NASA Photo
जागे राहा!
संपूर्ण जगावर राज्य करू शकेल असं एखादं स्थिर सरकार आहे का?—बायबल काय म्हणतं?
जगभरातली सरकारं आज गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अगदी स्थिर वाटणाऱ्या देशांमध्येसुद्धा घोटाळे, अटीतटीच्या निवडणुका, राजकीय फुटी आणि नागरी अशांतता यांमुळे सरकारं पार हादरून गेली आहेत.
पण बायबल सांगतं की एक स्थिर असं सरकार आहे, आणि त्याबद्दल कदाचित तुम्ही ऐकलंही असेल. कारण, येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेत या सरकारचा उल्लेख केला.
“म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.’”—मत्तय ६:९, १०.
या राज्याबद्दल बायबल काय म्हणतं?
देवाचं राज्य—एक स्थिर सरकार
हे राज्य स्वर्गातून राज्य करतं.
येशूने या सरकाराला “स्वर्गाचं राज्य” असं म्हटलं. (मत्तय ४:१७; ५:३, १०, १९, २०) म्हणूनच तो म्हणाला: “माझं राज्य या जगाचं नाही.”—योहान १८:३६.
देवाचं हे राज्य मानवी सरकारांची जागा घेईल.
बायबल म्हणतं: “ते राज्य . . . या सगळ्या [मानवी] राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल, आणि फक्त तेच कायम टिकेल.”—दानीएल २:४४.
या राज्याचा राजा येशू ख्रिस्त असेल आणि त्या राज्याचा कधीच नाश होणार नाही.
बायबल म्हणतं: “त्याचा राज्याधिकार सदासर्वकाळाचा आहे, आणि त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही.”—दानीएल ७:१३, १४.
हे राज्य पृथ्वीवर खरी शांती आणि सुरक्षितता आणेल.
बायबल म्हणतं: “प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली शांतीने राहिल. कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”—मीखा ४:४, गुड न्यूज ट्रान्सलेशन.
या राज्याबद्दल आणखी जाणून घ्या
पृथ्वीवर असताना येशूने आपला जास्तीत जास्त वेळ “देवाच्या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश” सांगण्यासाठी घालवला. (मत्तय ९:३५) त्याने असंही सांगितलं:
“सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्तय २४:१४.
आज या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश २४० पेक्षा जास्त देशांमध्ये घोषित केला जातोय. या सरकाराबद्दल आणि त्यापासून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत.
आणखी माहितीसाठी हा व्हिडिओसुद्धा पाहा देवाचं राज्य काय आहे?