देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १४-१५
यहोवाची पवित्र उपासना करण्यासाठी शुद्ध राहणं गरजेचं आहे
यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत ठेवण्यासाठी आपलं मन आणि शरीर शुद्ध असणं गरजेचं आहे. याचा अर्थ हा होतो की आपण ज्या जगात राहतो ते जरी अशुद्ध असलं तरी आपण शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या शुद्ध असलं पाहिजे. आणि यहोवाने ठरवलेल्या स्तरांचं विश्वासूपणे पालन केलं पाहिजे. आपल्या स्वर्गीय पित्याच्या नजरेत अशुद्ध असलेल्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
जगाचे स्तर नाकारल्यामुळे मला कोणता फायदा होऊ शकतो?