तुम्हास आठवते का?
तुम्हाला टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे वाचन करण्यास आवडले का? पहा, तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे येतात का:
▫ टिकाऊ विवाहासाठी कोणते चार घटक आहेत?
ते म्हणजे, ऐकण्याची तयारी, क्षमा मागण्याची योग्यता, सतत भावनात्मक पाठिंबा पुरवण्याची क्षमता, आणि प्रेमळपणे स्पर्श करण्याची इच्छा ही आहेत. (१ करिंथकर १३:४-८; इफिसकर ५:३३; याकोब १:१९)—९/१, पृष्ठ १३.
▫ परीक्षेचा सामना करणाऱ्यांना धीर पुरवण्याचा यहोवाचा एक मार्ग कोणता आहे?
यहोवा, त्याचे वचन, पवित्र शास्त्रात उद्धृत केलेल्या धीराच्या उदाहरणाद्वारे हे करतो. (रोमकर १५:४) यावर आम्ही मनन केले असता, धीर धरण्यासाठी आम्हाला उत्तेजन मिळते, व धीर कसा धरावा याविषयी बरेच काही आम्ही शिकू शकतो.—९/१, पृष्ठ २३-२४.
▫ ईश्वरी भक्ती काय आहे?
ईश्वरी भक्ती यहोवा देवाला आदर किंवा भक्ती देण्याला सूचित करते व त्याला जे संतोषवते ते करण्यास आम्हाला प्रवृत्त करते. आम्ही देवावर आमच्या हृदयापासून प्रीती करत असल्यामुळे खडतर परीक्षांना तोंड देते वेळी देखील ते केले जाते.—९/१, पृष्ठ २७.
▫ प्रीतीच्या सकारात्मक बाजूंच्या यादीत पौल सहनशीलतेला प्रथम मांडतो हे उचित का आहे?
सहनशीलतेविना किंवा एकदुसऱ्यांचे धीराने सहन केल्याविना ख्रिस्ती संगतीसारखी कोणतीही गोष्ट असू शकत नाही, असे म्हटले गेले आहे. कारण आम्ही सर्वच अपरिपूर्ण आहोत, आणि आमच्या अपरिपूर्णता व चुका इतर लोकांसाठी परीक्षा आहेत. यास्तव, बांधवांमधील प्रीती टिकून राहावयाची असल्यास सहनशीलतेची आवश्यकता आहे.—१०/१, पृष्ठ २७.