वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ५/१ पृ. २८
  • “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला येण्याचे तुम्हाला निमंत्रण आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “प्रकाश धारण करणारे” प्रांतिय अधिवेशनास तुमचे स्वागत असो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “यहोवा वर भाव ठेवा” या १९८७च्या प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • “ईश्‍वरी भय” या प्रांतीय अधिवेशनास या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ५/१ पृ. २८

“शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या

भाषेतील फरक हे, बाबेलनंतर पुढे कायम भेद पाडणारी शक्‍ती ठरले आहे. तेथे यहोवाने मनुष्यजातीच्या भाषेत घोटाळा निर्माण केला व आपण “एक बुरुज बांधू व या रितीने आपले नाव करू,” या मानवी उद्दिष्टास निष्फळ केले. (उत्पत्ती ११:४) भाषेतील फरक हा केवढा भेददर्शक असतो हे, जे काही बेल्जियममध्ये घडले त्यावरुन पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी लाव्हवेन येथील कॅथोलिक विश्‍वविद्यालय भाषापरत्वे विभक्‍त झाले.

मनुष्यजातीतील भेदभावाच्या कारणांपैकी एक आहे भाषा. इतर जी आहेत तीः राष्ट्रीयत्व, वंशभेद, शिक्षण आणि आर्थिक पातळी. पण यहोवाचे साक्षीदार या सर्व भेदावर मात करण्याच्या सतत प्रयत्नात राहून आज खरोखरीच्या एकतेत आहे.

या एकतेचे एक लक्षवेधक प्रदर्शन पोलंडमधील कोरझाव (कोटोवाईज्‌जवळ), पोझनान आणि वॉर्सा या तीन ठिकाणी गेल्या उन्हाळ्यात पहावयास मिळाले. ३७ देशातून निदान २० वेगवेगळ्या भाषा बोलणारे साक्षीदार तेथे उपस्थित होते. तरीही सर्वांकरवी लक्षवेधक एकता प्रदर्शित करण्यात आली. याचे श्रेय कोणास द्यावे? तेथील सर्वजन शास्त्रवचनातील सत्याची जी “शुद्ध वाणी” बोलत होते, त्याला. याचाच सफन्या ३:९ मध्ये भविष्यवादितपणे उल्लेख आहेः “मग, मी [यहोवा देव] राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व यहोवाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा खांद्याला खांदा लावून करतील.”

या कारणास्तव, १९९० मधील प्रांतिय अधिवेशनाला “शुद्ध वाणी” हे शीर्षक देण्यात आले आहे. ते यथार्थ आहे. कारण मानवी अपूर्णता, सैतानाच्या दुष्ट जगाचा दबाव आणि दियाबल व त्याच्या दुरात्म्यांची कुटिल कारस्थाने यांच्या वातावरणात “शुद्ध वाणी” बोलणे हे नेहमीच सोपे असणार नाही. यास्तव आम्ही त्या स्वार्थी प्रवृत्तीपासून सावध असले पाहिजे जी आम्हास विभागू शकते.

देवाने आम्हास ही शुद्ध वाणी का दिली आहे? याचसाठी की, आम्ही यहोवाची सेवा खांद्याला खांदा लावून करावी. इतर भाषांतरे याचा अर्थ सूचवितात की, देवाचा सेवा, “एकाच जुवाखाली करणे” (द जरुसलेम बायबल); “एकाच मताने” करावी (मोफॅट); “सर्वानुमते करावी” (ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन); आणि “त्याच्या सेवेत सहकार असावा.”—बाईंगटन.

भाषणे, प्रात्यक्षिके, अनुभव, परिसंवाद आणि पवित्र शास्त्रीय नाटके यांच्या मदतीने या येत्या अधिवेशनात आपणास शुद्ध वाणी अधिक अस्खलितपणे बोलण्याचे उत्तेजन देऊ व आत्मविश्‍वास वाढवू. ती आम्हास आमच्या बंधूवर्गासोबत अधिक कार्यक्षमतेत आणि एकमतात सेवा करीत राहण्याचे उत्तेजन देईल.

ही अधिवेशने गुरुवार दुपारी १ वाजल्यापासून सुरु होतील व यांची समाप्ती रविवारी दुपारी ४ वाजता होईल. अगदी उद्‌घाटनास गायिल्या जाणाऱ्‍या गीतापासून सुरवात होणाऱ्‍या सर्व सभांची सांगता रविवारी दुपारी प्रार्थनेसह होईपर्यंतच्या सर्व बैठकांना उपस्थित असू शकाल अशी आयोजना आतापासून करा.

अधिवेशनाच्या तारखा आणि पत्ते मिळविण्यासाठी कृपया तुमच्या भागातील स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीशी संपर्क साधा किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा.

येताना आपणासोबत पवित्र शास्त्र, गायनाचे पुस्तक आणि टिपणे घेण्याच्या तयारीसह या. तसेच येताना आध्यात्मिकतेचे भूकेले होऊन या व तुम्ही तेथून अधिक संपन्‍न असे, शुद्ध वाणी बोलण्यास व यहोवाची सेवा करण्यास अधिक सिद्ध होऊन परताल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा