आजार व मृत्युविरुद्ध लढा जिंकला गेला का?
आजार व मृत्यु ही नाहीत! बहुतेकाकरिता हे उद्गार जणू इच्छित गोष्टींच्या शब्दांकनापेक्षा काहीसे अधिक वाटतील. काही झाले तरी, जसे वैद्यकीय शास्त्रज्ञ व सूक्ष्मजन्तुशास्त्र प्राध्यापक वेड् डब्ल्यू. ऑलिव्हर यांनी लिहिलेः “अगदी सुरवातीपासूनच्या लिखित इतिहासानुसार . . . व्याधींनी मानवजातीचे भवितव्य पार बदलले आहे; बलाढ्य साथीरोगांनी मनुष्यजातीवर भयानक वेगाने हल्ले चढविलेले आहेत. . . . आजारांनी त्याच्या पाऊलांस कायमचे चकविले आहे.”
मग, एखादा परिणामकारक बदल घडणेही अगदी नजीकची शक्यता आहे, यास एखादे विश्वासहार्य कारण आहे का? वैद्यकीय शास्त्र, सर्व रोगांचे निर्मूलन करण्याच्या, तसचे त्यांना टाळण्याच्या शोधात एवढे नजीक येऊन पोहंचले आहे का?
रोगाविरुद्ध लढा देण्यात वैद्यकियांनी आणि संशोधकांनी जी लक्षणीय प्रगति केलेली आहे तिजबद्दल प्रश्नच नाही. कॉलरावर यशस्वी इलाज तसेच १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची लस शोधून काढणे; सोबत देवी या दहशती रोगाचे उच्चाटण करणारी लस, इ. स. १७९६ मध्ये एडवर्ड जेनर याने गाईच्या व्रणातील कमप्रभावी देवीपासून तयारी केली. इ. स. १८०६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी अनेकांच्या भावनांचा उल्लेख करण्यात जेनरला लिहिताना म्हटलेः “तुमची ही एवढी आश्चर्यजनक प्रतिक्रिया आहे की, जिच्यामुळे तुम्ही कधी हयात होता हे मानवजात कधीच विसरु शकणार नाही. भावी राष्ट्रांना ही किळसवाणी देवी एकेकाळी होती हे केवळ इतिहासाद्वारेच कळू शकेल.”
शिवाय घटसर्प तसेच पोलियो यासारख्या आजाराबद्दल केलेल्या संशोधनाचा अनुकूलतेत आणि कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यास हवा. शिवाय हृदयरोग आणि कर्करोग यांचेवर जे इलाजप्रावीण्य अलिकडील काळात मिळविण्यात येत आहे त्याबद्दलही काही लोक धन्यवाद देत आहेत. असे असूनही, हृदयविकार तसेच कर्करोग यांनी आजही लोक मरत आहेत. सर्व रोगांना व आजार क्लेशांना काढून टाकण्याच्या ध्येयांस गाठणे हे बहुतांशी निसटते धोरण ठरतयं.
नवीन रोग
हे विरोधाभासक विधान असले तरी आजच्या ऐतिहासिक कालखंडात शरीरभागांचे परिक्षण तसेच पुनर्रचना करणाऱ्या शस्त्रक्रियांच्या संगतीत “नवीन रोग” उद्भवत आहेत, जसे लिनाओनेअर्स (साथी रोग) अमली औषधांच्या विषारी परिणामांचे रोग आणि आपले नाव मशहूर केलेला “एडस्” रोग.
अर्थात, अनेक हा प्रश्न करतील की, हे रोग असे किती नवे आहेत. काहींच्या बाबतीत यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट मासिकातील लेखात असे म्हटले आहेः “जे रोग बरेच जुने असले तरी अलिकडेच त्यांचेवर अचूक निदान ठरवून नवी नावे देण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, लेजी-ओनर्स (साथीच्या) रोगांची १९७६ मध्ये प्रथमच ओळख झाली पण त्या आधी तेच कदाचित पुरेसे निदान न झाल्यामुळे न्यूमोनियाची लागण किंवा साथीरोग म्हणून ओळखत असावेत. तसेच विषारी लक्षणे पसरविणाऱ्या हिवतापाना गुलाबी ज्वरताप म्हणत.”
तरी अनेक साथी नवीनच आहेत यात काही प्रश्न नाही. यांचेपैकी एडस् हा सर्वात मशहूर आहे. यात काय संशय! हा, अधू आणि घातक रोग प्रथमच १९८१ मध्ये ओळखला गेला आणि त्याचे नामकरण झाले. दुसरा कमजानी रोग तो ब्राझिलचा गुलाबी हिवताप, ज्याचे निदान १९८४ मध्ये झाले, व त्याची नैतिकता ५० टक्के असल्याची गणण्यात आली.
कोणताही इलाज दृष्टीपथात नाही
अशाप्रकारे मनुष्याने पराकाष्ठांची जरी शर्थ केली तरी कायम इलाज कोठेच दृष्टीपथात नाही. हे खरे की, सर्वसाधारणपणे मानवी जिवाची सरासरी १९०० सालापासून २५ वर्षांनी वाढलेली आहे. पण हा जो फरक पडला तो मुख्यत्वेकरून ज्या वैद्यकीय प्रगतीने बाल्यावस्थेत किंवा अल्पवयातच कालवश होणाऱ्यांची संख्या बरीच घटविली, तिजमुळे पडला. तरीही, मनुष्याचे आयुष्यमान “सत्तर वर्षे” या शास्त्रीय चाकोरीतीलच आहे.—स्तोत्रसंहिता ९०:१०.
ॲना विल्यम्स, ज्यावेळी वयाच्या ११४ व्या वर्षी, डिसेंबर १९८७ मध्ये वारल्या, त्यावेळी ती एक बातमी बनली होती. विल्यम्सच्या मृत्युबद्दलचे भाष्य करण्यात एका स्तंभलेखकाने म्हटलेः “शास्त्रज्ञांना वाटते ११५ ते १२० वर्षांचे आयुष्यमान ही मानवी दिर्घायुष्याची कमालमर्यादा असावी. पण ती तेवढीच का असावी. मानवी शरीराने ७० किंवा ८० किंवा ११५ वर्षे जरी गाठली तरी मग ते बाद का होते?
१९६० मध्ये वैद्यकीय शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले की, मानवी शरीरातील पेशी केवळ ५० टक्के विभाजीत होण्याची क्षमता बाळगून आहेत. एकदा ही मर्यादा गाठली की, असे आढळून आले, या पेशींना जिवंत ठेवण्याची कोणतीही शक्यता उरत नाही. ही नैसर्गिक प्रवृत्ती, या आधीच्या त्या तात्विक भूमिकेच्या विरुद्धतेत असल्याचे वाटते की, मानवी शरीरातील पेशींना जुळेशी परिस्थिती असल्यास ते सर्वकाळ जिवंत राहू शकतात.
या सोबतच, जी मानवी क्लेशमय स्थिती ती मनुष्याने आणविलेली आहे. हेही लक्षात ठेवणे आहे, जसे एका संशोधकाने दूरदर्शी निर्णय घेतला कीः “आजारावर केवळ वैद्यकीय संशोधनांनी मात करणे शक्य नाही. तर आजाराचा इतिहास सामाजिक तसेच नीतीमत्त्वतेसंबंधीच्या गोष्टीशी जखडलेला आहे.”
जागतिक आरोग्य संघटनेने हेरले आहे की, “आजारांची प्राथमिक लक्षणे व उपचार यांच्याकडे दुर्लक्ष करून, विज्ञानशास्त्र, डॉक्टर्स आणि रुग्णालये आम्हास बरी करतील या आशेने आम्ही स्वतःवरच अनेक घाय करून घेतले आहेत. अर्थात, जीवनास प्रत्यक्षात बचावू शकणाऱ्या सुविधाविना आम्ही काही करू शकत नाही. तरी हे स्पष्ट असू द्या की, त्या आमच्या आरोग्यात भर टाकू शकत नाही; तर केवळ मरणापासून थांबवितात. स्वतःचा घात करविणारी, धुम्रपान व मद्यपानाची सवयी आच, तसेच बेकारीचा ध्यास मनास तसेच शरीरास खाऊ लागतो. हेही ‘नवीन रोग’ पसरलेत. शिवाय, आम्ही रस्त्यावरील अपघातांना साथीचे रोग का बनू देत आहोत; जे आज जिवांच्या हानीसोबत आर्थिक उत्पन्नावरही आघात करीत आहेत.
आजार, रोगराई, क्लेश आणि मृत्यु ही आजही आमच्या संगतीत आहेत. तरी आम्हापाशी आत्मविश्वासाने अशा काळाकडे दृष्टी लावण्यास पुरेसे कारण आहे ज्यात आजार, रोग व मृत्यु ही राहणार नाहीत. सर्वात उत्तम हे की, तो काळ अगदी जवळ आहे हा विश्वास बाळगण्यास पुरेसे कारण जवळ आहे.
[४ पानांवरील चौकट]
“मिसर देशातील व्याधि”
अगदी प्राचीन काळापासून मनुष्य रोगांशी झगडा देत आहे असे मोशेनेही पवित्र शास्त्रात टिपण केले आहे. उदाहरणार्थ, त्याने, कुतुहल निर्माण करणाऱ्या संदर्भाद्वारे पवित्र शास्त्रात म्हटलेः “मिसर देशातील ज्या (सर्व) व्याधि.”—अनुवाद ७:१५.
यात हत्तीपायाचा रोग, आमांश, देवी, गाठीचा प्लेग, नेत्ररोग, यासारख्या रोगांचा समावेश होता. मोशेच्या बहुतेक सर्व लोकांचा, या व्याधिपासून नियमशास्त्राकरवी ज्या आरोग्य विषयक सूचना आधीच दिल्या होत्या, त्यांच्यामुळे बचाव झाला.
मिसरातील रासायनिक प्रेतांचे बारकाईने केलेल्या परिक्षणाने “मिसरातील (इतर) अधिक व्याधींचे” प्रकटन झाले. यात आरथ्राइटीस, स्पोंडलाईटीस, अनेक प्रकारचे दंत व नेत्ररोग तसेच संधीवातसारखे रोगही समाविष्ट आहेत. ज्याला एबर्स पपायरस म्हटले जाई त्या वैद्यकीय लिखानात पोटाचा ट्युमर तसेच यकृताच्या व्याधीचा, मधुमेह, कुष्ठरोग, कॅनज्युवाईटीस व बहिरेपणाचाही उल्लेख आहे.
या व्याधींशी प्राचीन मिसरातील वैद्यांनी निकराने लढा दिला, व त्यांचेपैकी काही त्याच्या क्षेत्रात निपूण बनले. ग्रीक इतिहासकार हेरोडेटस लिहितोः “हा देश [मिसर] वैद्यांनी बुजबुजलेला आहे. एक पाहावा तर फक्त नेत्र रोग इलाज करतो तर दुसरा दात, पोट किंवा अंतर्यामाचे अवयव हाताळतो.” काही झाले तरी मिसरचे बहुतेक “वैद्यकीय शास्त्र” वैद्यकीचे ढोंग होते व विज्ञानापासून दूर होते.
आधुनिक काळातील वैद्यकीय-क्षेत्रातील लोक रोगाविरुद्धच्या त्यांच्या मोहीमेत अधिक महान यश प्राप्त करीत आहेत. तरीही, वैद्यकीय संशोधक जेसी डॉबसन आपल्या विचार प्रवर्तक लेखात म्हणतातः “गतकाळातील संशोधनाकडून आपण काय शिकलो. जो सर्व पुरावा उपलब्ध आहे त्यावरुन हा निष्कर्ष निघतो की गतकाळातील रोग आणि व्याधींची लक्षणे बहुतेक आजच्या सारखीच आहेत. शिवाय सर्व कौशल्य आणि रुग्णांच्या चिकित्सेचे प्रयत्न रोगांचे निर्मूलन करण्यात अगदीच अल्पसे यश प्राप्त करू शकले हे उघड आहे.”—डिसिज् इन एन्शन्ट मॅन.