गत काळातील ईश्वरी कुटुंबे आपल्या दिवसांकरता एक नमुना
कुटुंब—याविषयावर संयुक्त राष्ट्राने जागतिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. ते कसे? १९९४ वर्ष “आंतरराष्ट्रीय कौटुंबिक वर्ष” असे घोषित करून. जागतिक नेते, समाजवादी आणि कौटुंबिक सल्लागारांनी, बेकायदेशीर जन्म आणि आकाशाला भिडणारे घटस्फोटाचे प्रमाण या गोष्टींमध्ये झालेल्या वाढीबद्दल लगेचच दुःख व्यक्त केले असले तरी, अशा प्रकारच्या समस्यांवर व्यवहार्य, वास्तविक उपाय शोधून काढण्यात ते मागे पडले आहेत.
बायबलमध्ये कौटुंबिक समस्यांवर उपाय आहेत असे होऊ शकते का? आजच्या कुटुंबांमध्ये बायबलचा फायदा होऊ शकतो असे सुचवणे काहींना भोळसटपणाचे वाटेल. कारण की, त्याचे लिखाण शतकांआधी मध्य पूर्वेच्या परिस्थितीत आणि संस्कृतीत झाले होते. जगाच्या बहुतेक भागांमध्ये बायबल काळानंतर जीवन आमूलाग्रपणे बदलले आहे. तरीपण, प्रत्येक कुटुंबाला ज्याचे नाव देण्यात आले आहे त्या यहोवा देवाने बायबलला प्रेरित केले आहे. (इफिसकर ३:१४, १५; २ तीमथ्य ३:१६) कौटुंबिक समस्यांबद्दल बायबल काय सांगते?
कौटुंबिक जीवन आनंदी आणि सिद्धिस नेण्यासाठी नक्की कशाची गरज आहे ते यहोवाला माहीत आहे. यास्तव, त्याचे वचन बायबलला सल्ल्याच्या रूपामध्ये कौटुंबिक जीवनाबद्दल पुष्कळ सांगायचे आहे. बायबलमध्ये ईश्वरी तत्त्वांचा उपयोग केलेल्या कुटुंबांची उदाहरणे देखील आहेत. त्यामुळे त्यांनी वास्तविक जवळीक आणि समाधानाचा आनंद लुटला. आपण बायबल काळातील कौटुंबिक जीवनाकडे एक नजर टाकून, त्यातून कोणते धडे शिकता येतात ते पाहू या.
मस्तकपद—कष्टमय?
उदाहरणार्थ, कुटुंबाच्या मस्तकपदाच्या बाबीचा विचार करा. कुलपित्यांच्या काळामध्ये, अब्राहाम, इसहाक आणि याकोब निर्विवादपणे “कुलपति” [कुटुंब प्रमुख] होते. (प्रेषितांची कृत्ये ७:८, ९; इब्रीयांस ७:४) राल्फ गोवर यांचे बायबल काळातील नव्या रीती आणि रीवाज (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “कुटुंब . . . एका ‘लहानशा राज्याप्रमाणे’ होते ज्यावर पिता राज्य करीत असे. त्याने पत्नी, मुले, नातवंडे आणि नोकर—घरातील सर्वांवर राज्य केले.” खरेच, कुलपित्यांना स्वतःच्या तसेच त्यांच्या पुत्राच्या कुटुंबावर देखील अधिकार होता.—पडताळा उत्पत्ति ४२:३७.
मग यामुळे आपल्या पत्नींचा आणि मुलांचा जाच करण्यासाठी त्यांना परवाना मिळाला नाही का? मुळीच नाही. “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील,” असे देवाने पहिल्या स्त्रीला सांगितले होते हे खरे आहे. (उत्पत्ति ३:१६) विवाहित स्त्रियांची सामान्य स्थिती काय असेल ते या शब्दांवरून सूचित होते, पण देवाच्या खऱ्या उपासकांमध्ये परिस्थिती कशी असली पाहिजे त्यांचे वर्णन हे शब्द देत नाहीत. देव-भीरू पतींना यहोवाचा मूळ उद्देश लक्षात ठेवायचा होता. यहोवाने स्त्रीला पुरुषाची “अनुरूप साहाय्यक” म्हणून निर्माण केली, त्याची दासी म्हणून नव्हे. (उत्पत्ति २:२०) पूर्वीच्या काळातील ईश्वरी पुरुषांनी देवाला त्यांना दाखवण्याची अधीनता आणि जाब देण्याची जबाबदारी ओळखल्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केला नाही. पत्नी आणि मुलांना दास म्हणून वागवणे हे तर दूरच राहिले, पण देव-भीरू कुलपित्यांनी त्यांना खरे प्रेम आणि ममता दाखवली.
मुलांना सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या ममतेची एक झलक उत्पत्ति ५०:२३ मध्ये दिली आहे. तेथे योसेफाच्या पतवंडांबद्दल सांगितले आहे की ती, “योसेफाच्या मांडीवर वाढली.” (पंडिता रमाबाई भाषांतर) योसेफाने या मुलांना आपले वंशज म्हणून कबूल केले असा यातून अर्थ होत असला तरी, तो प्रेमळपणे त्यांच्याशी खेळला, आपल्या मांडीवर त्याने त्यांचे लालनपालन केले ही गोष्ट देखील त्यावरून सूचित होते. पिता देखील आज आपल्या मुलांना अशा प्रकारे प्रेम दाखवतात.
कुटुंब प्रमुख या नात्याने देव-भीरू कुलपित्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांची देखील काळजी वाहिली. विश्वव्यापी जलप्रलयानंतर तारवातून बाहेर पडल्यावर “नोहाने परमेश्वरासाठी [यहोवा, NW] वेदी बांधिली आणि . . . वेदीवर . . . होमार्पण केले.” (उत्पत्ति ८:२०; पडताळा ईयोब १:५.) विश्वासू कुलपिता अब्राहामाने कौटुंबिक सदस्यांना व्यक्तिगत सूचना देऊन एक चांगले उदाहरण मांडले. त्याने त्याच्या ‘लेकरांस व त्याच्या पश्चात त्याच्या घराण्यास आज्ञा दिली जेणेकरून ते न्यायनीतिने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरतील.’ (उत्पत्ति १८:१९) अशा प्रकारे प्रेमळ मस्तकपदाने कुटुंबाच्या भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणाला हातभार लावला.
आज ख्रिस्ती पुरुष हाच नमुना अनुसरतात. देवाच्या गरजांचे पालन करण्यास व स्वतः एक उदाहरण राखून, ते त्यांच्या कुटुंबाला उपासनेच्या बाबतीत मदत करून आपल्या मस्तकपदाचा वापर करतात. (मत्तय २८:१९, २०; इब्रीयांस १०:२४, २५) कुलपित्यांप्रमाणे ख्रिस्ती पती आणि पिता आपल्या कौटुंबिक सदस्यांना व्यक्तिगत सूचना देण्यासाठी वेळ काढतात.
निर्णायक पाऊल उचलणे
आपल्या सासऱ्याचे सर्व कर्ज फेडल्यानंतर कुलपिता याकोबाने विचारले: “तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू?” (उत्पत्ति ३०:३०) सर्व पित्यांप्रमाणे याकोबालाही त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्याची जबाबदारी वाटली आणि त्याने ती पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम घेतले. उत्पत्ति ३०:४३ म्हणते: “तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केली.”
परंतु, काही वर्षांनंतर म्हणजे याकोब कनान देशात राहण्यासाठी आला तेव्हा त्याची मुलगी दीना हिला मूर्तिपूजक कनानी लोकांच्या सहवासाची घातक सवय लागल्याचे त्याला माहीत देखील नव्हते हे अगदी उघड आहे.a (उत्पत्ति ३४:१) त्याच्या घरामध्ये काही धार्मिक वस्तू होत्या हे त्याला कळल्यावरही त्याने कोणतीच पाऊले उचलली नाहीत. काहीही असो, एका कनानी पुरुषाने दीनावर बलात्कार केल्यानंतर याकोबाने निर्णायक पावले उचलली. “तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला,” असा त्याने निदेश दिला.—उत्पत्ति ३५:२-४.
ख्रिस्ती पित्यांनी, त्यांच्या कुटुंबांच्या आध्यात्मिकतेची गोष्ट सामोरी येते तेव्हा दक्ष असले पाहिजे. कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणाला गंभीर धोके, जसे की अनैतिक वाङ्मय किंवा अहितकारक संगीत घरामध्ये असल्यास त्यांनी निर्णायक पावले उचलली पाहिजे.
आस्थेची गोष्ट म्हणजे, सारा, रिबका आणि राहेलसारख्या विश्वासू स्त्रियांनी देखील कुटुंबावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. त्या त्यांच्या पतींच्या आज्ञेत असल्या तरी, योग्य आणि आवश्यक समयी पुढाकार घेण्यास त्यांना कोणतेच निर्बंध नव्हते. उदाहरणार्थ, निर्गम ४:२४-२६ आपल्याला सांगते की, मोशे आणि त्याचे कुटुंब इजिप्तला जात असताना “परमेश्वराने [“यहोवाच्या दूताने,” सेप्टूजेंट] त्याला [मोशेच्या मुलाला] गाठून जिवे मारावयास पाहिले.” स्पष्टतः, मोशेच्या मुलाचा तेथे वध झाला असता कारण मोशेने त्याची सुंता केली नव्हती. सिप्पोराने तेथे त्वरित पाऊल उचलले आणि तिच्या मुलाची सुंता केली. परिणामी, देवदूताने त्याला सोडून दिले. आज, ख्रिस्ती पत्नी देखील अशाच प्रकारे योग्य समयी पुढाकार घेऊ शकतात.
मोशेच्या नियमशास्त्राधीन पितृवत सूचना
सा. यु. पूर्व १५१३ मध्ये इस्राएल एक राष्ट्र बनले तेव्हा पितृसत्ताक युग समाप्त झाले. (निर्गम २४:३-८) पिता कुटुंब प्रमुख म्हणूनच कार्य करत राहिले. परंतु कौटुंबिक नियम, देवाने मोशेला दिलेल्या व नियुक्त न्यायाधीशांच्या प्रशासनाखाली राष्ट्रीय नियमांच्या दुय्यमस्थानी आले. (निर्गम १८:१३-२६) लेवीय याजकपणाने उपासनेच्या अर्पणाचे पैलू हाती घेतले. तरीदेखील, पिता एक मुख्य भूमिका बजावत होते. मोशेने आर्जवले: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७.
नियमशास्त्राने वल्हांडणा सारख्या प्रसंगांची तरतूद केली तेव्हा, औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारे सूचना दिल्या जाऊ शकत होत्या. निसान १४ म्हणजे, वल्हांडण सण जसजसा जवळ येत असे, तसे यहुदी कुटुंबे रूढीप्रमाणे जेरुसलेमला प्रवास करण्याची तयारी करू लागत असत. (अनुवाद १६:१६; पडताळा लूक २:४१.) अशा तयारीमध्ये कोणत्या मुलाला अत्यानंद होणार नाही? तो प्रवासच मुळात आनंदविणारा होता. तोपर्यंत वर्षा ऋतू संपून शरद ऋतूच्या सूर्याने हवेतील हिवाळ्याचा गारवा काढण्यास नुकतीच सुरवात केली. जसजसे हर्मोन पर्वताचा हिम वितळे, तसे यार्देन नदी काठोकाठ भरून वाही.
प्रवास करताना, पिता त्यांच्या मुलांना त्यांच्या देशाचा केवळ भूगोलच नव्हे तर ते ज्या स्थळांना पार करून जात त्या स्थळांशी निगडित असलेल्या समृद्ध इतिहासाबद्दल देखील शिकवू शकत होते. ज्यामध्ये, नियमशास्त्रातील आशीर्वाद आणि शाप वाचून दाखवण्यात आले त्या एबाल आणि गरिज्जीम पर्वतांचा समावेश असू शकतो. ते कदाचित, याकोबाने वैभवी शिडीचे स्वप्न पाहिले ते ठिकाण म्हणजे बेथेल देखील ओलांडून जातील. किती रोमांचकारी चर्चा होत असाव्यात! प्रवास करत असताना देशातील इतर कुटुंबांचे गट त्यांना सामील होत तेव्हा सर्व जण उभारणीकारक सहवासाचा आनंद लुटत असतील.
शेवटी ते कुटुंब, “सौंदर्याची पूर्णता” असणाऱ्या जेरुसलेममध्ये प्रवेश करत. (स्तोत्र ५०:२, पं. र. भाषांतर) आल्फ्रेड एडरशीम हे विद्वान म्हणतात: “अनेक यात्रेकरुंनी कदाचित शहराच्या भिंतींच्या बाहेर तंबू उभारले असावेत. शहराच्या आत राहणाऱ्यांची व्यवस्था निःशुल्क होती.” होय, इब्री युवकांना बंधुप्रीती आणि आदरातिथ्य करण्यामध्ये साक्षात धडा मिळाला. यहोवाच्या साक्षीदारांची वार्षिक अधिवेशने देखील हाच उद्देश साध्य करतात.
मग निसान १४ येत असे. वल्हांडणाच्या पशूला कापून पुष्कळ तास भाजत ठेवले जात. जवळजवळ मध्यरात्रीच संपूर्ण कुटुंब तो कोकरा, बेखमीर भाकरी आणि कडू भाजी खात असत. रीतीनुसार मुलगा विचारी: “ह्या सेवेचा अर्थ काय?” तेव्हा पिता औपचारिक सूचना देऊन म्हणत असत: “हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरांतील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.”—निर्गम १२:२६, २७; १३:८.
इस्राएलचा राजा शलमोन म्हणाला: ‘हसण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो.’ (उपदेशक ३:४) इस्राएली मुलांना मनोरंजनासाठी वेळ दिला जात होता. स्पष्टपणे येशू ख्रिस्ताने मुलांना बाजारात खेळताना पाहिले. (जखऱ्या ८:५; मत्तय ११:१६) तसेच पालकांच्या ऐपतीनुसार, संगीत, नृत्य आणि मेजवानीची व्यवस्था असलेल्या सुखकर कौटुंबिक मेळाव्याची योजना करणे असामान्य गोष्ट नव्हती. (लूक १५:२५) आजही ख्रिस्ती पालक त्यांच्या मुलांना हितकारक मनोरंजन व सहवास पुरवण्यात पुढाकार घेतात.
यहुदी समाजातील माता आणि मुले
मोशेच्या नियमशास्त्रामध्ये मातांनी कोणती भूमिका निभावली? नीतिसूत्रे १:८ आज्ञापिते: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” आपल्या पतीच्या अधिकाराच्या चौकटीत, यहुदी पत्नी कौटुंबिक जीवनात देवाने दिलेल्या गरजा लागू करत असे. ती वृद्ध झाली तरी तिच्या मुलांनी तिचा आदर करावयाचा होता.—नीतिसूत्रे २३:२२.
मातेचा तिच्या मुलांना प्रशिक्षण देण्यातही मोठा भाग होता. बाळ दूध सोडण्याच्या वयाचे होईपर्यंत ती संपूर्णपणे त्याची काळजी घेई व त्यामुळे आई आणि बाळामध्ये जवळचे संबंध निर्माण होत यात काही शंकाच नाही. (यशया ४९:१५) पिता आपल्या मुलांना व्यापार शिकवत असताना माता त्यांच्या मुलींना घरगुती काम शिकवीत होत्या. मातांचा त्यांच्या मुलांवर देखील सखोल प्रभाव होता. उदाहरणार्थ, लमुएल राजाला ‘त्याच्या आईने त्याला शिकविलेल्या भारदस्त वचनातून’ लाभ झाला.—नीतिसूत्रे ३१:१.
एका सद्गुणी यहुदी स्त्रीने “आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष” देण्याच्या बराचशा मोकळीकीचा आनंद उपभोगला. नीतिसूत्रे ३१:१०-३१ नुसार ती कदाचित गृहसाम्रगी खरेदी करू शकते, स्थावर संपदेचे सौदे करू शकते आणि एखादा लहानसा व्यापार देखील चालवू शकते. कृतज्ञ पतीला तिचे मोल “मोत्यांहून अधिक” होते!
आजसाठी एक नमुना
बायबल काळामध्ये कौटुंबिक व्यवस्था कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी कामी पडली. पित्यांना त्यांच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी प्रेमळपणे त्यांचा अधिकार चालवायचा होता. उपासनेमध्ये त्यांना पुढाकार घ्यावयाचा होता. पिता आणि माता दोघांनी मिळून त्यांच्या मुलांमध्ये आस्था दाखवली—त्यांना शिकवले व प्रशिक्षण दिले, त्यांच्यासोबत उपासना केली व त्यांच्यासाठी मनोरंजनाची व्यवस्था केली. ईश्वरी माता मौल्यवान साहाय्यक ठरल्या, कुटुंबाच्या वतीने पुढाकार घेत असताना त्यांनी त्यांच्या पतींच्या मस्तकपदाचा आदर केला. आज्ञाधारक मुलांनी त्यांचा पालकांना तसेच यहोवा देवाला आनंदविले. खरेच, बायबल काळातील देव-भीरू कुटुंब आपल्या दिवसांसाठी एक उत्कृष्ठ नमुना होता.
[तळटीपा]
a याच्या आधी कनानी लोकांच्या प्रभावापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी याकोबाने दृढ पावले उचलली होती याची नोंद घ्यावी. त्याने अशी वेदी बांधली, की जी त्याला, त्याच्या कनानी शेजाऱ्यांपासून वेगळे असे दाखवून देत होती. (उत्पत्ति ३३:२०; निर्गम २०:२४, २५) त्यानंतर त्याने शखेम शहराच्या बाहेर त्याचा तंबू उभारला व स्वतःसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. (उत्पत्ति ३३:१८; योहान ४:६, १२) तेव्हा, दीनाने कनानी लोकांसोबत सहवास राखू नये अशी याकोबाची इच्छा होती हे तिला चांगल्याप्रकारे माहीत असावे.
[२३ पानांवरील चित्रं]
यहोवाची उपासना करणाऱ्या बायबल काळातील कुटुंबांप्रमाणे तुमचेही कुटुंब आनंदी असू शकते