देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तुमचा राजा कोण आहे?
यहोवाची इच्छा नसतानाही इस्राएली लोकांनी मानवी राजाची मागणी केली (१शमु ८:४, ५; इन्साइट-२ १६३ ¶१)
यहोवा दिसत नसल्यामुळे इस्राएली लोकांनी त्याला राजा म्हणून नाकारलं (१शमु ८:७, ८; टेहळणी बुरूज११ ७/१ १९ ¶१)
त्यांची ही मागणी पूर्ण केल्यामुळे काय परिणाम होतील हे यहोवाने त्यांना सांगितलं (१शमु ८:९, १८; टेहळणी बुरूज१० १/१५ ३० ¶९)
यहोवा संपूर्ण विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे. तो आपलं शासन प्रेमळपणे चालवतो आणि आपल्या अधिकाराखाली असलेल्यांची कदर करतो. त्याच्या अधीन राहिल्यामुळे आपल्याला कायमचे आशीर्वाद मिळतील.
स्वतःला विचारा, ‘मी यहोवाच्या शासनाच्या अधीन आहे हे मी माझ्या रोजच्या जीवनातून कसं दाखवत आहे?’