“मी विश्वास राखिला आहे”
ब्रुनेल्लॉ इंकाँडीटीच्या मित्रमैत्रिणींद्वारे कथित
“तो शनिवारचा फार कंटाळवाणा आणि एकाकी दिवस होता. मी खोलीत एकटीच होते, आणि मला आशाहीन वाटत होते. मी जणू काय गॅलरीतून चालत जात आहे असे मला वाटत होते. सर्व काही सुरळीत चालले होते, आणि अचानक कोणीतरी माझ्या समोरचा दरवाजा धाडक्न लावून घेतला, मी किती जोराने प्रयत्न केला तरी, तेथून निघण्यासाठी मार्ग नव्हता.”
पराकाष्ठेला पोंहचलेल्या निराशेने, १५ वर्षीय ब्रुनेल्लॉ इंकाँडीटीच्या हृदयाला भारावून टाकले. तिच्या तारूण्यभरीत जीवनातील सर्वात मुख्य दिवस निसटून जात होता. त्या वर्षी पूर्वी, यहोवासाठी आणि पवित्र शास्त्राबद्दलच्या तिच्या वाढत्या प्रीतीने तिला तिचे जीवन त्याला समर्पित करण्यासाठी प्रवृत्त केले. जुलै १९९० मध्ये, मॉनट्रील, कॅनडा येथे, “शुद्ध वाणी” या यहोवाच्या साक्षीदारांच्या होणाऱ्या प्रांतीय अधिवेशनात तिचा बाप्तिस्मा होणार होता. त्या ऐवजी, ब्रुनेल्लॉ तिच्या विश्वासाच्या परीक्षेचा सामना करीत होती जे तिच्या उरलेल्या सर्व जीवनाला टिकवून ठेवणार होते.
तिच्या समर्पणाला पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चित्रित करण्याच्या केवळ दोन दिवसांआधी, ब्रुनेल्लॉला कळून आले की तिला ल्युकेमिया आहे. स्थानिक मुलांच्या इस्पितळातील चिकित्सक तिच्यावर लगेच उपचार चालू करण्यास इच्छित होते, आणि म्हणून ब्रुनेल्लॉला इस्पितळातच राहिली.
तिचे स्वतःचे शब्द डॉक्टारांना प्रवृत्त करतात
ब्रुनेल्लॉला हे माहीत होते की रक्त, यहोवा देवाला पवित्र आहे. (लेवीय १७:११) तिचे पालक, एडमोन्डो आणि निकोलेटॉ, यांनी एक अट घातली होती की, त्यांच्या मुलीच्या उपचारात रक्त संक्रमण वापरू नये. तिचे वडील आठवून सांगतात, “ब्रुनेल्लॉला, ती अज्ञान होती तरीही, ही गोष्ट डॉक्टरांना स्वतःहून सांगायची इच्छा होती. तिने त्यांना अगदी धैर्याने सांगितले की तिला, पवित्र शास्त्राच्या, ‘रक्त यापासून अलिप्त रहा’ या आज्ञेचे उल्लंघन करणारे कोणतेही उपचार नको होते.”—प्रे. कृत्ये १५:२०.
जुलै १०, १९९० रोजी, तीन डॉक्टर, आणि एक समाज सेविका, ब्रुनेल्लॉचे पालक आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीतील दोन सेवकांना भेटले. चाचणीद्वारे हे स्पष्ट झाले की ब्रुनेल्लॉला ॲक्यूट लिंफोब्लास्टिक ल्यूकेमिया आहे. डॉक्टरांनी त्यांना या रोगाविरूद्ध लढण्याच्या योजने विषयीचे स्पष्टीकरण दिले. त्यांना सहानुभूतीपूर्वकतेने समजावून सांगितले की हा उपचार अतिशय कठीण होता. मंडळीच्या एका वडिलांना आठवते की, “ब्रुनेल्लॉचे वर्तन आणि देवाची आज्ञा पाळण्याचा दृढ निश्चय पाहून डॉक्टर आणि समाज सेविकेला प्रवृत्त केले. ते, तिच्या पालकांची प्रीती आणि ख्रिस्ती मंडळीतील मित्रांचा पाठिंबा पाहून प्रभावित झाले. आम्ही त्यांच्या स्थानाला ज्याप्रकारे समजून घेतले व आदर दिला याचीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.”
डॉक्टरांचा, रक्त संक्रमण टाळण्याचा हेतू होता. ब्रुनेल्लॉला विस्तृत प्रमाणावर रसायनोपचार मिळत होते, परंतु ते नेहमीपेक्षा कमी अपायकारक होते. हे, उपचार होत असताना तिच्या रक्ताच्या कोषिकांचे नुकसान कमी प्रमाणात करू शकेल. निकोलेटॉ म्हणते, “डॉक्टरांनी ब्रुनेल्लॉच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरजांना विचारात घेतले. आम्ही त्यांना जेव्हा सांगितले की, त्यांनी मुलांच्या ल्युकेमियावर रक्ताविना उपचार करणाऱ्या एखाद्या विशेषज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तेव्हा, ते तयार झाले.” ब्रुनेल्लॉ आणि इस्पितळातील कर्मचारी वर्गामध्ये उबदार स्नेहसंबंध जोडला गेला.
आध्यात्मिक ध्येय
प्रथमोपचाराचे चांगले परिणाम होत असले तरी, ब्रुनेल्लॉची कसोटी नुकतीच सुरू झाली होती. नोव्हेंबर १९९० पर्यंत तिचा आजार जरा कमी झाला होता, म्हणून तिने विलंब न लावता बाप्तिस्मा घेतला. ब्रुनेल्लॉने कबूल केले: “ते इतके सोपे मुळीच नव्हते. त्यासाठी तुम्हाला खूप शक्तीची आवश्यकता आहे, आणि तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. . . . माझ्या विश्वासाची परीक्षा होत होती, परंतु मी दृढ राहिले आणि अजूनही माझा नियमित पायनियर [पूर्ण वेळची सेवक] होण्याचा जीवन मार्ग आहे.”
१९९१ च्या सुरवातीला, ब्रुनेल्लॉचा आजार उलटला. रसायनोपचार घेत असताना, ती जवळ जवळ मरायलाच टेकली होती, परंतु सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना घडली, ती बरी झाली. ऑगस्टपर्यंत ती साहाय्यक पायनियर या नात्याने त्या महिन्यात जाहीर सेवेत भाग घेऊ शकली. तिचा आजार पुन्हा बळावला, आणि नोव्हेंबर १९९१ मध्ये तिच्या शरीराच्या विविध ठिकाणी कर्क झाला. दुसऱ्या इस्पितळातील दुसरे डॉक्टर्स तिच्यावर प्रारणोपचार करू लागले.
अशा कठीण परिस्थितीत असताना देखील, ब्रुनेल्लॉ खंबीर राहिली आणि स्वतःसाठी आध्यात्मिक ध्येयांना समोर ठेवले. तिला ल्युकेमिया झाला आहे हे पहिल्यांदा कळल्यावर तिला सांगण्यात आले होते की, ती केवळ सहा महिन्यांसाठी जगणार आहे. आता, दीड वर्ष लोटल्यावरही, ब्रुनेल्लॉ अजूनही भवितव्यासाठी योजना आखत होती. मंडळीच्या एका वडिलांनी तिच्याबद्दल म्हटले की: “तिच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी तिने वेळ दवडली नाही. ब्रुनेल्लॉच्या, देवाने अभिवचन दिलेल्या नंदनवनावरील विश्वासाने तिला तिच्या कसोटीत टिकवून ठेवले. तरुण वयातच ती ख्रिस्ती प्रौढतेप्रत पोंहचली. तिच्या वर्तणूकीने आणि मनोवृत्तीने मंडळीला प्रेरणा दिली, आणि तिने तिला ओळखणाऱ्यांचे, त्यामध्ये इस्पितळातील कर्मचारी वर्ग देखील होता, सर्वांचे मन जिंकले.” तिच्या आईला आठवते: “तिने कधीही कुरकुर केली नाही. कोणीही तिला विचारले की तिला कसे वाटत होते तेव्हा, ती उत्तर देई, ‘उत्तम’ किंवा ‘जरासे बरे वाटते, तुमच्याबद्दल काय?’”
सुरक्षित भवितव्य
ब्रुनेल्लॉने, जुलै १९९२ मधील, यहोवाच्या साक्षीदारांच्या “ज्योती वाहक” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या योजना केल्या. परंतु, संमेलनाच्या वेळेपर्यंत ब्रुनेल्लॉ इस्पितळात होती, आणि तिचे जीवन कमी होत चालले होते. तरीही ती यहोवाच्या दृष्टीने योग्य ते करत राहणे हे नाटक पाहण्याच्या उद्देशाने त्या अधिवेशनाला चाक खुर्चीच्या साहाय्याने उपस्थित राहिली.
ती इस्पितळातून तिच्या जीवनाचे शेवटले दिवस तिच्या कुटुंबासमवेत घालवण्यासाठी घरी आली. निकोलेटॉ म्हणते, “अगदी शेवटपर्यंत तिला स्वतःपेक्षा इतरांची काळजी वाटत होती. ती त्यांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचे उत्तेजन देत होती आणि त्यांना म्हणे, ‘आपण लवकरच एकमेकांना नंदनवनात भेटू.’”
ब्रुनेल्लॉ, जुलै २७, १९९२ रोजी, पृथ्वीवरच्या नंदनवनातील जीवनाच्या पुनरूत्थानाच्या तिच्या आशेत दृढ राहून मरण पावली. तिने तिच्या ध्येयांना गाठण्यास नुकतेच चालू केले होते, परंतु तिने तिच्या समर्पित मार्गाला पुनरूत्थानानंतर पुन्हा चालू करण्याचे योजिले. ती मरण पावण्याच्या काही दिवसांआधी, ब्रुनेल्लॉने पुढील पत्र लिहिले जे तिच्या स्मारक सेवेदरम्यान वाचण्यात आले.
“प्रिय मित्रांनो:
“तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तुमची उपस्थिती माझ्या कुटुंबाला खूप काही अर्थ राखून होती.
“माझ्या अगदी जवळच्यांसाठी—आपण खूप त्रासातून गेलो. आपल्या समोर पुष्कळ वाईट प्रसंग देखील आले, परंतु त्यांच्या सोबत काही आनंदाचे क्षण देखील होते. हा झगडा फारच कठीण व लांब होता, परंतु त्यात मी हरले असे मला वाटत नाही. शास्त्रवचनात लिहिले त्याप्रमाणे, ‘मी सुयुद्ध लढले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.’—२ तीमथ्य ४:७.
“शिवाय मी पुष्कळ गोष्टी शिकले, आणि त्यानुसार वाढही केली, आणि माझ्या आवतीभोवती असलेल्या मित्रमैत्रिणींनी आणि इतरांनी माझ्यामध्ये होणारे बदल पाहिले आहेत. मी, मला पाठिंबा देणाऱ्या त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.
“नव्या व्यवस्थेत आणि यहोवामध्ये विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांना, योहान ५:२८, २९ मध्ये सांगितल्याप्रमाणे पुनरूत्थान होणार असल्याचे माहीत आहे. यास्तव, सत्यामध्ये दृढ रहा, आणि आपण एकमेकांना पुन्हा भेटू शकू.
“मी ज्या परिस्थितीतून पार झाली आहे त्याबद्दल माहीत असणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. मी तुम्हा प्रत्येकाला मिठी मारून चुंबन देते. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.”
ब्रुनेल्लॉने तिचे तारूण्य किंवा तिच्या आजाराला तिने देवाला केलेल्या समर्पणाला पुढे ढकलण्यास वाव दिला नाही. तिचा विश्वास आणि दृढनिश्चयाचे उदाहरण, तरुण असो की वृद्ध सर्वांना जीवनाच्या शर्यतीत धावताना अटकाव करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकण्यास उत्तेजन देते.—इब्रीयांस १२:१.