माहितीपत्रकांचा उपयोग करून —देवाच्या वचनाचे शिक्षक व्हा
१ यहोवाच्या प्रात्येक समर्पित सेवकाची, देवाच्या वचनाचे शिक्षण इतरांना देण्याच्या कार्यात भाग घेण्याची जबाबदारी आहे. स्वर्ग तसेच पृथ्वीवरील अधिकार असणाऱ्या व्यक्तीने आपल्यावर ‘सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस शिकवा’ ही कामगिरी सोपवल्याचे समजल्यावर या जबाबदारीचे गांभीर्य स्पष्ट होते. (मत्त. २८:१८-२०) यास्तव, सुवार्तेचा प्राचार करण्यात भाग घेण्यासाठी आपल्याला शिक्षक होण्याची गरज आहे!—२ तीम. २:२.
२ ऑगस्ट दरम्यान, माहितीपत्रके सादर करताना आपण आपले शिकवण्याचे कौशल्य उपयोगात आणू शकतो. आपण त्यातील काही मनोरंजक शास्त्रवचनीय विचार निवडू शकतो व काही विवेचने तयार करू शकतो जे आपल्याला संभाषण सुरू करण्यास मदत करू शकतात.
३ “देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही म्हणू शकता:
▪ “आम्ही तुमच्या शेजाऱ्यांपैकी पुष्कळांना भेटी दिल्या व पाहिले की, त्यांना गुन्हेगारी, दहशतवाद व हिंसा यामध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल चिंता वाटते. तुमच्या मते, ही एक समस्या का बनली आहे? [प्रातिसादासाठी वाव द्या.] हे असे घडेल याविषयी बायबलने सांगितले होते ही गोष्ट आपल्याकरता खास आस्थेची आहे. [२ तीमथ्य ३:१-३ वाचा.] ‘शेवटल्या काळी’ हे घडणे आवश्यक आहे याकडे लक्ष द्या. याचा अर्थ कशाचा तरी अंत होणार आहे. ते काय असावे असे तुम्हाला वाटते?” प्रातिसादासाठी वाव द्या. पृष्ठ २२ काढा, तेथील चित्र दाखवा आणि त्या पानावर उद्धृत केलेल्या एक किंवा दोन शास्त्रवचनांची चर्चा करा. हे आशीर्वाद अगदीच हाताशी आहेत असा विश्वास आपण का करतो याचे स्पष्टीकरण देण्यासाठी नंतर परतण्याची योजना करा.
४ “जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?” हे माहितीपत्रक सादर करताना हा प्रास्ताव उपयोगात आणण्यास तुम्हाला आवडेल:
▪ “पुष्कळ लोकांना जीवनाचा खरा उद्देश शोधण्यासाठी प्रायत्न करणे कठीण वाटते. काहीजण मर्यादित आनंद उपभोगत असतात, तर बहुतेक लोक निराशा व दुःखदायक जीवन जगत असतात. आपण असे जीवन जगावे असा देवाचा हेतू होता असे तुम्हाला वाटते का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] बायबल दाखवते त्याप्रामाणे देवाची इच्छा आहे की, आपण अशा जगात जगावे.” पृष्ठ २१ वरील चित्र दाखवा, त्यानंतर २५ व २६ पृष्ठे व परिच्छेद ४-६ काढा आणि त्याने काय अभिवचन दिले आहे त्याचे स्पष्टीकरण करा. तुम्ही परत जाल त्या वेळेच्या चर्चेसाठी हा प्राश्न विचारा: “देव त्याची अभिवचने पूर्ण करील याची खात्री आपल्याला कशी असू शकते?”
५ “भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!” या माहितीपत्रकाच्या समोरील व मागील पृष्ठांचे संपूर्ण चित्र दाखवून तुम्ही ते सादर करू शकता:
▪ “आनंदी लोकांनी भरलेल्या अशा जगात जगायला तुम्हाला आवडेल का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] देवाचे लोकांवर प्रोम आहे व त्यांनी या पृथ्वीवर आनंदात चिरकाल जगावे अशी त्याची इच्छा आहे असे बायबल आपल्याला सांगते.” चित्र क्रमांक ४९ काढा आणि तेथे उल्लेखिलेले एखादे शास्त्रवचन वाचा. त्यानंतर, ५० क्रमांकाचे चित्र दाखवून, आपणाला अशा परादीसमध्ये जगायचे असल्यास काय केले पाहिजे ते समजावून सांगा. आम्ही पुन्हा यावे का असे विचारा व येशू ख्रिस्तामध्ये विश्वास बाळगणे इतके महत्त्वाचे का आहे याची चर्चा केली जाईल हे सांगा.
६ ‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवून आपण आपली प्रागती प्रादर्शित’ करतो तेव्हा यहोवा संतुष्ट होतो. (१ तीम. ४:१५, १६) “सुवार्ता” ऐकण्याची उत्सुकता असलेल्यांना साहाय्य देण्याच्या प्रायत्नात आपली माहितीपत्रके आपल्याकरता खरी मदत ठरू शकतात.—यश. ५२:७.