वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. २९
  • जेवणाचा डबा साक्ष देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जेवणाचा डबा साक्ष देतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२००५
  • चौकटी
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “इतकं प्रेम पाहून आमचं मन भरून आलं”
    सावध राहा!—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. २९

जेवणाचा डबा साक्ष देतो

मागील जानेवारीमध्ये कोबे, जपान येथे भूकंप झाला. भूकंपग्रस्त क्षेत्रातील लोकांना भूकंपानंतर काही दिवसांनी अन्‍न मिळविणे कठीण झाले. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या मित्रांच्या प्रेमळ सहकार्यामुळे अन्‍नाची कमतरता भासली नाही. भूकंपानंतर सुरवातीचे दोन-तीन दिवस शेजारील मंडळ्यांनी तांदूळ पुरविला. काळजी घेणारे मित्र लवकरच जेवणाचे डबे पुरवत होते. अनेकांनी या जेवणाच्या डब्यांसह भूकंपग्रस्तांविषयी चिंता व्यक्‍त करणारे अभिप्राय जोडले होते. जेवण प्राप्त झालेले म्हणाले की, लिहिलेले अभिप्राय वाचून स्वतःचे अश्रू आवरता न आल्यामुळे जेवण “खारट” झाले होते.

यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांचे अन्‍न इतर गरजवंतांना दिले. एक साक्षीदार कारने प्रवास करत असताना त्याचे दुपारचे जेवण करत होता; त्यावेळी त्याच्यासोबत त्याच कारखान्यात काम करणारा एक गैर-साक्षीदारही होता. यास्तव त्याला प्राप्त झालेल्या डब्यांपैकी त्याने एक डबा त्याला दिला.

“तुम्ही हा डबा कोठून विकत घेतला?” साक्षीदाराच्या सहकाऱ्‍याने त्यास विचारले. बांधवाने साक्षीदारांच्या मदत कार्याविषयी स्पष्टीकरण दिले. “मी कित्येक दिवसांपासून भाज्या खाल्या नाहीत. मी माझ्या कुटुंबाकरता घरी घेऊन जाण्यासाठी काही भाजी शिल्लक ठेवणार आहे,” त्या मनुष्याने कृतज्ञतेने म्हटले.

असे तीन वेळा झाले, साक्षीदाराच्या सहकामगाराने त्यास ३,००० येन (सुमारे $३५, अमेरिकी) दिले आणि म्हटले: “मी तुमच्या कार्यांविषयी परिचित आहे, त्यामुळे कृपया मला ही देणगी देऊ द्या. मला दुपारचे जेवण दिल्याची मी गुणग्राहकता बाळगतो. खरोखरच, तुमचे सर्व मित्र किती चांगले लोक आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा