देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक २३-२४ इतरांना क्षमा करायला तयार असा २४:३४ मी कोणाला क्षमा केली पाहिजे? क्षमा करायला तयार असण्याचा काय अर्थ होतो? (स्तो ८६:५) यहोवा आणि येशूचं पापी लोकांकडे लक्ष असतं. त्यांनी आपल्या जीवनात थोडादेखील चांगला बदल केला तर ते त्यांना दया दाखवण्यासाठी तयार असतात.