“आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनाला या
“आनंदी स्तुतीकर्ते” १९९५ च्या प्रांतीय अधिवेशनांसाठी हा किती उत्तम विषय निवडण्यात आला आहे! यहोवाचे साक्षीदारच हे स्तुतीकर्ते आहेत. कोणाचे स्तुतीकर्ते? अर्थातच, यहोवा देवाचे!
यहोवा अनेक प्रकारे अद्वितीय, अप्रतिम, अतुलनीय, असामान्य आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, न्याय करण्यात परिपूर्ण व प्रीतीचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. तो इतरांपेक्षा आपली उपासना व गौरव यास पात्र आहे.
निश्चितच, आपण त्याचे आनंदी स्तुतीकर्ते होऊ इच्छितो! आपल्याला साहाय्य करण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने १९९५ साठी तीन दिवसीय उत्तम अधिवेशनाच्या कार्यक्रमाची योजना केली आहे. हे तीन दिवस खरोखरच आनंदाचे असतील आणि यहोवाचा प्रत्येक साक्षीदार त्याच्या परिने शुक्रवार सकाळच्या सुरवातीच्या गीतापासून रविवार दुपारच्या समाप्तीच्या गीत व प्रार्थनेपर्यंत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करील.