वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. ३ पृ. ३
  • हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?
  • सावध राहा!—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • जगाचा अंत जवळ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • पोप आणि अपोकलीप्स
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • बायबल काय म्हणतं?
    सावध राहा!—२०१७
सावध राहा!—२०१७
g17 क्र. ३ पृ. ३
द डूम्सडे क्लॉक

मुख्य विषय | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?

हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?

२०१७ वर्षाची सुरुवात एका अतिशय निराशाजनक घोषणेने झाली. वैज्ञानिकांच्या एका गटाने जानेवारी महिन्यात अशी घोषणा केली, की हे जग आतापर्यंतच्या सर्वात भयंकर विनाशाच्या आणखीन जवळ आलं आहे. मानवजात जागतिक विनाशाच्या किती जवळ आली आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी एका प्रतीकात्मक घड्याळाचा म्हणजे ‘डूम्सडे क्लॉक’ याचा वापर केला. वैज्ञानिकांनी या घड्याळाचा मिनिट काटा ३० सेकंद पुढे सरकवला. आता या घड्याळाचे काटे मध्यरात्रीला अडीच मिनिटे कमी या वेळेवर निश्‍चित करण्यात आले आहेत; म्हणजे जागतिक विनाशाच्या अगदी जवळ. गेल्या ६० वर्षांत कधीही या घड्याळाची वेळ विनाशाच्या इतकी जवळ असल्याची निश्‍चित करण्यात आली नव्हती!

आपण जगाच्या अंताच्या किती जवळ आलो आहोत, ही गोष्ट २०१८ मध्ये वैज्ञानिक पुन्हा तपासून पाहणार आहेत. पण, लवकरच येणाऱ्‍या आणि अज्ञात असलेल्या विनाशाबद्दल डूम्सडे क्लॉक आताही इशारा देऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का? तुम्हाला कदाचित या प्रश्‍नांची उत्तरं देणं काहीसं कठीण वाटत असेल आणि ते साहजिकच आहे. कारण, तज्ज्ञांचीही या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत आणि येणाऱ्‍या डूम्सडेवर किंवा विनाशाच्या दिवसावर सर्व जण विश्‍वास ठेवतात असंही नाही.

खरंतर, लाखो लोक असा विश्‍वास करतात, की आपलं भविष्य चांगलं असेल. ते दावा करतात की पृथ्वी आणि मानव नेहमीसाठी अस्तित्वात राहतील. शिवाय, मानवांचं जीवन आताच्या तुलनेत खूप चांगलं असेल. इतकंच नाही, तर त्यांचा हा दावा पुराव्यांवर आधारित आहे असंही ते म्हणतात. पण, त्यांचे पुरावे खरंच भरवशालायक आहेत का? हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे की नियंत्रणात आहे?

“द डूम्सडे क्लॉक हे असं एक प्रतीकात्मक घड्याळ आहे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांच्या ओळखीचं आहे. मानवांनी निर्माण केलेल्या घातक तंत्रज्ञानामुळे आपण विनाशाच्या किती जवळ आहोत, हे या रचनेतून दाखवलं जातं. या घातक तंत्रज्ञानात सर्वात पहिला क्रमांक येतो तो आण्विक शस्त्राचा. यासोबतच, वातावरणात बदल करणाऱ्‍या तंत्रज्ञानाचा, नवनवीन जैवतंत्रज्ञानाचा आणि सायबर टेक्नॉलॉजीचाही याच्यात समावेश होतो. यांमुळे आपल्या जीवनाला आणि पृथ्वीला जी हानी होते, ती कधीच भरून काढली जाऊ शकत नाही; मग ही हानी जाणूनबुजून केलेली असो, चुकीच्या अंदाजामुळे असो किंवा एखाद्या चुकीमुळे झालेली असो.”—बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायन्टिस्टस.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा