संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार भारत
भारत! पृथ्वीवरील या विस्तृत खंडप्राय देशात ६ पैकी १ मनुष्य राहतो. सर्व जमेस धरून, विविधता असलेल्या या देशात सुमारे १,००० भाषा आणि पोटभाषा बोलल्या जातात. येथे ८३ टक्के हिंदूंचे प्राबल्य असून, बाकीचे ११ टक्के मुस्लिम, शीख, बुद्ध, जैन आणि नामधारी ख्रिस्ती आहेत.
भारतामधील यहोवाचे साक्षीदार अलीकडच्या काळामध्ये उल्लेखनीय यशाचा आनंद लुटत आहेत. त्यांना, सर्व प्रकारचे दबाव आणि विरोध असताना देखील यहोवाच्या राज्याच्या बाजूने दृढपणे उभे राहू इच्छिणारे मेंढरासमान लोक आढळले आहेत.
उदाहरणार्थ, एका कर्मठ हिंदू कुटुंबात एक मुलगी बालपणापासूनच पोलिओमुळे अधू झाली होती. तिला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे ती देव आणि जीवनाबद्दलच्या उद्देशाबद्दल विचार करू लागली. उत्तर शोधण्यासाठी तिने अनेक धर्मांचे परीक्षण केले पण तिला काही सांत्वन मिळाले नाही. परिणामी, धर्मावरील तिचा विश्वास उडाला, पण देवावरील नाही.
या वेळेत, दोन साक्षीदार त्यांचे घरोघरचे कार्य करत असताना या मुलीला भेटले. ती आठवून सांगते: “त्यांनी मला प्रकटीकरण २१:४ वाचून दाखवल्यावर माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरारले.” तिने वॉचटावर संस्थेची पुष्कळ प्रकाशने स्वीकारली व तिच्या आईचा विरोध असतानाही गृह बायबल अभ्यास करण्यास तयार झाली. या मुलीने तिच्या जीवनात अनेक बदल केले, नातलगांकडून येणाऱ्या दबावाला तिने धैर्याने तोंड दिले व बाप्तिस्मा घेतलेली साक्षीदार बनली. ती म्हणते: “मी पुष्कळ प्रगती केली आहे, आणि ही प्रगती करणे अतिशय कठीण होते. पण यहोवा देव माझ्यासोबत सतत आहे व त्याने मला पुष्कळ शांती आणि आनंद दिला.”
शाळेमध्ये शुद्ध भक्तीसाठी दृढ
एका तरुण बहिणीला तिच्या शिक्षिकेने बाकीच्या वर्गासोबत कॅथलिक चर्चला जाण्यास सांगितले. तेव्हा ती एक यहोवाची साक्षीदार आहे व यहोवा व्यतिरिक्त ती कोणाचीही किंवा कशाचीही उपासना करणार नाही असे सांगून त्या बहिणीने आदराने नकार दिला. पण इतर सर्व गेले म्हणून तुलाही गेलेच पाहिजे असे शिक्षिका म्हणाली. परंतु, ती बहीण दृढ राहिली व म्हणाली, की चर्चला जाणारे यहोवाला प्रार्थना करणार नाहीत म्हणून ती तेथे जाऊ शकत नाही हे तिला माहीत होते.
या मुलीच्या दृढतेमुळे तिच्या शिक्षिकेला आणखी जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणून दुसऱ्या दिवशी त्या बहिणीने तिला यहोवाची उपासना करण्याविषयीचा लेख असलेले टेहळणीबुरूज दिले. शिक्षिकेने जे काही वाचले त्यामुळे प्रभावीत होऊन तिने या बहिणीला शाळेतील सर्व धार्मिक कार्यातून सूट दिली. ती बहीण तिच्या शिक्षिकेला आणि इतर शिक्षिकांना दहा नियतकालिके सादर करू शकली.
रक्ताविषयी असलेल्या देवाच्या नियमाचे पालन केल्यामुळे प्रतिफळ
अलीकडे केरळ राज्यातील काही भागांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या ज्वराची साथ आली होती. या आजारामुळे मूत्रपिंडांची जबर हानी होते व त्यामुळे रोग्याला डायलेसिसची गरज भासते. सर्वसामान्यपणे रक्त संक्रमण केले जाते. या आजारामुळे एका शहरामध्ये १४ लोकांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. यांपैकी एक रूग्ण स्थानिक मंडळीत वडील या नात्याने कार्य करणारा एक साक्षीदार होता. रक्त संक्रमण हाच केवळ एक उपचार उपलब्ध आहे असे त्याला सांगण्यात आले. त्या वडिलाने त्याच्या शास्त्रवचनीय विश्वासाचे स्पष्टीकरण देऊन ठामपणे रक्त घेण्यास नकार दिला. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) पुष्कळ वादविवादानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याने रक्त संक्रमण न घेतल्यामुळे तो त्याच्या जीवनास मुकेल.
इतर १३ रुग्णांनी रक्त घेतले. पण, दुःखाची गोष्ट अशी की काही दिवसातच त्या सर्वांचे निधन झाले. तो एकटाच बांधव वाचला! इस्पितळातील अधिकाऱ्यांना हे पाहून आश्चर्य वाटले. मंडळीतील सदस्यांच्या नियमित भेटी पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर बराच प्रभाव पडला. इस्पितळातून घरी जाताना तो बांधव डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटावयास गेला, पण ते त्याला म्हणाले: “आमचे आभार का मानता? तुमचा देव यहोवा याचे आभार माना. त्यानेच तर तुम्हाला वाचवले. कृपया तुमच्या यहोवा देवाजवळ आमच्यासाठी देखील प्रार्थना करा.”
[२४ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र
१९९४ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: १४,२७१
प्रमाण: ६५,२६६ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: ३८,१९२
पायनियर प्रचारकांची सरासरी: १,७८०
बायबल अभ्यासांची सरासरी: १२,४५३
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: १,३१२
मंडळ्यांची संख्या: ४१०
शाखा दप्तर: लोणावळा
[२५ पानांवरील चित्रं]
शाखा दप्तर, लोणावळा
[२५ पानांवरील चित्रं]
१९६३ मध्ये झालेल्या “सार्वकालिक सुवार्ता” अधिवेशनाच्या संबंधाने साक्षकार्य
[२५ पानांवरील चित्रं]
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बाहेर एका विक्रेत्याला प्रचार करताना