“आनंदी स्तुतीकर्ते” अधिवेशन तुम्ही तेथे हजर असाल का?
आनंद! या त्रस्त समयात हा शब्द ऐकण्यास विचित्र, अपरिचित वाटतो का? वर्तमानपत्रके आनंदविणाऱ्या बातम्या देत नाहीत हे खरे आहे. जातीय युद्धे, सर्वत्र पसरलेली भूक, बेकारी, घातक प्रदूषण, राजनैतिक अस्थिरता, गुन्हे—या गोष्टी अंतःकरणाला आनंदविणाऱ्या नाहीत, हो ना?
आज अनेक लोक जीवनातले जास्तीत जास्त सुख हिरावून घेतात. परंतु आनंद? आनंदाची व्याख्या “संतोषाची स्थिती; अत्यानंद,” अशी केली आहे. पुष्कळ लोकांनी खरा आनंद अनुभवलेला नाही आणि त्यांना आनंद होतो तेव्हा तो बहुधा अल्प समयासाठी असतो.
तरीही आमच्या दिवसांकडे पाहत बायबलने भाकीत केले: “ह्याकरिता प्रभु परमेश्वर म्हणतो, . . . पाहा माझे सेवक आनंद करितील . . . पाहा माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील.” (यशया ६५:१३, १४) ते कसे होईल?
याचे उत्तर शोधण्यासाठी, आम्ही आपणाला १९९५ मध्ये होणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतो. अधिवेशनांचा विषय “आनंदी स्तुतीकर्ते” हा आहे आणि उपस्थिती विनामूल्य आहे. तीन दिवसांच्या अधिवेशन कार्यक्रमात बायबल आधारित भाषणे, प्रात्यक्षिके, चर्चा आणि आणखी पुष्कळ काही समाविष्ट आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आनंद हा विषय ठळकपणे मांडण्यात येईल.
ही अधिवेशने जून महिन्यापासून अमेरिकेत सुरू होतील आणि १९९६ च्या सुरवातीपर्यंत संपूर्ण जगातील शहरांमध्ये चालू राहतील. एखादे अधिवेशन तुमच्या जवळपास निश्चितच होईल. तुमच्या क्षेत्रात राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना याबद्दल का विचारु नये? आम्ही तुम्हाला तेथे येण्याचे हार्दिक आमंत्रण देतो.