आझरबाइजान इथे प्रचारक आनंदाची बातमी हे माहितीपत्रक देताना
नमुना सादरीकरणं
जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-३३ पत्रिका)
प्रश्न: बऱ्याच लोकांना वाटतं, की देव हे जग चालवत आहे. पण जर ही गोष्ट खरी आहे, तर आज या जगात इतकं दुःख का आहे? भविष्यात देव जेव्हा या जगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवेल तेव्हा तो कोणकोणत्या गोष्टी करण्याचं अभिवचन देतो, हे मी तुम्हाला एका शास्त्रवचनातून दाखवलं तर चालेल का?
वचन: स्तो ३७:१०, ११
सादरता: आज या जगावर कोणाचं नियंत्रण आहे आणि भविष्यात आपल्यासाठी कोणती चांगली आशा आहे याविषयी या पत्रिकेत सांगितलं आहे.
सत्य शिकवा
प्रश्न: मानवांसाठी देवाचा काय उद्देश आहे?
वचन: स्तो ३७:२९
सत्य: मानवांनी या पृथ्वीवर नेहमीसाठी जगावं या उद्देशाने देवाने त्यांची निर्मिती केली आहे.
देवाकडून आनंदाची बातमी!
प्रश्न: या जगात आपल्याला आनंदाचा संदेश कुठून मिळू शकतो? [तुम्हाला आनंदाचा संदेश ऐकायला आवडेल का? हा व्हिडिओ दाखवा]
वचन: यश ५२:७
सादरता: या माहितीपत्रकात एक आनंदाचा संदेश देण्यात आला आहे आणि हा संदेश पवित्र शास्त्रावर आधारित आहे.
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.