तरुण लोक विचारतात. . . .
मी हे विचार कसे काढून टाकू शकतो?
“आता समलैंगिकता मला मनाला विषाद देणारी वाटते, परंतु कधीकधी मी तिच्याकडे आकर्षित होतो. हे विचार मला काही वेळेस रात्रंदिवस त्रास देतात. मी यहोवाला कायम प्रार्थना करीत आलो आहे, ‘हे भयानक विचार माझ्या मनातून काढून टाक!’ ते कधी काढून टाकले जातील का?”—डेनीसa
अनेक ख्रिस्ती युवकांनी—पुरुष आणि स्त्रियांनी—निराश होऊन मदतीसाठी अशाच विनंत्या केल्या आहेत. ते समलैंगिकतेकडे आकर्षित होतात, परंतु त्या जीवनशैलीची गुणलक्षणे, म्हणजेच स्वैर वर्तन, रोग आणि नैतिकरित्या भिकेस लागणे यात त्यांना कोणताही भाग नको आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ते देवाला संतुष्ट करू पाहतात आणि त्याच्या वचनात त्याने स्पष्टरित्या समलैंगिकतेचे खंडन केले आहे.—रोमकर १:२६, २७; कलस्सैकर १:१०.
समलैंगिक व्यक्ती कधीही बदलू शकत नाहीत असा दावा बहुधा केला जातो. तथापि, हे खरे नाही. काही प्राचीन ख्रिस्ती समलैंगिकता आचरीत होते परंतु ते बदलले. (१ करिंथकर ६:९-११) होय, लोकप्रिय काल्पनिक कथांच्या विरुद्धतेत, लोक बदलू शकतात आणि ते बदलतात. तथापि, एखादा युवक यशस्वीरित्या समलैंगिकतेची कृत्ये पूर्णपणे टाळू शकत असला, तरी त्याला किंवा तिला समलैंगिकतेची वासना संपूर्णतः काढून टाकण्यास कठीण वाटत असेल. एका तरुण पुरुषाने म्हटले: “मी माझे विचार बदलण्याचा प्रयत्न केला. मी यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. मी बायबल वाचले. मी या विषयावरील भाषणे ऐकली आहेत. परंतु, मदतीसाठी कोठे वळावे हे मला कळत नाही.”
यावर कोणताही जादूचा किंवा तत्कालिक उपाय नाही. डेनीस आठवून सांगतो, “‘पुरुष’ बनण्याच्या प्रयत्नात मी स्वतःला स्वैर विरुद्धलिंगी लैंगिक कार्यात गोवले. हे सर्वकाही व्यर्थ होते आणि त्यामुळे यातना अधिकच वाढल्या.” तथापि, बायबलच्या तत्त्वांना लागू केल्याने, एखादी व्यक्ती अशा विचारांचा सामना करू शकते.
चुकीच्या विचार पद्धती ओळखणे
सर्वात प्रथम, कृतींआधी विचार असतात हे लक्षात घ्या. (यशया ५५:६, ७; याकोब १:१४, १५) खरे म्हणजे, डॉ. वेन डब्ल्यू. डायर म्हणतात: “विचार न केल्याशिवाय तुम्हाला तशी कल्पना (भावना) होणार नाही.” तर समलैंगिक वासनेच्या मुळाशी स्वतःविषयी, विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी, प्रेम वगैरे गोष्टींविषयी विकृत विचार पद्धत असेल. ‘आपल्या मनाचे नवीकरण करून’ असे विचार बदलून टाकण्याआधी एखाद्याने त्यांना ओळखले पाहिजे. (रोमकर १२:२) असे केल्याने समलिंगी व्यक्तींकडे एखादा का आकर्षिला जातो याची महत्त्वपूर्ण समज त्यास प्राप्त होईल.
एखादी व्यक्ती ते कसे करू शकते? एक मार्ग म्हणजे, स्तोत्रकर्त्याप्रमाणे प्रार्थना करणे: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा.” (स्तोत्र १३९:२३, २४) ते एखाद्याला आपल्या विचारांची चर्चा सुज्ञ व प्रौढ ख्रिश्चनासोबत करण्यासाठी देखील मदत करील. नीतीसूत्रे २७:१७ म्हणते त्याप्रमाणे, ‘तिखे तिख्याला पाणीदार करिते.’ अशाप्रकारे, समजदार व प्रेमळ असणाऱ्या एका ख्रिस्ती वडिलावर एका तरुण पुरुषाने भरवसा ठेवून आपल्या गुप्त गोष्टी सांगितल्या. आपले गुपित एखाद्याला सांगून त्याच्यावर भरवसा करणे हे त्याच्याकरता सोपे नव्हते, परंतु अत्यंत उपयुक्त नातेसंबंध निर्माण झाला. “मी त्यांच्याशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो,” असे तो म्हणतो. ते वडील केवळ ऐकतच नाहीत, तर कुशलतेने प्रश्न विचारून त्या तरुण पुरुषाला आपल्या भावना आणि विचार देखील व्यक्त करण्यास लावतात.—पडताळा नीतीसूत्रे २०:५.
एखाद्या पुरुषाचे वडील नाकारणारे किंवा गैरवागणूक देणारे असतील, तर वडिलांच्या प्रेमाची गरज भागवण्यासाठी समलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होण्याचा प्रयत्न खरे म्हणजे व्यर्थ आहे हे त्यास आढळून येईल. एखाद्या पुरुषाचा आदर्श नसल्याने, डॉ. जोसेफ नीकोलोसी ज्याला, “मर्दपणाचे गुण म्हणजेच, बल, अरेरावीपणा आणि सामर्थ्य यांच्यासंबंधी दुर्बलतेची व अकार्यक्षमतेची भावना” म्हणतात ती देखील त्याला वाटेल. एखाद्या मनुष्याला तो ज्या विशेष गुणांमध्ये अपुरा पडत असल्याचे वाटते त्यांचा विचार केल्यास, त्याला याचे आश्चर्य वाटेल की, इतर पुरुषांमधील हेच गुण त्याला आकर्षित करतात.
गतकाळातील दुःखद “धडे”
इतर युवकांना हे कळते की, त्यांची समस्या गतकाळातील आघातांशी संबंधित आहे. एक मुलगी आठवून सांगते: “मी समलैंगिकतेची शीर्षके असलेले अश्लील साहित्य पाहत असे. मला अनैसर्गिक वासना होऊ लागल्या.” एक तरुण पुरुष म्हणतो: “मी माझ्या वडिलांच्या गोत्रगमनाचा बळी होतो. त्यामुळे, पुरुषासोबत लैंगिक संबंध मला सामान्य वाटत होता.” असे दुःखदायक अनुभव, बळी पडलेल्या एखाद्या व्यक्तीला विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल नावड किंवा भय देखील उत्पन्न करण्यास किंवा प्रेमाची बरोबरी शारीरिक संबंधांशी करण्यास शिकवू शकतात. यास्तव, बळी पडलेली एखादी व्यक्ती तिच्या लैंगिक वासनांचे वर्णन “शारीरिक नसून, भावनात्मक गरज—कोमलता व समजूतदारपणाची गरज” असे करते.
तथापि हे कबूल आहे की, समलैंगिकतेची कारणे गुंतागुंतीची आहेत आणि पुष्कळ प्रकरणांमध्ये साधे स्पष्टीकरण देणे अशक्य आहे. चुकीचा विचार करण्यासाठी कोणतीही गोष्ट कारणीभूत ठरली तरी त्यास सुधारण्यासाठी एक व्यक्ती पुष्कळ काही करू शकते.
आपल्या मनाचे नवीकरण करणे
देवाचे वचन वापरणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. एका तरुण पुरुषाचे उदाहरण घ्या; त्याच्यामध्ये नाहीत असे मर्दपणाचे गुण जे पुरुष प्रकट करतात अशांकडे तो आकर्षित होतो. किंवा एखादी तरुण स्त्री जिला विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल भीती वाटते तिचे उदाहरण घ्या. दोघेही येशूच्या उदाहरणाचा अभ्यास करून मर्दपणाबद्दल एक चांगला दृष्टिकोन विकसित करू शकतात. (१ पेत्र २:२१) तो सौम्यतेने संतुलित असलेल्या मर्दानगीच्या शक्तीचा परिपूर्ण आदर्श होता. (मत्तय १९:१४; योहान १९:५) यास्तव, एका तरुण पुरुषाला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास फारच मदतदायी असल्याचे आढळते.b “येशूला जाणल्याने एका पुरुषाने जसे असावे त्याप्रकारे माझे स्वरूप सुधारले जाते,” असे तो म्हणतो.
त्याचप्रमाणे लैंगिक संबंध, प्रेम आणि समलिंगी मैत्रीबद्दलचा जो देवाचा दृष्टिकोन आहे त्या विषयांवरील बायबलच्या वचनांवर मनन करणे देखील एखाद्याला त्याचे विचार सुधारण्यास मदत करू शकतात.—उत्पत्ती १:२७, २८; रूथ १:१६, १७; १ शमुवेल १८:१; नीतीसूत्रे ५:१८, १९; १ करिंथकर १३:४-८.
तसेच, चुकीच्या विचारांवर मनन करण्याचे टाळणे हे देखील महत्त्वपूर्ण आहे. बहुतेकवेळा, एखादी व्यक्ती एकटी, खिन्न किंवा निराश असते तेव्हा या इच्छा अधिक तीव्र असतात. (नीतीसूत्रे २४:१०) “स्वतःला बदलण्याचा एकच मार्ग म्हणजे, वाईट विचार बदलून चांगले विचार करणे होय,” अशी एक ख्रिस्ती स्त्री म्हणते. अशी अशुद्ध इच्छा तिला झाल्यास, ती स्वतःला समलैंगिकतेबद्दल देवाच्या दृष्टिकोनाची आठवण करून देते. एक यौवनावस्थेतील युवक म्हणतो: “मला समलैंगिकतेची इच्छा होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या आवडत्या बायबलच्या वचनावर मनन करतो.” (पडताळा २ करिंथकर १०:४; फिलिप्पैकर ४:८.) इतरांना वॉचटावर सोसायटीच्या बायबलवर आधारित ऑडिओ कॅसेट ऐकत झोपी जाणे अधिक मदतदायी असल्याचे आढळले आहे.
आपण जसा विचार करतो त्याचा आपल्या वागणूकीवर परिणाम होतो त्याचप्रमाणे, आपण जसे वागतो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर आणि आपल्याला जसे वाटते त्यावर होतो. यास्तव, चुकीची वासना उत्पन्न करणारी किंवा अधिक तीव्र करणारी वागणूक व सहवास आपण सोडून दिला पाहिजे. (१ करिंथकर १५:३३) सार्वजनिक शौचालये, समुद्रकिनारे, लॉकर रूमस् आणि इतर ठिकाणे जेथे मोह होऊ शकतो अशांपासूनही एखाद्याला ‘सावध राहण्याची’ गरज असेल.—स्तोत्र ११९:९.
हस्तमैथून ही टाळण्याजोगी आणखी एक वाईट सवय आहे. पुष्कळ समलैंगिक पुरुष व स्त्रियांकरिता ती नियंत्रणाबाहेरील इच्छा आहे. “मी सहा वर्षांचा असल्यापासून मला हस्तमैथूनची समस्या होती,” असे एक तरुण कबूल करतो. “लैंगिक गोष्टींबद्दल कल्पना केल्याने माझे समलैंगिक विचार अधिक तीव्र झाले.” या अशुद्ध सवयीशी लढा द्या!c—कलस्सैकर ३:५.
दुसऱ्या बाजूला पाहता, एखाद्याने चांगल्या वागणूकीच्या सवयी उत्पन्न कराव्यात हे देखील महत्त्वपूर्ण आहे. काहींनी असे सुचवले आहे की, एका तरुण पुरुषाने मर्दपणाचे गुण विकसित केले, तर इतर पुरुषांकडे तो इतका आकर्षित होणार नाही. अर्थात, आपल्या लहानपणाच्या जीवनात एका तरुण पुरुषाचा कोणी पौरुषीय आदर्श नसेल, तर हे कसे करावे हे त्यास ठाऊक नसेल. आपल्या शरीराबद्दल त्याला अस्वस्थ वाटत असेल व नाकसबी किंवा अपौरुषीय वाटत असेल. या बाबतीत शारीरिक काम, संतुलित कसरत किंवा विरंगुळा करणाऱ्या खेळांमध्ये सहभाग घेतल्याने बहुधा मदत प्राप्त होते. (पडताळा १ तीमथ्य ४:८.) परंतु, तरुण पुरुष तीमथ्य, हा प्रेषित पौलाला मुलासारखा बनला त्याचप्रकारे एका संतुलित वडिलधारी ख्रिस्ती व्यक्तीसोबत चांगला समजूतदारपणा विकसित करणे विशेषतः एखाद्याला मदतदायी असल्याचे आढळून येईल. (फिलिप्पैकर २:१९-२२; २ तीमथ्य ३:१०) शुद्ध वागणूकीच्या मर्यादा निर्माण करून व उघड दळणवळण वाढवून असा नातेसंबंध उबदार व भरवसादायक असू शकतो व तरीही त्यात कामवासना नसेल.
सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, एखाद्याने खंबीरतेने आध्यात्मिक बाजू घेतली पाहिजे. बायबलचा नियमित अभ्यास, प्रार्थना आणि इतरांसोबत आपल्या विश्वासाची सहभागिता करणे याद्वारे एखाद्याला आपले मन आध्यात्मिक मार्गात राखण्यासाठी मदत मिळते. (स्तोत्र ५५:२२; ११९:११; रोमकर १०:१०) काहीवेळा अपात्रतेच्या भावनांमुळे सहख्रिश्चनांसोबत मिळून राहणे कठीण वाटते, परंतु बायबल स्वतःला एकाकी ठेवण्याविरुद्ध इशारा देते. (नीतीसूत्रे १८:१) दोन्ही लिंगाच्या ख्रिश्चनांसोबत हितकारक सहवास एखाद्याला संतुलित राहण्यास मदत करू शकतो.—इब्रीयांस १०:२४, २५.
समलैंगिकतेच्या वासनेने तुम्ही पीडित असाल, तर या सूचना मदतदायी ठरतील. वाईट भावना असल्या, तरीसुद्धा अधिक निराश होऊ नका. देवाला तुमच्या भावना समजतात व त्याची सेवा करण्यासाठी जे झटतात त्यांच्याबद्दल त्याला कळवळा वाटतो. (१ योहान ३:१९, २०) नवीन जगात, मानवजात, आपल्याला पीडित करणाऱ्या सर्व आजारांपासून बरे झाल्याचा अनुभव घेईल. (प्रकटीकरण २१:३, ४) त्यादरम्यान, देवावर विसंबून राहा आणि चुकीच्या वासनांविरुद्ध लढा द्या. (गलतीकर ६:९) वेळ आणि निश्चयी प्रयत्नांसह, कदाचित चुकीच्या वासना देखील नाहीशा होऊ शकतात. (g95 3/22)
[तळटीपा]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. याद्वारे प्रकाशित.
c तरुण लोक विचारत असलेले प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) (वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. द्वारे प्रकाशित) या पुस्तकाच्या २५ व २६ अध्यायांमध्ये एखाद्या युवकाला या सवयीवर मात करण्यात मदत करण्यासाठी काही व्यावहारिक सूचना आहेत.
[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]
येशूच्या उदाहरणाचा अभ्यास करण्याद्वारे पौरुषत्वाचा चांगला दृष्टिकोन विकसित करा