वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ४/८ पृ. २९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍तापासून एड्‌स?
  • दिल्लीतील हरवलेले लोक
  • टी. व्ही. वरील हिंसाचाराचे मोजमाप
  • जागतिक कुपोषण
  • क्यूबामधील यहोवाचे साक्षीदार
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • वाचा विकृतीवर मात!
    सावध राहा!—१९९८
  • जगावरील दृष्टीक्षेप
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९५
g95 ४/८ पृ. २९

जगावरील दृष्टिक्षेप

रक्‍तापासून एड्‌स?

रक्‍त संक्रमण किंवा रक्‍ताच्या घटकांपासून एड्‌स होण्याच्या किती शक्यता आहेत? जॉन्सबर्गच्या स्टार या वृत्तपत्रानुसार एड्‌सची ओळख पटविण्यात आली तेव्हापासून, संपूर्ण जगातील ६,००,००० लोक—किंवा संसर्ग झालेले सर्व १५ टक्के—लोकांना रक्‍त किंवा रक्‍ताच्या घटकांमुळे एड्‌स विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या एचआयव्ही जीवाणूसाठी रक्‍ताची चाचणी घेण्यास फारच वेळ आणि पुष्कळ पैसा देखील लागतो. काहींच्या मते रक्‍ताच्या कमीत-कमी सात वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या पाहिजेत. बहुतेकवेळा, विकसनशील देशांकडे पैसा नसतो किंवा या चाचण्यांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण नसते. समृद्ध देशांमध्ये या चाचण्यांचा वापर केला जात असला तरीदेखील या चाचण्यांमध्ये त्रुटी आढळून येतात. डच रक्‍त-संक्रमण सेवेचे प्रमुख, पॉल स्ट्रेंजर कबूल करतात: “एचआयव्ही जीवाणू किंवा यकृतसंबंधी रोगाचा विचार करता कोणताही रक्‍ताचा घटक १०० टक्के सुरक्षित असल्याचे आपल्याला म्हणता येणार नाही.” (g95 3/22)

दिल्लीतील हरवलेले लोक

भारताची राजधानी, दिल्लीमध्ये प्रत्येक वर्षी १०,००० पेक्षा अधिक लोक हरवल्याच्या नोंदी केल्या जातात. यापैकी केवळ एक तृतीयांश लोकांचाच शोध लावला जातो. हरवलेल्यांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्‍यांचे प्रमाण पन्‍नास टक्के असते आणि यापेक्षा जास्त वय असणाऱ्‍या पुरुष व स्त्रियांचे प्रमाण अनुक्रमे दोनास एक असे आहे. द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी) यामध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, चुकलेल्या हजारो तरुण मुली वेश्‍यागृहामध्ये पोहंचतात. तरुण मुलांवर गुन्हेगारी टोळ्यांकडून भिक्षा मागण्यासाठी जबरदस्ती केली जाते किंवा लहान उपहारगृहांमध्ये कमी पगारावर प्रमाणापेक्षा जास्त वेळ काम करुन घेतले जाते. (g95 4/8)

टी. व्ही. वरील हिंसाचाराचे मोजमाप

परीक्षण करुन तयार करण्यात आलेल्या विवादास्पद नव्या अहवालाने असा दावा केला की, अमेरिकी टी. व्ही. बद्दल मोठा संताप असतानाही—आणि टी. व्ही. केंद्राने अशा कार्यक्रमास आळा घालण्याची आश्‍वासने दिलेली असतानाही—मागील दोन वर्षांमध्ये टी. व्ही. वरील हिंसाचारामध्ये वास्तविकपणे वाढ झाली आहे. याचे परीक्षण, माध्यम आणि सार्वजनिक घटनांचे केंद्र याद्वारे करण्यात आले आणि एकाच दिवशी दहा केंद्रांची तपासणी करण्याद्वारे आणि त्यांच्या विषयांची तुलना मागील दोन वर्षांपूर्वीच्या त्याच तारखांच्या कार्यक्रमाबरोबर केल्यानंतर निष्कर्ष काढले. शारीरिक हानी किंवा मालमत्तेच्या नुकसानास कारणीभूत ठरणारी हेतुपुरस्सर केलेली शारीरिक जबरदस्ती, अशी या हिंसेच्या कृतीची व्याखा करण्यात आली. तिच्यामध्ये दोन वर्षांच्या कालावधित ४१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे यावरून समजले. प्राणघातक किंवा संभाव्यपणे गंभीर इजा करणारे कार्य अशी गंभीर हिंसेच्या कृतीची व्याखा करण्यात आली आहे आणि तिच्या संख्येमध्ये ६७ टक्के वाढ झाली आहे. “प्रत्येक टी. व्ही. केंद्राच्या प्रती तासाला हिंसक घटनांचा दर १० दृश्‍यांपासून वाढून १५ दृश्‍ये झाला आहे,” टी.व्ही. गाईड अहवाल देते. (g95 3/22)

जागतिक कुपोषण

जगभरामध्ये कुपोषणाच्या बाबतीत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात. जागतिक बालक प्रकृती बातम्या आणि पुनर्विचार (इंग्रजी) या वृत्तपत्रानुसार कुपोषणामुळे पीडित असणाऱ्‍या पाच वर्षाखालील मुलांचे प्रमाण १९७५ मधील ४२ टक्क्यावरुन १९९० मध्ये ३४ टक्क्यापर्यंत घटले आहे. तथापि, कुपोषणामुळे पीडित असणाऱ्‍या मुलांच्या एकूण संख्येमध्ये वाढ झाली आहे. विकसनशील देशातील पाच वर्षांखालील सुमारे १९.३ कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा कमी किंवा फारच कमी आहे आणि यापैकी तृतीयांश मुले फारच कुपोषित आहेत. या वृत्तपत्राने लिहिले की, मुले किंचित प्रमाणात कुपोषित असल्यास आजारी पडून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते. साधारण कुपोषित मुलाच्या बाबतीत हा धोका तिप्पट असतो. फारच कुपोषित असणाऱ्‍या मुलाच्या बाबतीत आजारी पडून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता ११ पटीने वाढते. हे वृत्तपत्र अहवाल देते की, औद्योगिक देशांमध्ये मुलांच्या कुपोषणाचे सर्वसामान्य स्वरुप लठ्ठपणा आहे. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेत मुलांना सुमारे ५० टक्के शक्‍ती त्यांच्या शरीरातील स्निग्ध पदार्थांमुळे मिळते—“आवश्‍यक प्रमाणापेक्षा शक्‍तीचे प्रमाण दुप्पट,” आहे. (g95 3/22)

क्यूबामधील यहोवाचे साक्षीदार

क्यूबामधील यहोवाचे साक्षीदार त्यांची सेवा पुढे चालू ठेवण्यास मिळालेल्या अधिक स्वतंत्रतेचा आनंद घेत आहेत. त्यामुळे लोकांबरोबर देव-राज्याच्या सुवार्तेची सहभागिता करणे त्यांना शक्य झाले आहे. हे कार्य शासकीय मान्यताप्राप्त किंवा वैध करण्यात आले नसतानाही त्यांच्या सुरवातीच्या कार्यालयांचा वापर करण्यास त्यांना परवानगी देण्यात आली आहे आणि ते उपासनेसाठी आणखी मुक्‍तपणे मिळाले आहेत—येथपर्यंत की त्यांनी लहान संमेलने सुद्धा आयोजित केली आहेत. त्यांना नियकालिके छापण्यासाठी प्राधिकार देण्यात आला आहे. अलीकडे घडलेल्या या आनंददायक आणि उत्साहपूर्ण घटनांमुळे हे साक्षीदार त्यांचे प्रचार कार्य कायम ठेवत आहेत आणि बायबलमधील आशेचा संदेश कळविण्यात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा