वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lff धडा १४ मुद्दे १-७
  • देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?
  • कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आणखी जाणून घेऊ या
  • थोडक्यात
  • हेसुद्धा पाहा
  • यहोवाची उपासना केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • देव कोणाच्या भक्‍तीचा स्वीकार करतो?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
lff धडा १४ मुद्दे १-७
धडा १४. मंडळीच्या सभेत यहोवाचे साक्षीदार आणि नवीन लोक गीत गात आहेत.

धडा १४

देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

मागच्या धड्यात आपण शिकलो होतो, की देवाला सगळेच धर्म मान्य नाहीत. तर मग देवाला आवडेल अशा रितीने त्याची उपासना करणं अशक्य आहे, असा याचा अर्थ होतो का? नाही, याचा असा अर्थ होत नाही. कारण देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते हे बायबल आपल्याला सांगतं. (याकोब १:२७) ते काय सांगतं हे आता आपण पाहू या.

१. आपली उपासना कशावर आधारित असली पाहिजे?

एकदा येशू प्रार्थनेत देवाला म्हणाला, “तुझं वचन सत्य आहे.” म्हणून आपली उपासना बायबलवर आधारित असली पाहिजे. (योहान १७:१७) देवाचं वचन बायबल हे त्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे आणि त्यात सत्य सांगितलं आहे. काही धर्म या सत्याकडे दुर्लक्ष करून मानवांचे विचार आणि परंपरा लोकांना शिकवतात. पण जे अशा प्रकारे देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करतात त्यांची उपासना त्याला आवडत नाही. (मार्क ७:९ वाचा.) याउलट, आपण जेव्हा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करतो आणि त्याच्या सल्ल्यांप्रमाणे वागतो, तेव्हा त्याला आनंद होतो.

२. आपण यहोवाची उपासना कशी केली पाहिजे?

यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. म्हणून आपण फक्‍त त्याचीच भक्‍ती केली पाहिजे. (प्रकटीकरण ४:११) त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि कोणत्याही मूर्तीचा किंवा प्रतिमेचा वापर न करता, फक्‍त आणि फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे.—यशया ४२:८ वाचा.

आपली भक्‍ती “पवित्र आणि [यहोवाला] स्वीकारयोग्य” असली पाहिजे. (रोमकर १२:१) याचा अर्थ, नैतिक गोष्टींच्या बाबतीत आपण त्याच्या नियमांप्रमाणे वागलं पाहिजे. जसं की, विवाहाच्या बाबतीत यहोवाने घालून दिलेले नियम आपण पाळले पाहिजेत. तसंच, आपल्या शरीराला नुकसान करतील अशा गोष्टींपासून, जसं की तंबाखू, पान-सुपारी आणि ड्रग्स यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. तसंच, आपण दारूचं व्यसन नाही केलं पाहिजे.a देवाच्या या आज्ञांचं पालन करण्याद्वारे आपण दाखवतो की आपलं त्याच्यावर प्रेम आहे.

३. आपण इतरांसोबत मिळून यहोवाची उपासना का केली पाहिजे?

दर आठवड्यात होणाऱ्‍या सभांमध्ये आपल्याला ‘मंडळीत यहोवाची स्तुती’ करण्याची संधी मिळते. (स्तोत्र १११:१, २) जसं की, आपण तिथे गीत गाऊन यहोवाची स्तुती करतो. (स्तोत्र १०४:३३ वाचा.) यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला सभांना उपस्थित राहायला सांगतो. त्याला माहीत आहे की या सभा आपल्याला कायम जीवनाचा आनंद घ्यायला मदत करतील. जेव्हा आपण एकत्र येऊन भाऊबहिणींना प्रोत्साहन देतो, तेव्हा आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं.

आणखी जाणून घेऊ या

यहोवाला त्याच्या उपासनेत मूर्तींचा वापर केलेला का आवडत नाही हे जाणून घेऊ या. तसंच, देवाची स्तुती करण्याचे कोणते प्रमुख मार्ग आहेत तेही पाहू या.

४. आपण उपासनेत मूर्तींचा वापर करावा अशी यहोवाची इच्छा नाही

यहोवाला हे आवडत नाही हे आपल्याला कशावरून कळतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

व्हिडिओ: उपासनेत मूर्तींचा वापर करण्याबद्दल देवाला काय वाटतं?  (३:२६)

चित्रं: १. सीनाय पर्वताच्या पायथ्याशी इस्राएली लोक सोन्याच्या वासराच्या मूर्तीची उपासना करत आहेत. २. एक माणूस मरीयेच्या मूर्तीसमोर हातात रोझरीची माळ घेऊन प्रार्थना करत आहे.
  • जुन्या काळात जेव्हा देवाच्या लोकांनी एका मूर्तीचा वापर करून त्याची उपासना करायचा प्रयत्न केला, तेव्हा काय झालं?

काही जण म्हणतात की मूर्ती किंवा प्रतिमा समोर असली, तर देवाच्या आणखी जवळ असल्यासारखं वाटतं. पण खरंतर ते देवापासून दूर जात असतात. निर्गम २०:४-६ आणि स्तोत्र १०६:३५, ३६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • लोक उपासनेत सहसा कोणत्या चिन्हांचा किंवा मूर्तींचा वापर करतात?

  • मूर्तींचा वापर करण्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

  • मूर्तींचा वापर करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

५. फक्‍त यहोवाचीच उपासना केल्यामुळे आपण खोट्या शिकवणींपासून मुक्‍त होऊ

यहोवाला आवडेल अशा पद्धतीने उपासना केल्यामुळे आपण खोट्या शिकवणींपासून कसं मुक्‍त होऊ शकतो? व्हिडिओ पाहा.

व्हिडिओ: सत्यामुळे मुक्‍त झालो!  (५:१६)

स्तोत्र ९१:१४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • या वचनाप्रमाणे, जेव्हा आपण फक्‍त यहोवाची उपासना करून त्याच्यावर प्रेम आहे हे दाखवून देऊ, तेव्हा तो आपल्यासाठी काय करेल?

६. आपण मंडळीच्या सभांमध्ये देवाची भक्‍ती करतो

मंडळीच्या सभांमध्ये गीतं गाऊन आणि उत्तरं देऊन आपण यहोवाची स्तुती करतो आणि एकमेकांना उत्तेजन देतो. स्तोत्र २२:२२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुम्हाला सभांमधली उत्तरं ऐकायला आवडतात का?

  • तुम्हालाही एखादं उत्तर तयार करून सभेत द्यायला आवडेल का?

चित्रं: बायबल अभ्यास करणारी एक स्त्री देवाच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना करायला शिकत आहे. १. ती मंडळीच्या सभेत गीत गाऊन देवाची स्तुती करत आहे. २. ती सभेत उत्तर देत आहे. ३. ती एका स्त्रीला आणि तिच्या मुलीला बायबलवर आधारित व्हिडिओ दाखवत आहे.

७. आपण शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगतो तेव्हा यहोवाला आनंद होतो

बायबलमधून शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या आपल्याकडे बऱ्‍याच संधी असतात. स्तोत्रं ९:१ आणि ३४:१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • बायबलमधून शिकलेली कोणती गोष्ट तुम्हाला दुसऱ्‍यांना सांगायला आवडेल?

काही जण म्हणतात: “भक्‍ती कशीही केली तरी चालते, फक्‍त श्रद्धा असली पाहिजे.”

  • तुम्हाला काय वाटतं याबद्दल?

थोडक्यात

आपण जेव्हा फक्‍त आपल्या निर्माणकर्त्याची उपासना करतो, सभांमध्ये त्याची स्तुती करतो आणि शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगतो तेव्हा त्याला आनंद होतो.

उजळणी

  • देवाला कशा प्रकारची उपासना आवडते हे आपल्याला कसं समजेल?

  • आपण फक्‍त यहोवाचीच उपासना का केली पाहिजे?

  • ज्यांना देवाला आनंदित करायची इच्छा आहे अशांसोबत मिळून आपण त्याची उपासना का केली पाहिजे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

एका स्त्रीने मूर्तींची उपासना करायचं का सोडून दिलं, हे “आता मी मूर्तींची सेवा करत नाही” असं शीर्षक असलेल्या अनुभवातून जाणून घ्या.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)

मंडळीच्या सभांमध्ये तुम्हाला उत्तरं द्यायला कशामुळे मदत होईल हे जाणून घ्या.

“मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा” (टेहळणी बुरूज,  जानेवारी, २०१९)

सोपं नसतानाही मंडळीच्या सभांना गेल्यामुळे एका तरुणाला कसा फायदा झाला हे पाहा.

यहोवाने माझी काळजी घेतली  (३:०७)

बरेच लोक क्रॉसला ख्रिस्ती धर्माचं चिन्ह मानतात. पण आपण उपासनेत त्याचा वापर केला पाहिजे का?

“तुम्ही उपासनेत क्रॉसचा उपयोग का करत नाही?” (वेबसाईटवरचा लेख)

a या विषयांवर पुढच्या काही धड्यांत चर्चा करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा