये कशी परिस्थिती असेल हे बायबलनं हजारो वर्षांआधीच भाकीत केलं होतं आणि असं म्हटलं होतं की या वाईट परिस्थिती, जगाचा बदल अगदी जवळ आहे हे दाखवणाऱ्या चिन्हाचा भाग असतील.” आपल्या समस्या या माहितीपत्रकातील पृष्ठ १३ काढा, आणि “चिन्ह” या शिर्षकाखालील पहिला परिच्छेद वाचा. मग असे म्हणा: “आज आपल्याला अशा परिस्थिती दिसत नाहीत का? त्या काय सूचित करतात हे तुम्हाला माहीत आहे का?” प्रतिसादासाठी वाव द्या. २ पेत्र ३:९, १३ वाचा. गृह बायबल अभ्यासाद्वारे अधिक शिकून घेण्याबद्दल प्रोत्साहन द्या.
४ “भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!” हे माहितीपत्रक अगदी संक्षिप्त प्रस्तुतीसह सादर करता येईल. त्याचे मुखपृष्ठ दाखवून तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “एक सुंदर संदेश ज्यामध्ये आहे असं काही तुम्हाला दाखवायला मला आवडेल.” भूतलावर जीवनाचा आनंद हे माहितीपत्रक उघडा, आणि प्रस्तावनेतील पहिला परिच्छेद वाचा. मग पुढे म्हणा: “[चित्र क्रमांक ८ वरील शीर्षक दाखवा] ‘मानव का मरतो?’ या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते देतं. या चित्रांचा अभ्यास करायला आणि या माहितीपत्रकातील हे उतारे वाचायला तुम्हाला आवडेल. त्यासाठी तुम्ही ही प्रत घेऊ शकता.” माहितीपत्रक स्वीकारण्यात आल्यास, घरमालकासमोर असा एखादा प्रश्न मांडा: “अशा परिस्थितीत जगण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?” आणि या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुम्ही पुन्हा याल असे सांगा.
५ “भूतलावर जीवनाचा आनंद” हे माहितीपत्रक दिलेल्या ठिकाणी पुनर्भेट करताना तुम्ही काय म्हणाल? तुम्ही हा प्रस्ताव वापरून पाहू शकता:
◼ भूतलावर जीवनाचा आनंद माहितीपत्रकातील चित्र क्रमांक ४९ दाखवा आणि विचारा, “हे सुंदर चित्र आहे, नाही का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मागच्या भेटीत मी तुम्हाला जे माहितीपत्रक दिलं होतं त्यात हे चित्र आहे. पुढील पानावरचा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो.” चित्र क्रमांक ५० काढा आणि प्रश्न वाचा: “‘त्या सुंदर नंदनवनात चिरकाल राहावे असे तुम्हाला वाटते का?’ [प्रतिसादासाठी वाव द्या.] तुमची तीच इच्छा आहे, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे असं इथं म्हटलं आहे ते पाहा: ‘तर मग, देव सांगतो, त्याचे अधिक शिक्षण घ्या.’ [योहान १७:३ वाचा.] तुमच्यासोबत मोफत बायबलचा अभ्यास करायला मला आवडेल. तुम्हाला आवडेल का?” परत येण्याची निश्चित वेळ ठरवा.
६ “पहा! मी सर्व नवे करतो” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही संपूर्ण मुखपृष्ठावरील चित्र दाखवून आणि असे विचारून सुरवात करू शकता:
◼ “तुम्हाला काय वाटतं, सबंध जग असं दिसण्यासाठी कशाची गरज आहे?” प्रतिसादासाठी वाव द्या. या चित्राच्या काही वैशिष्ट्यांचे वर्णन करा जी पृष्ठ ३ वर दाखवली आहेत. मग असे म्हणा: “अनेक लोकांना वाटतं की जगाला असं बनवणं अशक्य आहे. पण देवाला हे साध्य करणं अशक्य नाही. [परिच्छेद ४३ मधील मुद्दे सांगा; मग यशया ९:६, ७ वाचा.] देवाने एक नवीन जग आणण्याचं अभिवचन दिलंय ज्यामध्ये सगळ्या राष्ट्रातील लोकांना एका सुंदर परादीसचा आनंद उपभोगायला मिळेल. तुम्ही हे माहितीपत्रक वाचावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही व तुमचं कुटुंब देवानं दिलेलं अद्भुत भवितव्य कसं उपभोगू शकता हे यातून दाखवलं जाईल.”
७ पुनर्भेटीच्या वेळी, बायबलबद्दल अधिक शिकण्याची का गरज आहे ते समजावून सांगण्यासाठी तुम्ही “पहा!” हे माहितीपत्रक उपयोगात आणू शकता. जमल्यास, मुखपृष्ठ पुन्हा एकदा दाखवा व म्हणा:
◼ “मी तुम्हाला हे चित्र पहिल्यांदा दाखवलं तेव्हा, अशा सुंदर जगात राहायला आपल्याला नक्कीच आवडेल असं आपण दोघांनीही मान्य केलं होतं. हे शक्य व्हावं म्हणून, आपल्या सर्वांना एक गोष्ट करणं आवश्यक आहे.” “पहा!” या माहितीपत्रकातील परिच्छेद ५२ काढा; तो परिच्छेद आणि योहान १७:३ येथे दिलेले वचन वाचा. या माहितीचा संबंध, परिच्छेद ५३ मध्ये दिलेल्या योग्य बायबल शिक्षणाबद्दलच्या उदाहरणाशी जोडा, आणि मग यहोवाचे साक्षीदार अशा प्रकारची सूचना घरी जाऊन मोफत देतात हे समजावून सांगा. ज्ञान पुस्तकाचा उपयोग करून आपल्या अभ्यासाची पद्धत कशी आहे ते दाखवा.
८ तुम्ही इतर माहितीपत्रके उपयोगात आणत असाल, तर वर नमुने म्हणून सुचवलेल्या प्रस्तुती पाहून तुम्ही स्वतःच्या प्रस्तुती तयार करू शकता. जेथे कोठे आस्था दाखवली जाते, तेथे घरमालकाचे नाव व पत्ता आणि चर्चिलेला विषय यांची नोंद करा जेणेकरून पुनर्भेटीच्या वेळी तुम्ही फलदायी चर्चा करू शकता. चांगली तयारी करा आणि तुम्ही राज्याची सुवार्ता घोषित कराल तसे यहोवाचा आशीर्वाद मिळवत राहा.