वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. ७
  • पोप आणि अपोकलीप्स

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पोप आणि अपोकलीप्स
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • अपोकलीप्स—ते काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • अपोकलीप्स केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • विश्‍वविनाशाची भीती कशाला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. ७

पोप आणि अपोकलीप्स

आर्मगिदोन टाळणे हे दोन वार्ताहारांनी पोपचे राजकारण या १९८४ च्या त्यांच्या पुस्तकास दिलेले नाव आहे. गॉर्डन थॉमस व मॅक्स मॉरगन–विट्‌स्‌ हे गेली १७ वर्षे पोपच्या बादशाही कारभाराचे वृत्त देतात. उच्च स्थरावरील कॅथोलिक चर्चची अपोकलीप्स बाबतच्या चिंतेविषयी त्यांच्याकडून कोणती अंतर्दृष्टी प्राप्त करु शकतो?

या वार्ताहरांप्रमाणे मॉनसिग्नर इमरी कबोन्गो, जे जॉन पॉल दुसरे यांचे खाजगी सचिव आहे ते म्हणतात: “पोप हे जणू काय आध्यात्मिक हर्क्युलसप्रमाणे महासत्तांना एकमेकांपासून दूर राखण्याचा प्रयत्न करुन अण्वस्त्र आर्मगिद्दोन टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

पवित्र शास्त्र भाकित करते ते महासंकट वा अपोकलीप्स देवाकडून मानवी घडामोडीत हस्तक्षेप करुन येण्याऐवजी, मानवी कृत्याने गोलार्धिक नाशाकरवी घडेल याबाबत चर्च नेते चिंताक्रांत आहेत हे दिसून येते. अशाप्रकारे, आर्मगिदोन टाळणे म्हणते: “कबोन्गोसोबत संलग्न असणाऱ्‍यांच्या बाबतीत, त्यांनी हेरलेल्या अपोकलीप्सला पुढे ढकलण्याच्या संबंधाने तणावपूर्वक बाह्‌यलक्षण दिसत नाही. . . . परंतु आंतरराष्ट्रीय बिशपांच्या धोरणविषयक सभेत मात्र तणाव दिसत आहे. ही सभा, जाणूनबुजून लादलेला नाश यावर ‘युध्दाप्रमाणेचा जहालपणा, हिंसाचार व दहशतवाद व सोईस्कर व खासपणे अण्वस्त्र शस्त्रागारांची वाढ व सर्व युध्दास्त्रे यांची धक्कादायक देवाणघेवाण यांच्या दुःखद नोंदीने मोर्तब झाली होती.” पोप सुध्दा समाविष्ठ आहेत. थॉमस व मॉरगन–विट्‌स्‌ हे सांगतात की त्यांच्या अभ्यासाच्या पुस्तकात इन्टरनॅशनल डिफेन्स रिव्ह्यु, द प्रॉब्लेम ऑफ मिलिटरी रेडिनेस व सरप्राइज अटॅक: लेसन्स फॉर डिफेन्स प्लॅनिंग या पुस्तकांचा समावेश आहे. ते पुढे म्हणतात:

“पोप परिपत्राच्या संग्राहाच्या अगदी बाजूलाच अशा विषयाच्या पुस्तकांचा संग्रह आहे ज्याकडे पोपचे लक्ष आकर्षून घेतले जात आहे: और्ध्व शिक्षाशास्त्र, देव युगाची समाप्ती करण्यासाठी पृथ्वीवर ‘घटनां’च्या मालिका घडवून आणून त्याच्या राज्याची प्रस्थापना करील हा विवाद स्पष्ट करणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय शिक्षणाचा अभ्यास. जॉन पॉल औत्सुक्याने मानतात की कदाचित या शतकाच्या समाप्तीपूर्वी काहीतरी ‘नाशकारक’ जगास धुवून टाकील. ती मरी, दुसरा काळा मृत्यु असू शकेल का? किंवा अवर्षण अथवा कल्पना करु शकणार नाही एवढा दारुण दुष्काळ? किंवा अण्वस्त्र युध्द? त्यांना उत्तरार्धाच्या गोष्टीची सातत्याने भीती वाटते कदाचित या गोष्टीच्या चिंतनामुळे की अण्वस्त्र भडक्याने जगाचा विनाश होण्यापूर्वी जे जगाचे शेवटले दशक ठरु शकेल त्यात त्यांना चर्चच्या मस्तकपदाची भूमिका पूर्ण करायची आहे.”

आर्मगिदोन टाळणे हे प्रकाशन लाक्षणिक “नाशदिवस घड्याळ” ज्यावर नियमितपणे बुलेटीन ऑफ द ॲटोमिक सायन्टीस्ट यात ठळकपणे जोर दिला जातो त्याकडे लक्ष वेधिते. हे “घड्याळ” सर्वप्रथम १९४७ मध्ये छापले गेले तेव्हा ते मध्यरात्रीस सात मिनिटे आहेत असे “जग हे अण्वस्त्र आर्मगिद्दोनाच्या केवढ्या नजीक होते” हे दाखविण्यास ठेवले होते. १९७२ चा शस्त्रास्त्र मर्यादा तह झाल्यानंतर ते मध्यरात्रीस १२ मिनिटे आहेत असे ठेवले गेले. १९८४ मध्ये थॉमस व मॉरगन–विट्‌स्‌ लिहितात: “आता घड्याळ मध्यरात्रीस तीन मिनिटे उरलेले दाखविते. तीस वर्षापूर्वी होता त्यापेक्षा नाशाचा दिवस समीप आहे.”

“अण्वस्त्र आर्मगिदोन टाळण्यासाठी” नोव्हेंबर १९८५ मध्ये पोपकरवीचे काही प्रयत्न झाले तरीही घड्याळाचे काटे तीनच मिनिटे आहेत हे दाखवीत होते. यास्तव राष्ट्रे मानवजातीचा नाश करतील का यावर मन विचलीत होऊ देऊ नका. अपोकलीप्स टाळण्याऐवजी या अपोकलीप्समधून बचावाचा देवप्रणीत मार्ग धुंडाळणे शहाणपणाचे ठरेल, कारण ते निश्‍चितपणे, “पृथ्वीवरील सर्व रहिवाश्‍यांवर येणार.”—प्रकटीकरण ३:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा