पुनर्भेटी देऊन तुम्ही काळजी घेता हे दाखवा
१ दारोदारी जाऊन आस्थेवाईक व्यक्तींना शोधल्याने, इतरांना राज्य संदेश ऐकण्याची संधी देण्यासाठी तुमची इच्छा आहे हे प्रदर्शित होते. यासाठी जानेवारी महिन्यात केलेल्या साहित्य वाटपाचा मागोवा घेण्याची खात्री करा, कारण तुम्ही इतरांची काळजी करता हे दाखवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
२ “तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता” या पुस्तकाच्या वाटपाचा मागोवा घेण्यासाठी येथे एक सूचना आहे:
▪ “आपणा सर्वांना सुवार्ता ऐकण्यास आवडते. पुष्कळांना असे वाटते की, खरी सुवार्ता या जगात उपलब्ध नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपणा सर्वांना ठाऊक आहे की, सुवार्ता आपल्याला खूष करू शकते आणि उत्साही करू शकते. सर्वात उत्तम सुवार्ता बायबलमध्ये सापडते. भवितव्याबद्दलच्या माहितीचे तेच एकमात्र विश्वसनीय स्रोत आहे. [पृष्ठे ७-९ वर उद्धृत केलेली शास्त्रवचने दाखवा.] या परिस्थिती लवकरच येत आहेत हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्यासाठी संधी मिळाल्यास आम्हाला आवडेल.” या पुस्तकाच्या साहाय्याने बायबलचा अभ्यास केल्यावर घरमालकास या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यासाठी आधार मिळू शकतो हे समजावून सांगा.
३ तुम्ही “तुझे राज्य येवो” दिले असल्यास, तुमचे संभाषण अशाप्रकारे पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करू शकता:
▪ “प्रथम आपण देवाच्या राज्याबद्दल आणि ते आपल्यासाठी काय करील त्याबद्दल बोललो होतो. ते राज्य लवकरच या पृथ्वीला एक नंदनवन बनवील. आपण एखादे नंदनवन कधीही न पाहिल्यामुळे, त्याची कल्पना करणे कठीण असेल. ते कसे दिसेल त्याचे येथे एक चित्र आहे. [४ आणि ५ पृष्ठांवरील चित्र दाखवा.] अशा नंदनवनाचे अभिवचन बायबलमध्ये दिले आहे.” स्तोत्र ७२:७ वाचा. आस्था असल्यास, पृष्ठ १७५, परिच्छेद ३ आणि ४ काढा आणि येणाऱ्या नंदनवनात आपल्याला जगायचे आहे, तर आपण काय केले पाहिजे ते सांगा.
४ तुम्ही अशा संक्षिप्त सादरतेसह “ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—फ्रॉम वॉट सोर्स?” या पुस्तकाच्या वाटपाचा मागवा ऊ शकता:
▪ “आज जगाचे नेते शांती आणि सुरक्षितता आणण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. मात्र यहोवा देवच ते आणू शकतो. आपण काय केले पाहिजे ते बायबल आपल्याला दाखवते. [अध्याय ९ काढा आणि आपल्याला बायबलच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यासाठी मजबूत आधार आहे हे दाखवा.] हे पुस्तक तुम्हाला कशी मदत करू शकते ते दाखवण्यास मला आवडेल.”
५ तुम्ही या सूचनेसह “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” या पुस्तकाच्या वाटपाचा मागोवा घेऊ शकता:
▪ “सुरवातीला, पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा प्रदान करणाऱ्या या पुस्तकाची एक प्रत मी तुम्हाला दिली होती. या पुस्तकाची उजळणी केल्यावर, तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहंचला? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपण मृत्यूच्या भयाविना जगू शकतो अशा नंदनवनमय नवीन जगाचे अभिवचन देणाऱ्या भागाचे वाचन केल्याने तुम्ही निश्चितच उत्तेजित झाला असाल. [पुस्तकातील अध्याय १६ काढा आणि पृष्ठ १३४ वरील उपशिर्षक दाखवा. यशया २५:८ वाचा.] तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना अशा जगात राहावयास आवडेल याची मला खात्री आहे. पृष्ठ १३९ वरील तिसरा परिच्छेद काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या.” तो परिच्छेद वाचा आणि यहोवाचा शोध घेणे याचा अर्थ, त्याचे वचन, बायबल याचा अभ्यास करून त्याच्याविषयी व त्याच्या उद्देशांविषयी अधिक शिकणे असा होतो हे दाखवा.
६ आपल्या मेंढरांची काळजी वाहणारा प्रेमळ मेंढपाळ या नात्याने यहोवाने एक परिपूर्ण उदाहरण मांडले आहे. (यहे. ३४:११-१४) त्याच्या प्रेमळ काळजीचे अनुकरण करण्याच्या आपल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्याला संतुष्टी प्राप्त होते, आपले प्रेम प्रदर्शित होते आणि इतरांकरता आशीर्वाद आणते.