दिरंगाईपणा काळचोर
“दिरंगाईपणा हा काळचोर आहे”—एडवर्ड यंग, सा. यू. १७४२.
थांबा! हा लेख वाचण्याचे थांबवू नका! काय होईल हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही वाचण्याचे थांबवाल आणि म्हणाल: “लेखाचे शीर्षक तर आस्था उत्पन्न करणारे आहे; परंतु तो वाचण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाही. मी तो उद्या वाचेल” परंतु उद्या कधीच येत नाही.
दिरंगाईपणावर आधारित असलेला हा लेख वाचण्यात दिरंगाई करु नका! हा लेख वाचण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल याचा विचार करा. सुमारे पाच मिनिटांमध्येच हा संपूर्ण लेख वाचणे तुम्हाला शक्य होईल. तुम्ही असे केल्यास या संपूर्ण नियतकालिकाचा १० टक्के भाग पूर्ण केलेला असेल! घड्याळ लावा आणि वाचण्यास सुरुवात करा. (तुम्ही या लेखाचा ५ टक्के भाग पूर्ण देखील केलात!)
हा दिरंगाईपणा आहे का?
तुम्ही एखादी गोष्ट बाजूला ठेवता—आता करु शकता किंवा केली पाहिजे अशी गोष्ट पुढे ढकलता—तर, तुम्ही दिरंगाई करता. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, तुम्ही उद्याचा विचार करत असल्यास—आज, आत्ता तुम्ही काय करु शकता. कृतीची आवश्यकता असते तेव्हा दिरंगाईपणा करणारी व्यक्ती कृती करण्यास विलंब करते.
देखरेखा कामगाराकडे प्रकल्पाचा अहवाल मागतो; मुलाने स्वतःची खोली स्वच्छ ठेवण्याचे पालक त्याला सांगतात; पत्नी आपल्या पतीला नळ दुरुस्त करण्यासाठी सांगते. “मी फारच कामात होतो” किंवा “मी विसरलो” किंवा “माझ्याकडे वेळ नव्हता,” अशा प्रकारच्या सबबी ही कामे टाळण्यासाठी दिली जातात. खरे पाहता आपल्यापैकी काही जणांनाच त्यांना आवडणारी कामे असतानाही, अहवाल सादर करण्यास किंवा खोल्या स्वच्छ राखण्यास अथवा नळाची दुरुस्ती करण्यास आवडते. त्यामुळे आपण ही कामे करण्याचे बाजूला ठेवतो किंवा विलंब लावतो.
तथापि, काही वेळेस एखादी गोष्ट करण्याचे बाजूला ठेवल्यामुळे दिरंगाईपणा होत नाही, हे तुम्हाला ठाऊक होते का? एका व्यापारी स्रीला एक विनंती पत्र आले आणि त्याचे काय करावयाचे हे तिला माहीत नसल्यामुळे तिने ते मागणी पत्र आपल्या मेजावर “स्थगिती” नामक पेटीतील फाईलमध्ये ठेवले. काही सप्ताहानंतर तिने त्याची उजळणी केली तेव्हा त्यातील निम्म्यापेक्षा अधिक गोष्टींवर कार्यवाही करण्याची गरज नसल्याचे तिला आढळले. त्या समस्यांचे आपोआपच निवारण झाले होते किंवा त्या समस्या आता उरल्या नव्हत्या. कार्यवाही करण्यास विलंब करावा की कार्य करावे या बाबतीत तुम्ही अनिश्चित असल्यास तुम्ही जे करण्यास पुढे ढकलले आहे ते कधीच न केल्यास काय होईल याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ते काम केल्यास त्याचा होणारा परिणाम अनुकूल असेल की प्रतिकूल होईल?
आम्हाला शक्य असल्यास आत्ताच पाऊले उचलली पाहिजेत नाहीतर आवश्यक ती कृती करण्यास विलंब केल्याने नंतर अनेक समस्या उद्भवू शकतात तर मग उशीर करणे हा दिरंगाईपणा ठरेल. उदाहरणार्थ, खरकटी ताटे सुकल्यानंतर ती स्वच्छ घासण्यास अधिक श्रम लागतात. कारची काळजी घेणे लांबणीवर टाकल्यावर नंतर तिच्या दुरुस्तीसाठी मोठी किंमत मोजावी लागते. बिल देण्यास उशीर केल्याने त्याचा परिणाम म्हणून अधिक किंमत द्यावी लागते किंवा सेवांपासून वंचित व्हावे लागते. एका स्रीने तिचा वाहतुक खर्च, व्हिडीयो टेप्स् आणि वाचनालयातील पुस्तके यांच्या विलंब दंडाची एकूण बेरीज केल्यानंतर ती ४६ डॉलर एवढी झाली! हा दंड केवळ एका महिन्याचा होता!
चोरास पकडणे
तुम्ही दिरंगाईपणा का करता हे समजून घ्या. खालील कारणांवर दृष्टिक्षेप टाका आणि त्यापैकी एखादे कारण तुम्ही अद्यापि चालू न केलेल्या किंवा पूर्ण न झालेल्या प्रकल्पाला लागू होते का ते पहा:
सवय:
मी शेवटच्या मिनिटापर्यंत थांबलो तर तो पूर्ण करण्यासाठी मला अधिक प्रेरणा मिळते.
अगदी शेवटच्या क्षणाला पूर्ण केल्याने निर्माण होणाऱ्या उद्क्षोभकापासून मला आनंद मिळतो.
मालकांनी दोन-तीन वेळा एखाद्या कामाची आठवण करुन देईपर्यंत मी थांबेल त्यानंतर ते काम त्यांना खरोखरच पुर्ण करुन हवे आहे याची मला जाणीव होईल.
माझ्याकडे करण्यासाठी पुष्कळ काही आहे परंतु केवळ बिकट परिस्थितीकडे माझे लक्ष वेधले जाते.
मनोवृती:
एखादी नियुक्ती मिळावी किंवा ती पूर्ण करावी अशी माझी इच्छा नाही.
मला एखादी गोष्ट कराविशी वाटते तेव्हाच मी ती करतो.
मला दुसरेच काहीतरी करायचे आहे.
माझ्याकडे आत्म-शिस्तीचा अभाव आहे.
भय:
मी हे पूर्ण करीन याविषयीची मला खात्री नाही.
हे पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही.
हा फारच प्रचंड प्रकल्प आहे. मला मदतीची गरज आहे.
मी यात यशस्वी झालो नाही किंवा तो पूर्ण केला नाही तर काय?
मला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधनांची गरज आहे.
माझी टीका केली जाईल किंवा मी गोंधळून जाईल याची मला भीती वाटते.
विविध लोक विविध टप्प्यांमध्ये दिरंगाईपणा करतात. काहीजण प्रकल्प फार मोठा आहे असा विचार करुन तो प्रकल्प सुरु करण्यातच दिरंगाईपणा करतात. काहीजण प्रकल्प सुरु करतात; परंतु मध्यंतरामध्येच त्यांचा उत्साह कमी होऊ लागतो आणि प्रकल्प पूर्ण करण्याचे ते सोडून देतात. याशिवाय काहीजण त्यांचा पहिला प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गावर असतात तेव्हाच त्या प्रकल्पाला अपूर्ण सोडून दुसऱ्या प्रकल्पास सुरुवात करतात. (तसे पाहता, तुम्ही उत्तम करत आहात. कारण तुम्ही या लेखाचा अर्धा भाग वाचला देखील.)
प्रकल्प सुरु न करण्याचा किंवा पूर्ण न करण्याच्या तुमच्या कारणांचे वर्गीकरण कदाचित तिन्ही प्रकारांमध्ये करता येईल. निल फायरे यांनी आत्ताची सवय (इंग्रजी) पुस्तकात लिहिले: “सामान्यतः दिरंगाईपणाच्या समस्यांना प्रमुख तीन गोष्टी कारणीभूत आहेत: दडपशाहीपणासारखी भावना, कामाचा बोजा असणे आणि अपयशाचे भय.” कारणे कोणतीही असली तरी परिणामांना ओळखल्यास तुम्ही समस्या सोडविण्याच्या मार्गावर असाल.
तुम्ही दिरंगाईपणा का करता हे तुम्हाला कळत नसल्यास अर्ध्या तासाच्या मध्यांतरात तुमच्या संपुर्ण आठवड्याच्या कार्याची नोंद ठेवा. तुम्ही वेळ कसा खर्च करता हे ठरवा. असे केल्याने महत्त्वाच्या कामगिरीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या क्षुल्लक गोष्टींमध्ये किती वेळ खर्च करतो हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. परंतु पुढे काय?
परिणामांचा विचार करा
एखादे काम स्वतः कोणताही प्रयत्न न करता होईल, अशी अपेक्षा बाळगल्याने कंटाळा येतो. तुम्ही प्रकल्पाच्या शेवटच्या अपेक्षित तारखेस पोहंचता तेव्हा तुमच्यावर दबाव येतो आणि तुम्हाला चिंता वाटू लागते. ही भावना बळावल्याने तुमच्या निर्मिती क्षमतेवर बाधा येते. अशावेळी ध्येय साध्य करण्याच्या विविध मार्गांची यथायोग्यता ठरविण्यात किंवा त्यांचे मोजमाप करण्यात तुम्ही जास्त लक्ष देत नाही तर कसेतरी पूर्ण करण्याच्या मागे तुम्ही लागता.
उदाहरणार्थ: तुम्हाला एखाद्या विषयावर बोलण्यास सांगितले आहे. आदल्या रात्री तुम्ही बसून कागदावर टिपण घेता. तुमच्या विषयावर संशोधन करण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ घालविला नाही, म्हणून ते तुम्ही “आहे त्यावरच” सादर करता. कदाचित थोडा प्रयत्न केला असता तर तुम्ही तुमच्या वक्तव्यांमध्ये अनुभव, विषयाला पुष्टी देणारी माहिती किंवा तक्त्यांचा देखील समावेश करू शकला असता, ज्याद्वारे श्रोत्यांना तुमच्या विषयाची चांगल्यारितीने कल्पना येण्यास मदत मिळाली असती.
रिकाम्या वेळेत आराम करता न येणे, हा प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब करण्याचा दुसरा परिणाम होय. याचे कारण म्हणजे, आपण प्रकल्प अपूर्ण सोडला आहे हे एकसारखे ऐकण्याची भावना (किंवा वारंवार कोणीतरी आठवण करुन देणे) होय.
मी काय करु शकतो?
यादी तयार करा. ही यादी आदल्या रात्रीच तयार करा. दुसऱ्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या एका कागदावर मांडा. अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही गोष्टी विसरणार नाही आणि पूर्ण केलेल्या गोष्टींची कागदावरील बरोबरची खून करताना तुम्हाला तुमची प्रगती पाहता येईल. प्रत्येक बाबींच्या उजव्या बाजुस तुम्ही या गोष्टी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल ते लिहा. प्रत्येक दिवशी ‘करावयाच्या कामांची यादी’ तयार करत असल्यास प्रत्येक कामास किती वेळ लागेल ते मिनिटांमध्ये लिहा. तुम्ही प्रकल्पाची यादी करत असल्यास तासांचा उपयोग करा. ही यादी आदल्या रात्री तयार करा. दुसऱ्या दिवसाची यादी तयार करण्यासाठी काही मिनिटे वेळ काढा. मासिक दिनदर्शिका जवळच ठेवा. नेमणुकींचा स्वीकार केल्यानंतर किंवा भेटण्याची वेळ दिल्यानंतर दिनदर्शिकेतील त्या तारखांवर त्यांचा उल्लेख करा.
दुसऱ्या दिवशी करावयाच्या कामांची उजळणी करतेवेळी प्राधान्य देणाऱ्या गोष्टींना तुमच्या दिनदर्शिकेवर अ, ब, क वगैरे अक्षरांनी दर्शवा ज्याद्वारे क्रमानुसार त्या कामांना पूर्ण करता येईल. काहीजण सकाळी उत्तम प्रकारे काम करतात तर काहींना ते दुपारी किंवा संध्याकाळी करणे शक्य होते. सर्वात मोठ्या प्रकल्पाचे वेळापत्रक तयार करतेवेळी त्या प्रकल्पास सर्वोत्तम वेळ द्या. आवडणाऱ्या कामांच्या अगोदर न आवडणाऱ्या कामांचा उल्लेख करा.
वेळ ठरवा. तुम्हाला नेहमीच उशीर होतो किंवा उशीर झाल्यामुळे तुम्हाला अक्षरशः पळावे लागते तेव्हा वेळ ठरवण्यास शिका. म्हणजेच कामगिरी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे अचूक ठरविणे होय. कदाचित अचानक उद्भवणाऱ्या “संकटा”करीता कामगिरी पूर्ण करण्याच्या एकूण वेळेमध्ये काही ज्यादा मिनिटांचा समावेश करा. दोन भेटींच्यामध्ये वेळ ठेवण्यास विसरु नका. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा समावेश करण्याची देखील गरज आहे. तुम्ही एक सभा सकाळी १० वाजता संपवून शेजारील खोलीत होणारी दुसरी सभा सकाळी १० वाजताच सुरू करू शकत नाही; तर मग शहराच्या दुसऱ्या भागात सभा असल्यास किती वेळ द्यावा लागेल. दोन सभांमध्ये पुरेसा वेळ द्या.
सुपूर्त. सर्व गोष्टी स्वतःच करण्याचा आपण बहुतेक वेळा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस असे करण्याची काही गरज नसते. एखादी व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये जात असल्याचे आपल्याला ठाऊक असल्यास आपल्याला पोष्टात पाठवायचे पार्सल त्या व्यक्तीद्वारे आपण पाठवू शकतो.
विभागणी करा. काही वेळेस प्रकल्पाची अवाढव्यता पाहूनच आपण प्रकल्पाची सूरूवात करत नाही. तर मग, मोठ्या कामगिरींची विभागणी लहान विभागांमध्ये का करू नये? प्रकल्पाच्या एका लहान विभागाची पूर्णता केल्यानंतर आपण आपली प्रगती पाहू शकतो आणि त्यामुळे प्रकल्पाचा पुढील विभाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते.
व्यत्ययांसाठी तयार रहा. आपल्या रोजच्या कामात नेहमीच—फोन कॉल्स, भेट देणाऱ्या व्यक्ती, समस्या आणि टपाल यामुळे अनेक व्यत्यय निर्माण होतात. परिणामकारकपणे काम करावे असे आपल्याला वाटते आणि यामध्ये अशा लोकांबरोबर काम करण्याचा समावेश होतो ज्यांना त्यांची स्वतःची निश्चित वेळ देखील असते. केवळ कार्यक्षमतेने काम करण्यावर लक्ष केंद्रीत केल्यास, इतरजन आपल्या कार्य हालचालींमध्ये व्यत्यय आणतात तेव्हा आपण निराश होऊ शकतो. त्यामुळे व्यत्ययांसाठी तयार राहा. अनपेक्षित उद्भवणाऱ्या गोष्टींसाठी दररोज वेळ काढा. ज्यावेळेस अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा आपण त्या गोष्टींसाठी वेळ बाजूला ठेवला आहे, हे जाणून त्यांच्याकडे लक्ष पुरवा.
प्रतिफळ. वेळापत्रक तयार करतेवेळी सुमारे ९० मिनिटे जास्तीत जास्त किंवा एकाग्रतेने काम करण्यास हवे. कामाची पूर्वतयारी करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला राखून ठेवण्यास विसरू नका. प्रत्यक्ष कामास तुम्ही सुरूवात केली आहे आणि सुमारे दीड तासापासून तुम्ही काम करत आहात त्यानंतर तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज भासेल. तुम्ही कार्यालयात काम करत असल्यास थोडावेळ थांबा, थोडेसे शिथिल व्हा आणि विचार करा. तुम्ही बाहेर काम करत असल्यास ताजेतवाने होण्यासाठी काहीतरी घ्या. तुमच्या कामापासून स्वतःस प्रतिफळ द्या.—उपदेशक ३:१३.
याचा आता जरा विचार करा की, या लेखाचे शीर्षक वाचल्यापासून हा लेख तुम्ही पाच मिनिटांमध्ये वाचून सुद्धा काढला. कदाचित तुम्ही प्रगतीपथावर आहात!