देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३१-३२
मूर्तिपूजेपासून दूर पळा
मूर्तिपूजेबद्दल इस्राएली लोक जो विचार करायचे त्यावर इजिप्तच्या लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला असावा. आज मूर्तिपूजा बऱ्याच वेगवेगळया प्रकारे केली जाते आणि त्यांना ओळखणं कधीकधी कठीण जाऊ शकतं. आपण थेट मूर्तींची पूजा तर करणार नाही. पण जेव्हा आपण आपल्या स्वार्थी इच्छांना यहोवाची पूर्ण मनाने सेवा करण्याच्या आड येऊ देतो तेव्हा आपण एक प्रकारे मूर्तिपूजा करत असतो.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या यहोवाच्या उपासनेपासून माझं लक्ष विचलित करू शकतात आणि त्या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव होऊ नये म्हणून मी काय करू शकतो?