वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. ३ पृ. ४-५
  • उत्तरांचा शोध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तरांचा शोध
  • सावध राहा!—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
सावध राहा!—२०१७
g17 क्र. ३ पृ. ४-५

मुख्य विषय | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?

उत्तरांचा शोध

आपल्यावर होणाऱ्‍या वाईट बातम्यांच्या भडिमारामुळे जर तुम्ही घाबरून जात असाल, तर फक्‍त तुम्हालाच असं वाटतं असं नाही. २०१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या बराक ओबामा यांनी सांगितलं, की प्रसार माध्यमाद्वारे ज्या वाईट बातम्या लोकांपर्यंत पोचवल्या जातात त्यांमुळे अनेकांना वाटतं की “हे जग एका चक्राप्रमाणे अतिशय वेगाने फिरत आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणं कोणालाही शक्य नाही.”

पण, असं म्हटल्याच्या काही वेळाने बराक ओबामा यांनी जागतिक समस्या सोडवण्यासाठी ज्या योजना केल्या जात आहेत त्यांच्याबद्दल खूप आपुलकीने मत व्यक्‍त केलं. सरकार जो पुढाकार घेत आहे, त्याला त्यांनी एक “आनंदाची बातमी” असल्याचं म्हटलं. तसंच, ते स्वतः “मुळात आशावादी” आहेत असंही त्यांनी म्हटलं. दुसऱ्‍या शब्दांत, त्यांचं असं म्हणणं होतं की मानवांनी योग्य हेतूने मेहनत घेतली, तर ते या जगावर नियंत्रण मिळवू शकतात आणि जागतिक विनाश होण्यापासून थांबवू शकतात.

अनेक जण असाच आशावादी दृष्टिकोन बाळगतात. उदाहरणार्थ, काही लोक विज्ञानावर भरवसा करतात. तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्‍या प्रगतीमुळे जगाच्या समस्यांवर तोडगा निघेल, अशा अभिवचनांवर ते विश्‍वास करतात. डिजिटल टेक्नॉलॉजी आणि इन्होवेशनच्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या एका व्यक्‍तीने पूर्ण आत्मविश्‍वासाने असा अंदाज बांधला, की २०३० पर्यंत “तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण आताच्या तुलनेत हजार पटींनी प्रबळ असू आणि २०४५ पर्यंत तंत्रज्ञान लाखो पटींनी जास्त प्रबळ असेल.” ते पुढे म्हणतात: “आताही आपण चांगलं करत आहोत. आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्या कधीच खूप मोठ्या नव्हत्या. उलट, समस्या उद्‌भवण्याच्या आधीच त्यांना सोडवण्याचे उपाय आपल्या हातात असतात.”

तर मग जगाची परिस्थिती नेमकी किती खराब झाली आहे? आपण खरंच जागतिक विनाशाच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत का? हे खरं आहे की काही वैज्ञानिक आणि राजकीय नेते आशावादी संदेश देतात. पण, भविष्यात काय होईल याबद्दल अनेकांना शंका वाटते? असं त्यांना का वाटतं?

आण्विक स्फोट

मोठ्या प्रमाणावर विनाश करणारी शस्त्रं. संयुक्‍त राष्ट्रे आणि इतर संघटना सर्वोत्तम प्रयत्न करूनही आण्विक शस्त्रांना पूर्णपणे नाहीसं करण्यात अयशस्वी ठरले आहेत. याउलट, बंडखोर नेत्यांनी शस्त्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्‍या कायद्यांची निंदा केली आहे. अनेक वर्षांपासून ज्या देशांजवळ आण्विक शस्त्र आहेत त्या देशांनी अविचारीपणे त्यांच्याजवळच्या जुन्या बॉम्बमध्ये सुधारणा केली आहे आणि आणखीन नवनवीन प्राणघातक बॉम्ब तयार केले आहेत. मोठ्या प्रमाणावर विनाश करणारी शस्त्रं ज्या देशांमध्ये नव्हती, ते देश आज इतके सक्षम झाले आहेत की ते मोठ्या प्रमाणावर लोकांचा विनाश करू शकतात.

आण्विक युद्ध करण्यासाठी बरेच देश पूर्वी कधी नव्हे इतके आज सक्षम झाले आहेत. आज या ‘शांतीच्या’ काळातही या गोष्टीमुळे खरंतर जगात एक खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. “उदाहरणार्थ स्वयंचलित प्राणघातक शस्त्रे आपल्यासाठी चिंतेचं एक कारण ठरू शकतात,” असा इशारा बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायन्टिस्टस याने दिला आहे.

हॉस्पिटलच्या खाटेवर एक व्यक्‍ती

धोक्यात असलेलं आपलं आरोग्य. आज विज्ञानाला मर्यादा आहे. त्यामुळे ते आपल्याला पूर्णपणे चांगलं आरोग्य देऊ शकत नाही. आजारपणाला कारणीभूत असलेल्या गोष्टी, जसं की उच्च रक्‍तदाब, लठ्ठपणा, वायू प्रदूषण, मादक पदार्थांचं सेवन या गोष्टी आज वाढत चालल्या आहेत. आज बऱ्‍याच लोकांचा कर्करोग, हृदय व रक्‍तवाहिन्यांसंबंधीचे विकार आणि मधुमेह अशा असंसर्गजन्य दीर्घकालीन आजारांमुळे जीव जातो. दुसरे बरेच लोक इतर आजारांमुळे अपंग झाले आहेत. या आजारांत मानसिक आजारांचाही समावेश होतो. तसंच, अलीकडच्या वर्षांत अनपेक्षितपणे, इबोला आणि झिका यांसारख्या विषाणूंची भयानक साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आजारपणावर नियंत्रण मिळवणं मानवांच्या हातात राहिलेलं नाही. इतकंच काय तर आजारांना नाहीसं करणं ही गोष्ट अशक्य वाटते.

मानवांचा निसर्गावर हल्ला. बरेच कारखाने आज वातावरणाला प्रदूषित करत आहेत. दूषित हवेमुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो.

प्रदूषणामुळे हवा आणि पाणी दूषित होतात

माणसं आणि सरकारी कारखाने हे नद्यांमध्ये किंवा समुद्रांमध्ये सांडपाणी, औषधांचा कचरा, कृषि कचरा आणि इतर प्रदूषण करणारे पदार्थ टाकतात. “या प्रदूषित पदार्थांमुळे सागरी जीवसृष्टी विषारी बनतं. तसंच, जे मानव विषारी झालेले मासे किंवा वनस्पती यांचं सेवन करतात त्यांनाही याचे वाईट परिणाम भोगावे लागतात,” असं स्पष्टीकरण एन्सायक्लोपिडिया ऑफ मरीन सायन्स देतं.

आज आपल्याकडे पिण्याचं पाणीही कमी होत चाललं आहे. रॉबीन मॅकी या ब्रिटिश सायन्सच्या लेखकाने असा इशारा दिला: “हे जग पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करत आहे आणि लवकरच याचा परिणाम जगातल्या प्रत्येक भागावर होईल.” राजनैतिक कार्यकर्ते कबूल करतात की पाणी टंचाईच्या समस्येमागे मानवांचा खूप मोठा हात आहे. यामुळे अतिशय गंभीर धोका निर्माण झाला आहे.

वादळ

निसर्गाचा मानवांवर हल्ला. वादळ, चक्रीवादळ आणि भूकंप यांमुळे विनाश करणारे पूर, भूस्खलन आणि इतर प्रकारची हानी होते. या नैसर्गिक विपत्तींमुळे पूर्वी कधी नव्हे इतक्या जास्त लोकांचा आज जीव जात आहे किंवा त्यांना अतिशय वाईट परिणामांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस प्रशासन यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, “आणखी तीव्र वादळं, जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि आणखी मोठ्या प्रमाणावर पूर-दुष्काळाचे चक्र सुरू राहण्याची” खूप जास्त शक्यता आहे. निसर्ग खरंच मानवजातीचा अंत करेल का?

आपल्या जीवनाला धोकादायक असलेल्या इतरही आणखीन मोठमोठ्या गोष्टी असू शकतात. पण आज ज्या वाईट गोष्टी घडत आहेत, त्यांचं परीक्षण करून तुम्हाला भविष्याबद्दलच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळणार नाहीत. तसंच, काही जण म्हणतील की राजकीय नेत्यांकडून किंवा वैज्ञानिकांकडूनही उत्तरं मिळणं शक्य नाही. पण मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, अनेकांना जगाच्या परिस्थितीबद्दल आणि भविष्याबद्दल असलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक आणि खात्रीलायक उत्तरं मिळाली आहेत. ही उत्तरं कुठे सापडू शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा