“प्रकाश धारण करणारे” प्रांतिय अधिवेशनास तुमचे स्वागत असो
पृथ्वीवरील निर्मितीच्या अगदी पहिल्याच दिवशी प्रकाशाची निर्मिती झाली. आम्ही असे वाचतो, यहोवा देवाने म्हटलेः “प्रकाश होवो,” आणि “प्रकाश झाला.” (उत्पत्ती १:३) ही गोष्ट प्रेषित योहानाने जे लिहिले त्याच्याशी सुसंगत आहे, जसे की, “देव प्रकाश आहे, व त्याच्याठायी अंधकार नाही.”—१ योहान १:५.
जर देवाचा पुत्र त्याच्या पित्यासह एक आहे, तर येशूने एकदा जे म्हटले होते की, “मी जगाचा प्रकाश आहे,” ते आश्चर्याचे नाही. (योहान ९:५) यहोवा देव व त्याचा पुत्र यांच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही अंधःकारातून प्रकाशात येऊ शकतो. येशूने ही साक्ष सुद्धा दिलीः “मी जगात प्रकाश असा आलो आहे, यासाठी की मजवर विश्वास ठेवणाऱ्या कोणीही अंधारात राहू नये.” (योहान १२:४६) या कारणास्तव, येशू ख्रिस्ताने त्याच्या खऱ्या अनुयायांबाबत अगदी योग्यतेत म्हटलेः “तुम्ही जगाचा प्रकाश आहात . . . तुमचा प्रकाश लोकांपुढे प्रकाशो, यासाठी की त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून तुमच्या पित्याचे गौरव करावे, जो स्वर्गात आहे.”—मत्तय ५:१४, १६.
“विश्वासू व बुद्धिमान दास” याने स्पष्ट केलेल्या देवाच्या वचनाची समज, ते सत्य आम्हाकडे असणे हा केवढा आशीर्वाद आहे! (मत्तय २४:४५-४७) आता आपण त्रैक्यावरील विश्वासाने मतीगुंग असे राहिलो नाही; सर्वसमर्थ प्रेमळ देव हिंसाचार व दुष्टता यांस अनुमति का देतो याविषयी गोंधळात नाही; मृतांच्या परिस्थिती बाबत आम्ही आता कोणत्याही घोटाळ्यात नाही. त्या प्रकाशाने आम्हास आशा दिली, ती राज्य आशा आहे. तिने आम्हास हे प्रकट केले की, निर्माता केवढा अद्भूत देव आहे. त्या सत्याच्या प्रकाशाने आम्हास जीवनात एक उद्देश दिला आहे, आम्ही प्राथमिकतेत जे उत्पन्न केले गेलो ते त्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी व तो म्हणजे आमचा निर्माणकर्ता यहोवा देव याचे गौरव करणे. ते आम्ही प्रकाश धारण करणारे असण्याद्वारे करीत असतो. प्रकाश धारण करणे एक थोर सन्मान व हक्क आहे, पण सोबतच ती एक गंभीर जबाबदारी सुद्धा आहे. त्या कर्तव्याशी न्यायी राहण्यात, यहोवा ज्याची पुरवणूक करतो, त्या सर्व मदतीचा पूर्ण उपयोग करण्याची गरज आहे. तर मग, १९९२ च्या प्रांतिय अधिवेशनास “प्रकाश धारण करणारे” प्रांतिय अधिवेशन असे नाव देणे किती उचित आहे!
प्रकाश धारण करणारे या नात्याने आमच्या भूमिकेबाबत आमची कुशलता व आमची गुणग्राहकता वाढीस लावण्यास यापैकी एखाद्या अधिवेशनास सुरवातीचे गीत सुरु होण्यापूर्वी ते समारोपाची प्रार्थना होईपर्यंत आम्हास उपस्थित राहावे लागेल. तसेच व्यासपिठावरुन जे सर्वकाही सांगितले जाईल त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मग ते भाषणांमध्ये, मुलाखतीत, अनुभवात किंवा नाटकात असो, आम्ही विलीन झाले पाहिजे. आमच्या स्मृतीस नंतर उजाळा देण्यास काहीतरी संदर्भच नव्हे तर तेथे काय सादर केले जाते त्यावर मन एकाग्र करण्याकरिता टिप्पणी घेत राहाणे फारच लाभदायक आहे. होय, त्या सबंध अधिवेशनाच्या कार्यक्रमात ‘आम्ही कसे ऐकतो त्याकडे लक्ष द्यावे’ लागेल.—लूक ८:१८.