माहितीपत्रके दिलेल्या सर्व ठिकाणी पुनर्भेटी द्या
१ प्रोषित पौलाने फिलिप्पैकरांना शाबासकी दिली कारण त्यांनी ‘त्याच्याविषयीची काळजी पुन्हा जागृत केली होती.’ (फिलिप्पै. ४:१०) आपण क्षेत्र सेवेसाठी त्यांचे उदाहरण आदर्श या नात्याने अनुसरले, तर आपण ज्यांना साक्ष देतो ‘त्यांच्याविषयीची काळजी करण्यास जागृत होऊ’ व पुनर्भेटी करण्यास प्रावृत्त होऊ.
२ “आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?” हे माहितीपत्रक दिले असल्यास, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “त्या दिवशी आपण केलेल्या संभाषणाचा मी विचार करत होतो व माझ्या मनात दोन शास्त्रवचने आली. ती तुम्हाला दाखवावी असे मला वाटले. देवाने पृथ्वीचे आधिपत्य गाजवण्याचे आपल्या हाती घ्यावे याविषयी आपण बोललो होतो हे तुम्हाला आठवतच असेल. यहोवा देवाने हे घडेल असे अभिवचन बायबलमध्ये दिले आहे. [दानीएल २:४४ वाचा.] तसे खरोखर होईल असा तुमचा विश्वास आहे का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] देव आपली अभिवचने पूर्ण करण्याच्या क्षमतेबद्दल काय म्हणतो ते ऐका. [यशया ५५:११ वाचा.] या गोष्टीने आपला विश्वास देवाच्या राज्यावर ठेवण्यास आपल्याला उत्तेजन देऊ नये का? परंतु, देव त्याची अभिवचने कधी पूर्ण करील?” तुम्ही त्या प्राश्नाचे उत्तर पुढील भेटीत द्याल असे सांगा.
३ “व्हेन समवन यू लव्ह डाईझ” हे माहितीपत्रक घेतलेल्या व्यक्तीला पुनर्भेट देताना तुम्ही अशा प्राकारे सुरवात करू शकता:
▪ “मृत्यूमुळे कोणा व्यक्तीला गमावणे याची चर्चा आपण केली होती हे लक्षात ठेवून मी परतण्यास खास प्रायत्न केला.” पृष्ठ ३० वरील चित्र दाखवा व असे म्हणा: “पुनरुत्थान होत असलेल्या व त्यांचे प्रियजन पुन्हा भेटत असलेल्या लोकांचे हे आनंदी दृश्य तुम्हाला आठवते का? हे कोठे घडणार आहे, स्वर्गात की पृथ्वीवर असा प्राश्न मी तुम्हाला विचारला होता. कदाचित तुम्हाला या माहितीपत्रकाच्या पृष्ठ २६ वर बायबलचे या बाबतीत असणारे उत्तर मिळाले असेल.” तीन ते पाच परिच्छेदांतील मुख्य मुद्यांची चर्चा करा आणि योहान ५:२१, २८, २९ वाचा. वेळ असेल त्याप्रामाणे, त्या पृष्ठावरील कोणतीही उर्वरित शास्त्रवचने वाचा.
४ “पहा! मी सर्व नवे करतो” या माहितीपत्रकाचा तुम्ही एखादा अभ्यास सुरू केला का? पुनर्भेटीच्या वेळी, तुम्ही असे करू शकता:
▪ पुन्हा एकदा पृष्ठ ३० चा संदर्भ द्या आणि या प्राश्नाकडे निर्देशित करा: “बायबल कोणत्या प्राकारे उल्लेखनीय आहे?“ पृष्ठे ३ आणि ४ काढा व १-४ परिच्छेदांची तसेच माहितीपत्रकाच्या मुखपृष्ठावरील चित्राची उजळणी करा. परिच्छेद ४ वरील तळटीपेतील एक किंवा दोन उल्लेखलेली शास्त्रवचने वाचा. अशी अद्भुत आशा प्रादान करणारे बायबल हेच एकमेव पुस्तक आहे हे समजावून सांगा. तुमच्या पुढील भेटीसाठी व्यवस्था करा. तिसऱ्या भेटीनंतर, तो अभ्यास पुढे चालू राहील असे वाटल्यास, तुम्ही त्याचा नवीन अभ्यास म्हणून अहवाल देऊ शकता!
५ तुम्ही “द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्यूर फॉरएव्हर” यावर अशा प्राकारे चर्चा पुन्हा सुरू करू शकता:
▪ “सुरवातीला, मी तुम्हाला बायबलमध्ये देवाचे नाव दाखवले. यहोवा हे नाव जाणणे व त्याचा उपयोग करणे आपल्या उपासनेचा अत्यावश्यक भाग आहे.” पृष्ठ ३१ काढा, शेवटल्या चार परिच्छेदांतील मुख्य मुद्यांची उजळणी करा आणि योहान १७:३ व मीखा ४:५ वाचा. देवाच्या नावाचे योग्य पद्धतीने कसे पवित्रीकरण केले जाईल व आपण परादीस पृथ्वीच्या आशीर्वादांचा आनंद कसा लुटू शकतो हे दाखवून देणाऱ्या बायबल अभ्यासाचा कार्यक्रम आपण पुरवतो हे स्पष्ट करा.
६ यास्तव, तुम्ही संपर्क साधलेल्यांविषयीची काळजी पुन्हा जागृत करा. चिकाटीने पुन्हा जात राहा आणि काही लाभदायक गोष्टी सांगण्यासाठी तयारी करा. नवीन शिष्य बनवण्यात, “तो फळ देतोच देतो” अशापैकी तुम्ही एक होऊ शकता.—मत्त. १३:२३.