वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • ‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • जागृत राहण्याचा काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना किंग जेम्स व्हर्शन १ पेत्र २:९ येथे “निवडलेली पिढी” असे संबोधते. यामुळे मत्तय २४:३४ मध्ये अभिलिखित, येशूच्या “पिढी” या शब्दाच्या प्रयोगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर परिणाम होण्यास हवा का?

“पिढी” हा शब्द काही भाषांतरांमध्ये दोन्ही ठिकाणी अनुवादित झाल्याचे दिसते. किंग जेम्स व्हर्शन नुसार प्रेषित पेत्राने लिहिले: “पण तुम्ही तर निवडलेली पिढी, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, खास लोक आहात; ह्‍यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करावे.” येशूने भाकित केले: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.”—१ पेत्र २:९; मत्तय २४:३४.

प्रेषित पेत्राने पहिल्या ठिकाणी जिʹनोस, हा ग्रीक शब्द वापरला तर येशूच्या मूलपाठामध्ये आपल्याला जि·नि·याʹ, हा शब्द आढळतो. हे दोन ग्रीक शब्द कदाचित समान वाटतील आणि त्यांचे मूळ रूप एकच असल्याचे वाटते; परंतु ते वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांचे विभिन्‍न अर्थ आहेत. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स—विथ रेफरन्स १ पेत्र २:९ तळटीपेत असे म्हणते, “‘वंश.’ ग्रीक जिʹनोस; शब्द जि·नि·याʹ, ‘पिढी’ पासून भिन्‍न, जसे मत्त २४:३४, मध्ये आहे.” मत्तय २४:३४ मध्ये अशीच समांतर तळटीप आढळते.

त्या तळटिपा दाखवून देतात त्याप्रमाणे जिʹनोस; “वंश” या इंग्रजी शब्दाद्वारे उचितपणे भाषांतरीत करण्यात आला आहे व तो इंग्रजी भाषांतरांमध्ये सामान्यपणे आढळतो. पेत्राने १ पेत्र २:९ येथे यशया ६१:६ मधील भविष्यवाणी स्वर्गीय आशा असणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू केली. या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना अनेक राष्ट्रांतून आणि जातींतून घेण्यात आले आहे परंतु ते आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राचे भाग होतात तेव्हा त्यांच्या स्वाभाविक पार्श्‍वभूमींचा यामध्ये काही अर्थ राहत नाही. (रोमकर १०:१२; गलतीकर ३:२८, २९; ६:१६; प्रकटीकरण ५:९; १०) पेत्राने आध्यात्मिक अर्थाने, एक विभिन्‍न गट—“निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” अशी त्यांची ओळख करून दिली.

परंतु मत्तय २४:३४ मधील येशूच्या ग्रीक मूलपाठाच्या शब्दांमध्ये आपल्याला जि·नि·याʹ, हा शब्द आढळतो. हे सर्वत्र मान्य आहे, की येशू एखाद्या ‘वंशाचा‘ नव्हे, तर विशिष्ट कालावधीत जगणाऱ्‍या लोकांचा उल्लेख करत होता.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी चार्ल्स टी. रस्सेल, या वॉचटावर सोसायटीच्या पहिल्या अध्यक्षांनी असे लिहून हे स्पष्ट केले: “‘पिढी’ आणि ‘वंश’ या शब्दांचे मूळ किंवा त्यांचा प्रारंभ बिंदू एकच असले तरी हे दोन शब्द समान नाहीत आणि या शास्त्रवचनीय प्रयोगात हे शब्द पूर्णतः विभिन्‍न आहेत. . . . या भविष्यवाणीच्या तीन वेगवेगळ्या अहवालांमध्ये आपला प्रभूच प्रवर्तक आहे ज्याने पूर्णपणे भिन्‍न असलेला (जिनिया) शब्द वापरला ज्याचा अर्थ वंश असा होत नाही, तर आपल्या इंग्रजीतील पिढी या शब्दाचा जो अर्थ आहे तोच अर्थ या शब्दाचा आहे. (जिनिया) ग्रीक हा शब्द वंश या अर्थाने वापरला नाही हे त्या शब्दाच्या इतर प्रयोगावरून सिद्ध होते; परंतु समकालीन लोकांच्या संदर्भासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे.”—सूडाचा दिवस, (इंग्रजी) पृष्ठे ६०२-३.

अगदी अलीकडे, बायबल अनुवादकांसाठी बनविण्यात आलेली मत्तय शुभवर्तमानावरील हस्तपत्रिका, (इंग्रजी) (१९८८), म्हणते: “[द न्यू इंटरनॅशनल व्हर्शन] ही पिढी अक्षरशः अर्थाने भाषांतरीत करते परंतु, ‘किंवा वंश’ अशी तळटीप देते. नव्या कराराच्या एका विद्वानाचा विश्‍वास आहे, की ‘येशूच्या नंतरची केवळ पहिली पिढी नव्हे, तर येशूला नाकारलेल्या यहुदी धर्मांच्या सर्व पिढ्या, मत्तयाच्या बोलण्याचा अर्थ आहे.’ तथापि, या निर्णयांप्रत पोहंचावे की पोहंचू नये, याकरता खात्रीशीर असा कोणताही भाषाशास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही आणि या निर्णयांना, उघड दिसणारा अर्थ टाळण्याचा प्रयत्न म्हणून त्यागले पाहिजे. त्याच्या मूळ मांडणीमध्ये हा संदर्भ केवळ येशूच्या स्वतःच्या समकालीन लोकांविषयी होता.”

पृष्ठ १० ते १५ वर चर्चा करण्यात आल्याप्रमाणे येशूने त्याच्या काळातील यहुदी पिढीची, त्याला नाकारणाऱ्‍या समकालीन लोकांची त्याने निंदा केली. (लूक ९:४१; ११:३२; १७:२५) त्या पिढीचे वर्णन करताना त्याने “दुष्ट आणि व्यभिचारी,” “विश्‍वासहीन व कुटिल,” “व्यभिचारी आणि पापी” यांसारख्या विशेषणांचा अनेकदा वापर केला. (मत्तय १२:३९; १७:१७; मार्क ८:३८) येशूने “पिढी” हा शब्द शेवटल्या वेळी वापरला तेव्हा तो चार प्रेषितांसोबत जैतुनाच्या डोंगरावर होता. (मार्क १३:३) त्या लोकांचा अद्याप आत्म्याने अभिषेक झाला नव्हता आणि ते ख्रिस्ती मंडळीचे भाग देखील नव्हते, त्यांची एक “पिढी” किंवा एक वंश तयार झाला नव्हता हे निश्‍चितच. परंतु येशूने “पिढी” या संज्ञेचा प्रयोग त्याच्या समकालीन लोकांना उद्देशून केला त्याच्याशी ते सुपरिचित होते. त्यामुळे त्याने जेव्हा शेवटी “ही पिढी” असा उल्लेख केला तेव्हा त्याच्या मनात काय होते, हे तर्कसंगतपणे त्यांना समजले असते.a प्रेषित पेत्र जो त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याने त्यानंतर यहुद्यांना आर्जवले: “ह्‍या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”—प्रेषितांची कृत्ये २:४०.

येशूने याच प्रवचनात भाकीत केलेल्या अनेक गोष्टींचा (जसे युद्धे, भूकंप, दुष्काळ वगैरे) पुरावा आम्ही अनेकदा प्रकाशित केला आहे. या बाबींची पूर्णता येशूचे भविष्यवाणी वर्तविणे आणि जेरूसलेमचा सा. यु ७० मध्ये विनाश होणे या कालावधीच्या दरम्यान पूर्ण झाली. अनेक गोष्टींची पूर्णता झाली; परंतु सर्वच नाही. उदाहरणार्थ, रोमी लोकांनी जेरूसलेमवर हल्ला चढविल्यानंतर (सा. यु. ६६-७०) “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह” प्रकट झाले, ज्यामुळे ‘पृथ्वीवरील सर्व वंशांच्या’ लोकांना शोक करावा लागला, याचा कोणाताही पुरावा नाही. (मत्तय २४:३०, पंडिता रमाबाई भाषांतर.) यास्तव, सा. यु. ३३ आणि सा. यु. ७० दरम्यान झालेली ती पूर्णता सुरवातीची असावी, संपूर्ण किंवा मोठ्या प्रमाणातील पूर्णता नव्हे ज्याकडे येशू अंगुली दर्शवत होता.

जोसेफसचा ग्रंथ यहुदी युद्ध, (इंग्रजी) याच्या भाषांतराच्या प्रस्तावनेत जी. ए. विल्यमसन लिहितात: “मत्तय आपल्याला सांगतो, शिष्यांनी [येशूला] दुहेरी प्रश्‍न केला होता—मंदिराच्या विनाशाबद्दल आणि त्याचे शेवटचे येण्याबद्दल—आणि येशूने त्यांना दुहेरी उत्तर दिले, ज्याच्या पहिल्या भागाने, जोसेफसने वर्णन केलेल्या पूर्वनियोजित घटनांबद्दल स्पष्टपणे भाकीत केले.”

होय, सुरवातीच्या पूर्णतेमध्ये, “ही पिढी” या अभिव्यक्‍तीचा स्पष्ट अर्थ इतर वेळी झालेल्या पूर्णतेप्रमाणेच होता—अविश्‍वासू यहुद्यांची समकालीन पिढी. येशूने जे भाकित केले त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ती पिढी नाहीशी होणार नव्हती. विल्यमसन यांनी विवेचन मांडल्याप्रमाणे ही भविष्यवाणी जेरूसलेमच्या नाशाच्या पूर्वगामी दशकांमध्ये सत्य शाबीत झाली, जसे प्रत्यक्ष साक्षीदार इतिहासकार जोसेफस, यानी वर्णन केले.

दुसरी किंवा मोठ्या प्रमाणातील पूर्णतेमध्ये तर्कसंगतपणे “ही पिढी” समकालीन लोकांची सुद्धा असणार आहे. पृष्ठ १६ वरील या लेखाच्या सुरवातीला दाखविल्याप्रमाणे, येशू एका निश्‍चित वर्षांच्या संख्येच्या “पिढी”ला सूचित करत होता, असा निष्कर्ष काढण्याची गरज नाही.

उलटपक्षी, “पिढी” या अभिव्यक्‍तीद्वारे ध्वनित केलेल्या कोणत्याही काळाविषयी दोन प्रमुख गोष्टी म्हटल्या जाऊ शकतात. (१) निश्‍चित समय, म्हणजेच विशिष्ट वर्षांचा समय (दशक किंवा शतक) यांच्या बाबतीत आहे त्याप्रमाणे लोकांची पिढी, ठराविक वर्षे असणारी कालमर्यादा असू शकत नाही. (२) पिढीचे लोक सापेक्षपणे थोड्या कालावधीपर्यंत जिवंत राहतात, ते प्रदीर्घ काळापर्यंत जिवंत राहत नाहीत.

परिणामतः, येशूने ‘या पिढीकडे’ निर्देश करत असल्याचे प्रेषितांनी ऐकले तेव्हा ते काय समजणार होते? जेरूसलेमचा विनाश ‘मोठ्या संकटात’ ३७ वर्षांनंतर झाला, हे सिंहावलोकनामुळे आपल्याला ठाऊक आहे, पण येशूचे ऐकणारे प्रेषित ते समजू शकले नाहीत. त्याउलट, “पिढी”चा उल्लेख केल्यामुळे त्यांना प्रदीर्घ लांबीच्या कालावधीची कल्पना दिली नसेल, तर सापेक्षपणे मर्यादित कालावधीत जगणाऱ्‍या लोकांची कल्पना त्यांना आली असेल. आपल्या बाबतीतही हे खरे आहे. यास्तव, येशूचे त्यानंतरचे शब्द किती उचित आहेत: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाही नाही. . . . म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्तय २४:३६, ४४.

[तळटीपा]

a “ही पिढी” या अभिव्यक्‍तीमध्ये दर्शक सर्वनामाचे हाऊʹटोस चे स्वरूप इंग्रजी “धीस” या शब्दाशी अनुरूप आहे. ही अभिव्यक्‍ती काहीतरी उपस्थित असल्याचे किंवा वक्‍त्‌याच्या समक्ष असलेल्या गोष्टीला सूचित करू शकते. परंतु तिचे आणखी इतरही अर्थ असू शकतात. द इक्झेजिटिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेन्ट (१९९१) टिप्पणी करते: “[हाऊʹटोस] हा शब्द निकट वस्तुस्थितीला संबोधतो. अशा प्रकारे [आयन हाऊʹटोस] हा शब्द ‘सध्या अस्तित्वात असलेले जग’ . . . आणि [जिनियाʹ हाऊट] ‘सध्या हयात असणारी पिढी’ हा याचा अर्थ होय. (उदा. मत्त १२:४१एफ., ४५; २४:३४).” डॉ. जॉर्ज बी. वायनर लिहितात: “[हाऊʹटोस] काहीवेळा हे सर्वनाम स्थानिक रीत्या अगदी जवळच्या स्थानी असलेल्या नामास नव्हे तर त्यापासून फार दूर असलेल्या नामास सूचित करते जे प्रमुख विषय या अर्थाने लेखकाच्या मानसिकरीत्या अगदी जवळ म्हणजे त्याच्या विचारांपैकी अगदी अलीकडचे होते.”—नव्या कराराच्या वाक्यप्रचाराचे व्याकरण, (इंग्रजी), ७ वी आवृत्ती, १८९७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा