जागे राहा!
आजच्या कठीण काळात आनंदी राहण्यासाठी उपयोगी सल्ले
आजचा काळ खूप कठीण आहे. कधी काय होईल, आपल्यावर त्याचा कसा परिणाम होईल हे कोणालाच सांगता येत नाही. पण, आपला आनंद हा सहसा आपल्या परिस्थितीवर नाही, तर त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून बघतो यावर अवलंबून असतो. बायबलमध्येही सांगितलंय, की कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला, तरी “ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.” (नीतिवचनं १५:१५) मग, आपल्याला आनंदी कसं राहता येईल आणि आपला आनंद वाढवता कसा येईल? या बाबतीत बायबल तुम्हाला कशी मदत करू शकतं ते पाहा.
चिंतेचा सामना करा
बायबल म्हणतं: “मनातल्या चिंतेने माणूस खचून जातो, पण दिलासा देणाऱ्या शब्दांमुळे त्याला आनंद होतो.”—नीतिवचनं १२:२५.
बायबलमुळे तुम्हाला अनावश्यक चिंतांचा सामना करायला मदत मिळेल. ती कशी? याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी “चिंतेबद्दल बायबल काय म्हणतं?” हा लेख वाचा.
एकटेपणाशी लढा
बायबल म्हणतं: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”—नीतिवचनं १७:१७.
बायबलमध्ये यासाठी काही चांगले आणि व्यावहारीक सल्ले आहेत. यांमुळे तुम्ही एकटेपणावर मात करू शकाल आणि इतरांसोबतची मैत्री घट्ट करू शकाल. आणखी माहितीसाठी “एकटेपणावर उपाय—मैत्री—बायबलमुळे कशी मदत होऊ शकते?” हा लेख वाचा.
देवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिका
बायबल म्हणतं: “‘तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर. . . . तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’”a—मत्तय २२:३७-३९.
प्रार्थना केल्यामुळे देवावरचं आपलं प्रेम वाढू शकतं. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी “देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?” हा लेख वाचा.
शेजाऱ्यांवरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण बायबलमधला सुवर्ण नियम पाळू शकतो. हा सुवर्ण नियम काय आहे हे जाणून घेण्यासाठी “सुवर्ण नियम काय आहे?” हा इंग्रजीतला लेख वाचा.
आजच्या या कठीण काळात आनंदी राहायला बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं हे शिकून घ्यायला तुम्हाला आवडेल का? त्यासाठी आम्ही तुम्हाला बायबलवर मोफत चर्चा करायचं आमंत्रण देतो.
a यहोवा हे देवाचं नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.