वाचकांचे प्रश्न
कोर्टाकडून बजावण्यात आलेल्या रक्तसंक्रमणाच्या हुकुमाचा ख्रिस्ती व्यक्तीने जोरदारपणे कसा विरोध करावा?
प्रत्येक वेळी परिस्थिती विलक्षण किंवा गुंतागुंतीची असू शकते म्हणून सर्व गोष्टींना समाविष्ट करून घेणारा असा एखादा नियम नाही. ‘जे काही कैसराचे आहे ते कैसराला’ आदरयुक्त पद्धतीने देण्याबाबत ख्रिस्ती लोक प्रसिद्ध आहेत. त्यामुळे धर्मातीत सरकारच्या कायद्यांचे ते पालन करत असतात. तरी कर्तव्याची पायमल्ली होऊ न देता “देवाचे ते देवाला” द्यायचे त्यांना समजते व त्याद्वारे त्याच्या नियमांचा भंग होत नाही.—मार्क १२:१७.
रोमकरांस पत्र १३:७ मध्ये सरकारी “वरिष्ठ अधिकारी” यांच्याशी ख्रिश्चनांच्या संबंधाची चर्चा आहे. अशा शासनाला कायदे लागू करण्याचे किंवा मार्गदर्शन करण्याचे व सामान्य जनतेचे कल्याण करण्याचे व त्यात उन्नती करण्याचे अधिकार आहेत. कायदे लागू करण्यास शासनाला “तरवार”ही घ्यावी लागते किंवा त्यांच्या कायद्यानुसार वाईट कामे करणाऱ्यांवर ते आपला क्रोध दर्शवू शकते. वरिष्ठांच्या अधिपत्याखाली असल्याने ख्रिस्ती व्यक्ती कायदेपालनाचे व कोर्टाच्या हुकुमनाम्याचे पालन करण्याची इच्छा दर्शवते. परंतु ही ताबेदारी सापेक्ष असली पाहिजे. परंतु ख्रिस्ती व्यक्तीला अशा एखाद्या गोष्टीला शरण जाण्यास सांगितले की, ज्यामुळे देवाच्या उच्च कायद्यांचे उल्लंघन होत असेल तर हा ईश्वरी कायदा प्रथमस्थानी आला पाहिजे. त्याला श्रेष्ठत्व दिलेच पाहिजे.
काही आधुनिक कायदे मुळात चांगले आहेत. परंतु ख्रिश्चन व्यक्तीवर रक्त संक्रमणाची अधिकाराने जबरदस्ती करताना ते अयोग्य रितीने वापरले जातात. यावेळी प्रेषित पेत्राने जी भूमिका घेतली होती ती ख्रिश्चनांनी घेतली पाहिजेः “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९.
यहोवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली होती की, “त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये हे लक्षात ठेव, कारण रक्त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये.” (अनुवाद १२:२३) १९१७ मधील यहूदी पवित्र शास्त्रातील भाषांतरात असे म्हटले आहेः “रक्तसेवनाबाबत दृढ राहा.” आणि आयझॅक लेसर म्हणतातः “रक्त सेवन न करण्याबाबत खंबीर राहा.” मग याचा अर्थ असा घ्यायचा का की, देवाच्या सेवकांनी देवाच्या कायद्याला उंचावून धरण्यास त्यांनी कमी महत्त्व दिले अथवा नकारात्मक दृष्टीकोण दाखवायचा होता?
शासनाने जरी वेगळ्या रितीने मार्गदर्शन केले तरी योग्य कारणास्तव ख्रिश्चनांनी देवाला आज्ञांकितपणा दाखवायचा निश्चय केलाच पाहिजे. प्राध्यापक रॉबर्ट एल. विल्कन लिहितातः “ख्रिश्चनांनी केवळ (रोमी) सैन्यातली नोकरीच नाकारली असे नाही. तर कोणत्याही शासकीय कार्यालयातील काम किंवा शहरात अनुशासन करण्याची जबाबदारीही स्वीकारली नाही.” (द ख्रिश्चन्स ॲज द रोमन्स् सॉ देम) नकार देणे याचा अर्थ होत होता की कायदेभंग करणारा असा शिक्का मिळवणे किंवा रोमन रणांगणावरील शिक्षा फर्मावणे.
आजही ख्रिश्चनांनी खंबीर राहिलेच पाहिजे. ईश्वरी कायद्याचे उल्लंघन न करण्याचा ठाम निश्चय केला पाहिजे. जरी या धर्मातीत शासनात त्यांना धोका असेल तरीही. विश्वातील सर्वोच्च कायदा—परमेश्वराचा कायदा—ख्रिश्चनांनी जसे जारकर्माला टाळायचे असे सांगतो तोच रक्ताचा दुरुपयोग न करण्याचे तुमच्याकडून अपेक्षितो व अशा गोष्टींची मनाई “जरुरीची गोष्ट” आहे. (प्रे. कृत्ये १५:१९-२१; २८:२९) अशा ईश्वरी कायद्याला तुम्ही अगदी सहजतेने घेऊ शकत नाही; जसे की, केवळ आम्हाला ती सोईस्कर आहे किंवा आता काही समस्या उभ्या राहणार नाहीत. परमेश्वराचा कायदा पाळलाच पाहिजे.
या कारणास्तव, जिचा अभ्यासाच्या पहिल्या अग्रलेखाच्या १७व्या परिच्छेदात उल्लेख करण्यात आला त्या तरुण ख्रिस्ती व्यक्तीने कोर्टाला जे उत्तर दिले त्याची आम्ही प्रशंसा करू शकतो. ती म्हणालीः “रक्तसंक्रमण करणे म्हणजे तिच्या शरीरावर एकप्रकारचा हल्लाच आहे असे तिला वाटले व त्याची तुलना तिने बलात्काराशी केली.” मग, एखादी ख्रिस्ती स्त्री, मग ती वयस्कर असो किंवा तरुण असो, तेथे जर व्यभिचाराला जो लैंगिक हल्ल्याद्वारे अमलात आणला जातो, कायदेशीर परवानगी असेल, तरी एखाद्या बलात्कारास मान्यता देईल काय?
याच रितीने १८ व्या परिच्छेदात, एका १२ वर्षाच्या मुलीने सांगितले की, “ती तिच्या सर्व शक्तीनुसार कोर्टाने लादलेल्या (रक्त) संक्रमणाशी लढा देईल. ती आरडाओरडा व धडपड करील आणि आपल्या दंडावरील संक्रमणाच्या सुया काढून फेकून देईल व तिच्या खाटेवरील रक्ताच्या पिशवीची नासधूस करील.” दैवी कायद्याचे पालन करण्याचा तिचा ठाम निश्चय होता.
ज्या ठिकाणी त्याला राजा करण्याचे लोक ठरवत होते, तेथून येशू निघून गेला. त्याचप्रमाणे कोर्टाद्वारे सक्तीने लादण्यात आलेले संक्रमण आहे तर ख्रिश्चनाने देवाच्या कायद्याचे उल्लंघन होऊ देऊन त्याला बळी पडण्याचे टाळले पाहिजे. (मत्तय १०:१६; योहान ६:१५) त्याचवेळी ख्रिश्चनाने सूज्ञतेने दुसरा पर्यायी उपचार शोधण्यास हवा. अशा रितीने जीवन टिकवण्याचे खरे प्रयत्न केले पाहिजेत व त्यामुळे पूर्ण स्वास्थ्यही प्राप्त होईल.
जर ख्रिश्चनाने रक्ताबाबतीत असलेल्या देवाच्या कायद्याचे उल्लंघन होऊ न देण्याचा अटीतटीने प्रयत्न केला, तर शासन कदाचित त्या व्यक्तीला कायदाभंग करणारा ठरवेल किंवा त्याच्यावर फिर्यादही करेल. जर शिक्षा झालीच तर नीतीमत्वासाठी सोसावे लागणारे दुःख या दृष्टीकोणातून ख्रिश्चनाने त्याकडे पाहावे. (पडताळा १ पेत्र २:१८-२०.) परंतु पुष्कळ उदाहरणांमध्ये ख्रिश्चनांनी रक्त संक्रमण टाळले आहे व दुसऱ्या योग्य औषधांमुळे बरे झाले आहेत. यासाठी कोणत्याही कायदेशीर समस्या उद्भवल्या नाहीत; आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्यांना जीवन प्रदान करणाऱ्या ईश्वरी श्रोतास व न्यायाधिशास एकनिष्ठता दाखवली आहे.