वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. ३२
  • ‘लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते तसे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते तसे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. ३२

‘लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते तसे’

सा. युगाचे तिसरे शतक संपत आले होते तेव्हा, “कॉप्टिक ख्रिश्‍चन” म्हणण्यात आलेल्या ॲन्थोनी नामक एका उत्सुक युवकाने जगापासून निवृत्ती घेतली व २० वर्षे वाळवंटात एकांतवासात घालवली. का बरे? त्याच्या मते देवाची सेवा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता. तो ख्रिस्ती धर्मजगताचा पहिलाच प्रभावी वैरागी किंवा तपस्वी होता.

आता, ख्रिस्ती धर्मजगतात मोजकेच वैरागी आहेत. परंतु अधिकाधिक लोक, इतर मार्गाने एकांत शोधण्याचा प्रयत्न करतात. धर्माविषयी बोलल्याने मतभेद व झगडे उत्पन्‍न होतात असे वाटल्यामुळे, ते याविषयी इतरांशी बोलण्याचे टाळतात. स्वतःच्या शेजाऱ्‍याचे कोणतेही नुकसान न करणे एवढेच काय ते त्यांच्या उपासनेत समाविष्ट असते.

आपल्या शेजाऱ्‍याचे कोणतेही नुकसान न करणे हा खऱ्‍या धर्माचा भाग आहे हे खरे असले तरीही, आणखीही काही जरुरीचे आहे. एक प्राचीन नीतिसूत्र म्हणते: “लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते. माणूस माणसाची बुद्धी तीक्ष्ण करतो.” (नीतिसूत्रे २७:१७, कॉमन लँग्वेज बायबल) खरे तर, बायबल ख्रिस्ती लोकांना एकत्रित येण्याचे प्रोत्साहन देते, जग किंवा इतर ख्रिश्‍चनांपासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवण्याचे नव्हे. (योहान १७:१४,१५) ते म्हणते: ‘आपले एकत्र मिळणे न सोडता. . .प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.’ (इब्रीयांस १०:२४, २५) यहोवाचे साक्षीदार त्या सल्ल्याचे पालन करतात. ते आठवड्यातून अनेकदा, एकमेकांची ‘बुद्धी तीक्ष्ण करावयास’ व सहविश्‍वासू बांधवांचा विश्‍वास मजबूत करावयास एकत्रित येतात. प्रामाणिकपणे बायबलची चर्चा केल्याने झगडे उत्पन्‍न होत नाहीत असे त्यांना दिसून येते. त्याऐवजी, ते सुसंघटितपणा व शांतीकडे नेते. असे करणे खऱ्‍या भक्‍तीतील महत्त्वपूर्ण भाग आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा