वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१५ पृ. ३-४
  • एक प्रमुख त्याच्या भवितव्याचा विचार करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक प्रमुख त्याच्या भवितव्याचा विचार करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • मृत आपल्याला पाहू शकतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आपल्या पूर्वजांसाठी नवे जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • एक अध्यक्ष बोलतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • “मुखात घास भरवा, पायांना नव्हे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१५ पृ. ३-४

एक प्रमुख त्याच्या भवितव्याचा विचार करतो

पश्‍चिम आफ्रिकेतील प्रमुख, त्यांच्या वसाहतीत सर्वांचा आवडता आणि सन्माननीय नेता होता. त्याच्या ७८ व्या वाढदिवशी, त्याचे आप्त, कौटुंबिक सदस्य आणि इतर शुभचिंतक त्याचे अभिनंदन करण्यासाठी जमले होते. अशा प्रसंगी त्या प्रमुखाने एका असामान्य विषयावर भाषण दिले. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या त्याच्या कल्पनांविषयी त्याने सांगितले.

तो म्हणाला, की पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाच्या पलीकडे, “लबाडी, क्लेश व लोभविरहित एक नवे जग आहे.” ते जग “रहस्यमय,” होते व तेथे देवासोबत परस्पर संबंध असलेल्या केवळ धार्मिक लोकांची वस्ती असेल असे त्याने वर्णन केले.

संपूर्ण आफ्रिकेतील लोकांमध्ये अशा प्रकारचे विश्‍वास सर्वसामान्य आहेत. आफ्रिकी पारंपारिक धर्मानुसार, मृत्यू जीवनाचा अंत नसून केवळ एक स्थित्यंतर, आत्मिक जगात जाणे होय. असे म्हटले जाते, की मृत्यूनंतर एखादी व्यक्‍ती दृश्‍य जगातून अदृश्‍य जगात पार होते. आत्मा या नात्याने मग, ती व्यक्‍ती तिच्या किंवा त्याच्या पूर्वजांच्या राज्यात प्रवेश करते.

अनेक पश्‍चिम आफ्रिकी लोकांचा विश्‍वास आहे, की पूर्वज किंवा पूर्वजांचे आत्मे, पृथ्वीवरील त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणाची खात्री देतात. पश्‍चिम आफ्रिकी पारंपारिक धर्म (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “पृथ्वीवर अजूनही असलेल्या समाजाच्या सदस्यांमध्ये आणि पलीकडच्या जगातील सदस्यांमध्ये फारसा फरक नाही. पृथ्वीवर असताना, [पूर्वज] त्यांच्या कुटुंबात वडीलधारी होते. आता ते आपल्याला अदृश्‍य आहेत, तरीसुद्धा आत्मिक व्यक्‍तींच्या जगात ते वडीलधारीच आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या सर्वसामान्य कल्याणाची अजूनही आवड आहे.”

परिणामी, सुरवातीला ज्या प्रमुखाचा उल्लेख करण्यात आला त्याचीही त्याच्या पूर्वजांना सामील होण्याची व आत्मिक क्षेत्रात त्यांच्याबरोबर कार्य करण्याची अपेक्षा आहे. तो म्हणाला: “माझा मृत्यूनंतरच्या जीवनावर आणि मृत्यूनंतरही कार्य करत राहण्याच्या शक्यतेवर पक्का विश्‍वास आहे.”

परंतु, त्या प्रमुखाने नंतर जे म्हटले त्यामुळे संडे टाइम्स वृत्तपत्राने सुचवले, की त्याला पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या पलीकडे असलेल्या जीवनाची “पूर्ण खात्री झाल्याचे दिसत नाही.” त्याने जमलेल्या समूहाला सांगितले, की त्याने मृत्यूनंतरच्या जीवनाविषयीची चर्चा करणाऱ्‍या एका पुस्तकाबद्दल ऐकले होते. तो प्रमुख पाच वर्षांपासून त्या पुस्तकाच्या शोधात होता. त्याला ते पुस्तक वाचण्याची इतकी उत्कंठा लागली होती, की जो कोणी त्याला ते पुस्तक आणून देईल त्याला तो १,५०० (अमेरिकन) डॉलरच्या बरोबरीची किंमत देण्यास तयार होता.

त्या प्रमुखाला, सुलभपणे मिळणारे पुस्तक शोधण्याचा त्रास टाळता आला असता. ते सहज उपलब्ध होणारे पुस्तक मानवाने नव्हे तर सर्व मानवांच्या सृष्टीकर्त्याने निर्माण केले आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३) ते पुस्तक बायबल आहे. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल ते काय म्हणते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा