तळटीप
a “ही पिढी” या अभिव्यक्तीमध्ये दर्शक सर्वनामाचे हाऊʹटोस चे स्वरूप इंग्रजी “धीस” या शब्दाशी अनुरूप आहे. ही अभिव्यक्ती काहीतरी उपस्थित असल्याचे किंवा वक्त्याच्या समक्ष असलेल्या गोष्टीला सूचित करू शकते. परंतु तिचे आणखी इतरही अर्थ असू शकतात. द इक्झेजिटिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेन्ट (१९९१) टिप्पणी करते: “[हाऊʹटोस] हा शब्द निकट वस्तुस्थितीला संबोधतो. अशा प्रकारे [आयन हाऊʹटोस] हा शब्द ‘सध्या अस्तित्वात असलेले जग’ . . . आणि [जिनियाʹ हाऊट] ‘सध्या हयात असणारी पिढी’ हा याचा अर्थ होय. (उदा. मत्त १२:४१एफ., ४५; २४:३४).” डॉ. जॉर्ज बी. वायनर लिहितात: “[हाऊʹटोस] काहीवेळा हे सर्वनाम स्थानिक रीत्या अगदी जवळच्या स्थानी असलेल्या नामास नव्हे तर त्यापासून फार दूर असलेल्या नामास सूचित करते जे प्रमुख विषय या अर्थाने लेखकाच्या मानसिकरीत्या अगदी जवळ म्हणजे त्याच्या विचारांपैकी अगदी अलीकडचे होते.”—नव्या कराराच्या वाक्यप्रचाराचे व्याकरण, (इंग्रजी), ७ वी आवृत्ती, १८९७.