देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४४-४५
योसेफ आपल्या भावांना माफ करतो
माफ करणं म्हणावं तितकं सोपं नसतं. खासकरून, जेव्हा एखादी व्यक्ती मुद्दामहून आपलं नुकसान करते, तेव्हा. पण योसेफला त्याच्या भावांनी वाईट वागणूक दिली असतानाही त्याने त्यांना माफ केलं. असं करण्यासाठी कोणत्या गोष्टीने योसेफला मदत केली असेल?
योसेफने बदला घेण्याऐवजी, त्यांना कसं माफ करता येईल हे पाहिलं.—स्तो ८६:५; लूक १७:३, ४
तो त्यांच्याविषयी मनात राग धरून बसला नाही, तर उदारपणे माफ करणाऱ्या यहोवाच्या मनोवृत्तीचं त्याने अनुकरण केलं.—मीख ७:१८, १९
माफ करण्याच्या बाबतीत मी यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?