वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 डिसेंबर पृ. ८
  • नियतकालिकं देत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिकं देत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
  • मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 डिसेंबर पृ. ८
एक बहीण ‘सावध राहा!’ नियतकालिकामधल्या एका विषयाबद्दल एका स्त्रीसोबत बोलत आहे

ख्रिस्ती जीवन

नियतकालिकं देत राहा

२०१८ पासून प्रचारात दिल्या जाणाऱ्‍या नियतकालिकांमध्ये एका अंकात एकाच विषयाबद्दल सांगितलं जातं. ही सर्व नियतकालिकं शिकवण्याच्या साधनांचा एक भाग आहेत. त्यामुळे आपण ती प्रचारकार्यात देऊ शकतो. बाजारात जाताना किंवा प्रवास करताना आपण आपल्याजवळ काही नियतकालिकं ठेवू शकतो. ही नियतकालिकं बायबल अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आलेली नाहीत. पण यांमुळे एखाद्या व्यक्‍तीला देवाबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होऊ शकते.

एखाद्या व्यक्‍तीशी बोलणं सुरू केल्यानंतर तिला एक वचन दाखवा. त्यानंतर, तिला आवडेल असा एखादा विषय असलेल्या नियतकालिकाबद्‌ल तिला सांगा. समजा, त्या व्यक्‍तीवर कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा ती दुःखात किंवा तणावात असेल. तर अशा वेळी तुम्ही तिला म्हणू शकता: “अलिकडेच मी या विषयावर एक चांगला लेख वाचलाय. तो तुम्हाला दाखवला तर चालेल का?” त्या व्यक्‍तीने आवड दाखवली तर तुम्ही तिला पहिल्या भेटीतच नियतकालिकाची छापील प्रत देऊ शकता किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत पाठवू शकता. आपला उद्देश फक्‍त नियतकालिकं देणं नाही तर अशा लोकांना शोधणं आहे, ज्यांना शिकायची आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करायची इच्छा आहे.—प्रेका १३:४८.

२०१८

कोलाज: २०१८ मधले ‘टेहळणी बुरूज’ आणि ‘सावध राहा!’ यांचे विषय. १.‘कसं असेल आपलं भविष्य?’ २. ‘देवाला तुमची काळजी आहे का?’ ३. ‘आनंदी कुटुंबाचं गुपित काय?’ ४.‘शोक करणाऱ्‍यांसाठी मदत’

२०१९

कोलाज: २०१९ मधले ‘टेहळणी बुरूज’ आणि ‘सावध राहा!’ यांचे विषय. १.‘आपण देवाला जाणून घेऊ शकतो का?’ २. ‘जगण्यात काही अर्थ आहे का?’ ३. ‘यालाच आयुष्य म्हणतात का?’ ४. ‘आपल्याला कधी सुरक्षित वाटेल का?’ ५.‘मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी’ ६.‘बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?’

२०२०

कोलाज: २०२० मधले ‘टेहळणी बुरूज’ आणि ‘सावध राहा!’ यांचे विषय. १.‘अचूक माहितीचा शोध’ २. ‘देवाचं राज्य नेमकं काय आहे?’ ३.‘कधीही न संपणारे आशीर्वाद एका प्रेमळ देवाकडून’ ४.‘तणाव कसा कमी कराल?’ ५.‘दुःखाबद्दल ५ प्रश्‍नांची उत्तरं’ ६. ‘भेदभावाच्या आजारावर काही इलाज आहे का?

तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना कोणत्या विषयांवर बोलायला आवडतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा