वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ४/१ पृ. २२-२७
  • मूर्तीपूजेपासून का दूर राहावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मूर्तीपूजेपासून का दूर राहावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मूर्तीपूजा काय आहे
  • मूर्तीपूजेविषयी यहोवाचा दृष्टिकोन
  • परिक्षा होतेवेळी निष्ठावान असणे
  • मूर्त्या न्यायालयात अपयशी होतात
  • दुरात्म्यांसाठी अर्पणे
  • दूर राहण्याची का गरज आहे?
  • तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर राहाल का?
  • हरतऱ्‍हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला दूर राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मूर्तिपूजेपासून दूर पळा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ४/१ पृ. २२-२७

मूर्तीपूजेपासून का दूर राहावे?

“मुलांनो, तुम्ही स्वतःला मूर्तीपासून दूर राखा.”—१ योहान ५:२१.

१. यहोवाची भक्‍ती मूर्तीपूजेविना का असली पाहिजे?

यहोवा धातु, लाकूड किंवा दगडाची मूर्ती नाही. त्याला पार्थिव मंदिरात कदापि ठेवता येणार नाही. तो सर्वशक्‍तीमान आत्मा असल्यामुळे, मानवांना अदृश्‍य आहे, यामुळे त्याची मूर्ती बनविणे अशक्यच आहे. यास्तव यहोवाची शुद्ध भक्‍ती पूर्णपणे मूर्तीपूजेविना केली पाहिजे.—निर्गम ३३:२०; प्रे. कृत्ये १७:२४; २ करिंथकर ३:१७.

२. कोणते प्रश्‍न आम्ही विचारात घेतले पाहिजेत?

२ तुम्ही यहोवाचे उपासक असल्यास, असे विचारु शकता, ‘मूर्तीपूजा म्हणजे काय? गतकाळातील यहोवाचे सेवक तिला कसे टाळू शकले? आणि मूर्तीपूजेपासून का दूर राहिले पाहिजे?’

मूर्तीपूजा काय आहे

३, ४. मूर्तीपूजेची व्याख्या कशी केली जाऊ शकते?

३ साधारणपणे, मूर्तीपूजेत धार्मिकविधी किंवा संस्काराचा समावेश असतो. मूर्तीपूजा म्हणजे मूर्तीविषयी आदर, प्रेम, भक्‍ती किंवा मूर्तीची आराधना करणे होय. आणि मूर्ती काय आहे? ती एक प्रतिमा आहे, कशातरी प्रतिक, ते एक भक्‍तिच्या साधनाचे चिन्ह आहे. सामान्यपणे, मूर्तीपूजा (मनुष्य, प्राणी, किंवा संस्था) यांना सचेतन अस्तित्व आहे असा विश्‍वास वाटणाऱ्‍या वास्तविक किंवा उच्च शक्‍तीकडे मार्गदर्शित केली जाते. परंतु मूर्तीपूजा निर्जीव वस्तुंचीही (एखादी शक्‍ती, किंवा निसर्गातील निर्जीव वस्तु) केली जाऊ शकते.

४ शास्त्रवचनात, मूर्तीसंबंधी वापरलेला इब्री शब्द अनेकदा व्यर्थतेचा उल्लेख करतो, किंवा त्या तिरस्काराच्या संज्ञा आहेत. यामधील काही शब्द “कोरीव अथवा कोरुन तयार केलेल्या”; “ओतीव पुतळ्या”च्या; प्रतिमा किंवा मूर्त्या; “भीतिजनक मूर्त्या”; व्यर्थ मूर्त्या आणि काही “मातीच्या मूर्ती” असा अनुवाद देतात. “मूर्ती” साठी अनुवादित केलेला ग्रीक शब्द एʹडो․लोन हा आहे.

५. सर्वच प्रतिमा मूर्त्या नाहीत असे का म्हटले जाऊ शकते?

५ सर्वच प्रतिमा मूर्त्या नाहीत. देवाने स्वतः इस्राएलांना दोन सोन्याचे करूब कराराच्या कोशासाठी बनविण्यास सांगितले होते आणि निवासमंडपासाठी दहा पडद्यावर त्या आत्मिक प्राण्यांचे चित्र सुताने नक्षीकाम करुन तयार करायचे होते, व त्याप्रमाणे पवित्र व अतिपवित्र स्थानाला वेगळा करणारा पडदा यावरही हे करायचे होते. (निर्गम २५:१, १८; २६:१, ३१-३३) केवळ कर्तव्य पार पाडणाऱ्‍या याजकांनी ह्‍या चित्रांना पाहिले जे प्रथमतः स्वर्गीय करुबांना चित्रित करीत होते. (पडताळा इब्रीयांस ९:२४, २५.) निवासमंडपातील करूबांची पूजा करायची नव्हती हे अगदी स्पष्ट आहे, कारण धार्मिक देवदूतांनी स्वतः ती भक्‍ती स्वीकारली नव्हती.—कलस्सैकर २:१८; प्रकटीकरण १९:१०; २२:८, ९.

मूर्तीपूजेविषयी यहोवाचा दृष्टिकोन

६. मूर्तीपूजेविषयी यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे?

६ तो सर्वप्रकारच्या मूर्तीपूजक पद्धतींच्या विरोधात असल्यामुळे यहोवाच्या सेवकांनी मूर्तीपूजेपासून दूर राहावे. देवाने इस्राएलांना आज्ञापिले होते की त्यांनी पूजेसाठी किंवा भक्‍तीसाठी मूर्त्या बनवू नयेत. दहा आज्ञेत हे शब्द सापडतातः “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको, कारण मी परमेश्‍वर [यहोवा न्यू.व.] तुझा देव ईर्ष्यावान देव आहे जे मजशी विरोध करतात त्यांच्या मुलांस तिसऱ्‍या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो आणि जे मजवर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो जणांवर मी दया करतो.”—निर्गम २०:४-६.

७. सर्वप्रकारच्या मूर्तीपूजेचा यहोवा का विरोध करतो?

७ यहोवा सर्वप्रकारच्या मूर्तीपूजेचा का विरोध करतो? प्रामुख्याने, दहा आज्ञेतील दुसरीत दाखविल्याप्रमाणे तो अनन्य भक्‍ती अपेक्षितो. याचप्रमाणे, त्याचा संदेष्टा यशयाद्वारे त्याने म्हटलेः “मी परमेश्‍वर [यहोवा न्यू.व.] आहे. हे माझे नाव आहे. मी आपले गौरव, दुसऱ्‍यास देऊ देणार नाही मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही.” (यशया ४२:८) एके काळी मूर्तीपूजेने इस्राएलांना येथवर जाळ्यात पाडले की “त्यांनी आपले पुत्र व आपल्या कन्या यांचे बळी भूतांना दिले.” (स्तोत्रसंहिता १०६:३६, ३७) मूर्तीपूजक, यहोवा सत्य देव आहे याचाच केवळ नकार करीत नाही, तर ते प्रमुख विरोधी सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा उद्देश साध्य करतात.

परिक्षा होतेवेळी निष्ठावान असणे

८. शद्रक, मेशख व अबेद्‌नगो या तीन इब्र्यांनी कोणत्या परिक्षेला तोंड दिले?

८ यहोवाबरोबर असलेला निष्ठावानपणा देखील मूर्तीपूजेपासून आम्हाला दूर राखतो. दानीएलाच्या ३ अध्यायात लिखित केलेल्या घटनेवरून हे स्पष्ट होते. बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने उभ्या केलेल्या भव्य सुवर्ण मूर्तीचे अनावरण करण्यासाठी त्याच्या राज्यातील अधिकाऱ्‍यांना गोळा केले. त्याच्या आदेशामध्ये शद्रक, मेशख अबेद्‌नगो—बाबेलातील प्रांतावर नेमलेले तीन अधिकारी या इब्र्यांचाही समावेश होतो. विशिष्ट वाद्यांचा ध्वनी कानात पडताच उपस्थित असलेल्या सर्वांनी मूर्तीला साष्टांग दंडवत घालायचे होते. तीन इब्र्यांनी बाबेलच्या साम्राज्याला चित्रित करणाऱ्‍या मूर्तीपुढे दंडवत घालण्याचा प्रयत्न बाबेलचा खरा देव, सैतान करीत होता. तुम्ही तेथे आहात अशी कल्पना करा.

९, १०. (अ) तीन इब्र्यांनी कोणती भूमिका घेतली, आणि त्यांना कसे बक्षीस मिळाले? (ब) तीन इब्र्यांच्या कृत्यावरून यहोवाच्या साक्षीदारांना कोणते उत्तेजन मिळू शकते?

९ पाहा! तीन इब्री उभे आहेत. मूर्त्यांना बनविणे व त्यांची उपासना करणे किंवा कोरीव मूर्ती बनविण्याविरूद्ध देवाचा नियम ते आठवतात. नबुखद्‌नेस्सर त्यांच्या पुढे निर्वाणीचा खलिता ठेवतो—दंडवत करा किंवा मरा! परंतु यहोवाला निष्ठावंत असल्यामुळे ते म्हणतातः “याबाबतीत ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवील, ते कसेही असो पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही, आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही.”—दानीएल ३:१६-१८.

१० देवाच्या या निष्ठावंत उपासकांना अतितप्त अशा अग्नीच्या भट्टीत टाकले जाते. चार इसमाना अग्नीच्या भट्टीत फिरत असल्याचे पाहून नबुखद्‌नेस्सर चकीत होतो, तो त्या तिघा इसमाना भट्टीच्या बाहेर येण्यास बोलावतो, आणि ते कसलीही इजा न होता बाहेर येतात. तेव्हा राजा म्हणतोः “शद्रक, मेशख व अबेद्‌नगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला राजाचा शब्द मोडला आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावयाची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले, त्यांस त्यांच्या देवाने दिव्यदूत [अग्नीच्या भट्टीतील चौथा इसम] पाठवून सोडविले आहे. . .अशाप्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.” (दानीएल ३:२८, २९) सात्विकता टिकवून त्या तीन इब्र्यांनी आधुनिक दिवसातील यहोवाच्या साक्षीदारांना देवाला निष्ठावान राहण्याचे, जगात तटस्थता राखण्याचे आणि मूर्तीपूजा टाळण्याचे उत्तेजन दिले आहे.—योहान १७:१६.

मूर्त्या न्यायालयात अपयशी होतात

११, १२. (अ) मूर्ती देव आणि यहोवा याबद्दल कोणता अहवाल यशयाने दिला? (ब) यहोवाने आव्हान केले तेव्हा राष्ट्रातील देवांवर काय परिणाम झाला?

११ मूर्तीपूजेविरूद्ध दूर राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे मूर्तीची पूजा करणे व्यर्थ आहे. तोंड, डोळे आणि कान यामुळे—काही मानव-निर्मीत मूर्त्या सजीव जरी दिसत असल्या—त्यांना बोलता येत नाही, दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, ते त्यांच्या भक्‍तांसाठी काही करू शकत नाही. (स्तोत्रसंहिता १३५:१५-१८) हे इ. स. पूर्व आठव्या शतकात दिसून आले, यशया ४३:८-२८ मध्ये देवाच्या संदेष्टयाने, यहोवा व मूर्ती-दैवतांमध्ये न्यायालयीन खटल्यातील परिणाम दाखवला. यात देवाचे लोक इस्राएली एका बाजुला व जगातील रा दुसऱ्‍या बाजुला होते. यहोवाने जगाच्या खोट्या दैवतांना “पूर्वी घडलेल्या गोष्टी” सांगण्याचे, म्हणजे अचूक भविष्यवाणी करण्याचे आव्हान केले. एकही ते करू शकला नाही. त्याच्या लोकाकडे वळून यहोवाने म्हटलेः “तुम्ही माझे साक्षी आहां. . . व मीच देव आहे.” राष्ट्रे, त्यांच्या देवांचे अस्तित्व यहोवाच्या अगोदरचे आहेत किंवा ते भविष्यावाणी करू शकतील हे शाबीत करू शकले नाहीत. परंतु यहोवाने बाबेलच्या नाशाबद्दल व त्याच्या बंदिवान लोकांना मुक्‍त करण्याचे भाकित केले.

१२ शिवाय, यशया ४४:१-८ मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाचे मुक्‍त केलेले सेवक म्हणू शकतात, की ते “परमेश्‍वराचे [यहोवा न्यू.व.] आहे.” तो स्वतः म्हणतोः “मी आदि आहे, मी अंत आहे मजवेगळा देव नाहीच.” खोट्या दैवतांकडून कोणतेही प्रत्युत्तर नाही. “तुम्ही माझे साक्षी आहां,” यहोवा आणखी त्याच्या लोकांविषयी असे म्हणून भर टाकतो “मजवेगळा कोणी देव आहे काय? मजवेगळा कोणी दुर्ग नाही.”

१३. मूर्तीपूजकाबद्दल मूर्तीपूजा काय प्रकट करते?

१३ आम्ही मूर्तीपूजेपासून दूर राहतो, कारण ती केल्याने बुद्धीची उणीव दिसून येते. मूर्तीपूजक, लाकडातील काही भाग निवडतो व भक्‍तीसाठी देव बनवितो, त्यातील काही लाकूड घेऊन तो त्यावर भाकरी भाजतो. (यशया ४४:९-१७) केवढा हा मूर्खपणा! खोट्या दैवतांचा बनविणारा व भक्‍ती करणाऱ्‍याला लज्जा देखील अनुभवावी लागेल कारण त्यांचे देवत्व शाबीत करण्याची खात्री पटविणारी साक्ष देण्यास ते असमर्थ आहेत. परंतु यहोवाचे देवत्व अप्रश्‍नार्थक आहे, बाबेलातून त्याच्या लोकांना त्याने केवळ मुक्‍त करण्याचेच भाकित केले नाही तर त्याने ते घडवून आणले. यरूशलेम पुनःस्थापित झाले, यहुदाची नगरे पुनः बांधली गेली आणि बाबेलचा “खोल पाण्याचा डोह”—फरात नदी—सुरक्षिततेचा उगम राहिली नाही. (यशया ४४:१८-२७) पारसाचा कोरेश बाबेलवर विजय मिळवील हे त्याने भाकित केल्याप्रमाणे झाले.—यशया ४४:२८–४५:६.

१४. सर्वोच्च न्यायालयात कायमचे काय शाबित करण्यात येईल?

१४ देवत्वासंबंधीच्या खटल्यात मूर्तीपूजक-देव पराभूत झाले. बाबेलवर जे गुदरले, ते याची खात्री देते की त्याजशी जुळणारी आधुनिक समयातील मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य यावरही असेच गुदरेल. ती व तिचे सर्व देव, धार्मिक वस्तु आणि मूर्तीपूजेचे साहित्य लवकरच सर्वकाळासाठी गेलेले असणार. (प्रकटीकरण १७:१२-१८:८) सार्वत्रिक सर्वोच्च न्यायालयात, यहोवा देव एकटाच जिवंत व सत्य आहे आणि तो त्याचे भविष्यवादित वचन पूर्ण करतो असे कायमचे शाबित केले जाईल.

दुरात्म्यांसाठी अर्पणे

१५. यहोवाचे लोक व मूर्तीपूजा याबद्दल पवित्र आत्म्याने व पहिल्या शतकातील नियमन मंडळाने काय सुचविले?

१५ यहोवाच्या लोकांना देवाच्या आत्म्याकरवी व संस्थेकडून मार्गदर्शन मिळत असल्यामुळे ते मूर्तीपूजेपासून दूर राहतात. यहोवाच्या सेवकांच्या पहिल्या शतकातील नियमन मंडळाने सहख्रिश्‍चनांना म्हटलेः “पुढील अगत्याच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त भार घालू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य दिसले. म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गुदमरुन मेलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज करावी. ह्‍यापासून आपणांस सांभाळाल तर तुमचे बरे होईल कल्याण असो!”—प्रे. कृत्ये १५:२८, २९.

१६. मूर्तीला अर्पिलेल्या पदार्थांविषयी पौलाने काय म्हटले ते तुमच्या स्वतःच्या शब्दात तुम्ही कसे व्यक्‍त करू शकता?

१६ मूर्तीपूजेपासून दूर राहण्याचे आणखी कारण म्हणजे पिशाच्चवाद टाळणे होय. प्रभू भोजनासंबंधी प्रेषित पौलाने करिंथमधील ख्रिश्‍चनांना हे म्हटलेः “तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. . .जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो, तो ख्रिस्ताच्या रक्‍ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर, एक शरीर असे आहो आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहो. जे जातीने इस्राएल त्याकडे पाहाः यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काही तरी आहे अथवा मूर्ती काही तरी आहे काय? नाही; तरी विदेशी लोक जो यज्ञ करतात तो देवाला नव्हे तर भूतांना करतात आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचा प्याला पिववत नाही; प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्या मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवितो काय? आपण त्यापेक्षा बलवान आहो काय?”—१ करिंथकर १०:१४-२२.

१७. पहिल्या शतकात, कोणत्या परिस्थितीत एखादा ख्रिस्ती मूर्तीला अर्पिलेले मांस खाऊ शकत होता, आणि का?

१७ प्राण्याचा काही भाग मूर्तीला अर्पिण्यात येई, काही भाग याजकाला जात असे, आणि भक्‍ताला मेजवानीसाठी त्याचा काही भाग मिळत असे. तथापि यातील काही मांस खाटिक-बाजारात विकले जाऊ शकते. एखाद्या ख्रिश्‍चनाने मूर्तीपूजक मंदिरात जाऊन मांस खाणे, तो जरी त्या विधितील मांस खात नसेल तरी तसे करणे अनुचित होते, कारण यामुळे इतर जन अडखळू शकत होते किंवा खोट्या भक्‍तीकडे त्यांना निरविले जाऊ शकत होते. (१ करिंथकर ८:१-१३; प्रकटीकरण २:१२, १४, १८, २०) मूर्तीला प्राणी अर्पिल्याने मांसात बदल होणार नव्हता, यामुळे खिश्‍चन, बाजारातून काही मांस विकत घेऊ शकत होता. एवढेच नव्हे तर एखाद्याच्या घरात वाढलेले मांस कोठून आणले हेही त्याला विचारण्याची जरूरी नव्हती. परंतु एखाद्याने म्हटले की त्याने “हा नैवेद्य आहे,” तर तो इतरांना अडखळण होऊ नये म्हणून खात नसे.—१ करिंथकर १०:२५-२९.

१८. मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खाण्यामुळे, ते भूतांचे सहभागी कसे होऊ शकत होते?

१८ अर्पिलेल्या विधीनंतर असे अनेकदा समजले जाई, की मांसात देव आहे व भक्‍तजनांच्या मेजवानीत खाणाऱ्‍यांच्या शरीरात तो प्रवेश करतो. एकत्र राहणारे लोक जसे एकमेकासोबत करारात बद्ध होतात त्याचप्रमाणे, अर्पिलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे वेदीची भागी करीत व मूर्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या पिशाच्च दैवताबरोबर सहभागिता घेई. अशा मूर्तीपूजेद्वारे, एकाच खऱ्‍या देवाची भक्‍ती करण्यापासून दुरात्म्यांनी लोकांना दूर केले. (यिर्मया १०:१-१५) यहोवाच्या लोकांनी मूर्त्यांना अर्पिलेल्या पदार्थांपासून दूर राहावयाचे होते यात आश्‍चर्याचे काही नाही! देवाला निष्ठावंतपणा, त्याचा पवित्र आत्मा आणि संस्थेच्या मार्गदर्शनाचा स्वीकार आणि पिशाच्चवादात भाग घेण्याचे टाळण्याचा निश्‍चय देखील आज मूर्तीपूजेपासून दूर राहण्यासाठी सामर्थ्याची प्रेरक गोष्ट ठरेल.

दूर राहण्याची का गरज आहे?

१९. प्राचीन इफिसमध्ये कोणत्या प्रकारची मूर्तीपूजा अस्तित्वात होती?

१९ मूर्तीपूजेचे अनेक प्रकार असल्यामुळे ख्रिश्‍चनांनी त्यापासून दूर राहण्यात परिश्रमी असले पाहिजे, एक मूर्तीपूजेचे कृत्य त्यांच्या विश्‍वासाची हातमिळवणी करू शकते. प्रेषित योहानाने त्याच्या समविश्‍वासूंना म्हटलेः “स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१) हा सल्ला आवश्‍यक होता कारण त्यांच्या सभोवती अनेक प्रकारची मूर्तीपूजा होत होती. योहानाने इफिसमधून लिहिले, व हे शहर जादुटोण्याच्या कामात आणि खोट्या दैवतांविषयीच्या दंतकथात बुडलेले होते. इफिसमध्ये जगातील सात आश्‍चर्यापैकी एक आश्‍चर्य होते—आर्तिमीचे मंदिर, गुन्हेगारासाठी असलेले आश्रयस्थान आणि अनैतिक गोष्टींचे केंद्रस्थान होते. इफिसमधील तत्वज्ञानी हेराक्लीटसने मंदिराच्या वेदीतील अत्यंत घाणेरड्या कामाची तुलना अंधाऱ्‍या मार्गाबरोबर केली, आणि मंदिरातील नैतिकता पशूंपेक्षाही बेकार आहे असे त्याने समजले. तद्वत, इफिसमधील ख्रिश्‍चनांना पिशाच्चवाद, अनैतिकता आणि मूर्तीपूजेविरूद्ध दृढ भूमिका घ्यावयाची होती.

२०. अगदी थोडीशी देखील मूर्तीपूजा टाळणे का आवश्‍यक आहे?

२० ख्रिश्‍चनांनी अगदी थोडीशी देखील मूर्तीपूजा टाळण्याचा दृढ निश्‍चय केला पाहिजे कारण दियाबलाच्या उपासनेसाठी केलेल्या एका कृत्याने, मनुष्य देवाला परिक्षेच्या वेळी विश्‍वासू राहणार नाही या सैतानाच्या आव्हानास पाठिंबा दिला जाऊ शकतो. (ईयोब १:८-१२) येशूला “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” दाखविताना, सैतानाने म्हटलेः “तू पाया पडून मला नमन [“उपासनेचे एक कृत्य”, न्यू.व.] करशील तर मी हे सर्व तुला देईन.” येशूच्या नकाराने यहोवाच्या सार्वभौमत्वास उंचावले व दियाबलाला खोटे शाबीत केले.—मत्तय ४:८-११; नीतीसूत्रे २७:११.

२१. रोमी सम्राटाच्या संबंधाने, विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी काय करण्याचे नाकारले?

२१ येशूच्या आधीच्या अनुयायांनी देखील वादविषयाच्या सैतानाच्या बाजूला पाठिंबा देण्यासाठी उपासनेचे एक कृत्य केले नाही. त्यांना जरी सरकारातील “वरीष्ठ अधिकाऱ्‍यां”साठी योग्य आदर होता, असे असूनही ते रोमीसाम्राज्याच्या महिमेसाठी जीवनाला मुकावे लागले असते तरी धूप जाळीत नव्हते. (रोमकर १३:१-७) या संदर्भात डॅनिएल पी. मॅनिक्स यांनी लिहिलेः “फारच तुरळक ख्रिस्ती असे समजत होते, आखाड्यात जवळच असलेल्या वेदीवर अग्नी तेवत ठेवला जात असे, कैद्याला त्या अग्नीवर चिमुटभर धूप पसरून टाकावा लागत असे व यामुळे बलिदानाचा दाखला देऊन त्याला मुक्‍त करीत. सम्राटाची उपासना तो करणार नाही हे त्याला काळजीपूर्वक सांगितले जाई; तर रोमी राज्याचा प्रमुख या नात्याने एक ईश्‍वरी व्यक्‍ती म्हणून त्याने फक्‍त हे समजायचे होते. असे असताना कोणाही ख्रिश्‍चनाची स्वतःला यापासून मुक्‍त करून घेण्याची संधी व्यर्थ जात असे.” (दोज अबाऊट टू डाय, पृष्ठ १३७) जर अशाचप्रकारे परिक्षा घेतल्यास तुम्ही पूर्णपणे मूर्तीपूजेचा विरोध कराल का?

तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर राहाल का?

२२, २३. तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर का राहिले पाहिजे?

२२ स्पष्टपणे, ख्रिश्‍चनांनी सर्व प्रकारच्या मूर्तीपूजेपासून दूर राहिले पाहिजे. यहोवा अनन्य भक्‍तीची मागणी करतो. तीन विश्‍वासू इब्र्यांनी बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सरने बनविलेल्या भव्य मूर्तीची उपासना करण्याचा नकार देऊन उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. संदेष्टा यशयाने उद्धृत केलेल्या सार्वत्रिक न्यायालयीन खटल्यात, यहोवाच केवळ सत्य व जिवंत देव दाखविला आहे. आधीच्या त्याच्या ख्रिस्ती साक्षीदारांनी मूर्त्यांना अर्पिलेल्या पदार्थांना वर्ज्य करावयाचे होते. त्यांच्यातील अनेक निष्ठावंत जणांनी, दबावाला बळी पडून केवळ एकही मूर्तीपूजक कृत्य करून यहोवाला नकार दर्शवला नाही.

२३ तर मग तुम्ही व्यक्‍तिगतरित्या मूर्तीपूजेपासून दूर राहता का? तुम्ही देवाला अनन्य भक्‍ती देता का? तुम्ही यहोवाच्या सार्वभौमत्वास पाठिंबा देता का आणि त्याची सत्य व जिवंत देव म्हणून स्तुती करता का? असे असल्यास, मूर्तीपूजक कृत्यापासून सतत दूर राहण्याचा तुमचा दृढ निश्‍चय असला पाहिजे. परंतु हरतऱ्‍हेच्या मूर्तीपूजेपासून दूर राहण्यासाठी कोणते पुढील शास्त्रीय मुद्दे तुम्हाला मदत करतील?

तुमचे विचार काय आहेत?

▫ मूर्तीपूजा काय आहे?

▫ सर्व प्रकारच्या मूर्तीपूजेचा यहोवा का विरोध करतो?

▫ मूर्तीपूजेसंबंधी तीन इब्र्यांनी कोणती भूमिका घेतली होती?

▫ मूर्तीला अर्पिलेले पदार्थ जे खातात, यामुळे ते भूतांचे सहभागी कसे ठरतात?

▫ मूर्तीपूजेपासून आम्ही दूर का राहावे?

[२५ पानांवरील चित्रं]

तीन इब्र्यांनी त्यांच्या जीवाला धोका असतानाही मूर्तीपूजेत भाग घेतला नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा