घानामध्ये सुवार्ता सांगताना
नमुना सादरीकरणं
जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33)
प्रश्न: विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे खूप चांगल्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण माणसांनी त्यांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी देखील केला आहे. ज्यामुळे प्रदूषण, लोकांमध्ये हिंसा आणि मतभेद या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या समस्या कशा दूर होतील यावर तुम्ही विचार केला आहे का?
वचन: स्तो. ७२:१३, १४
सादरता: या जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे आणि आपला सृष्टीकर्ता मानवांच्या स्वार्थी राज्यामुळे झालेले वाईट परिणाम कसे काढून टाकेल ते या पत्रिकेत सांगितलं आहे.
सत्य शिकवा
प्रश्न: जगाचा अंत जवळ आहे का?
वचन: मत्त. २४:३, ७, १४
सत्य: आपण शेवटच्या काळात जगत आहोत हे आपल्याला पवित्रशास्त्रातील भविष्यवाणीमधून कळतं. पण आनंदाची बातमी ही आहे, की लवकरच चांगली परिस्थिती येणार आहे.
जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? (kt)
प्रश्न: आपल्यापैकी अनेक लोकांना असे प्रश्नं पडतात: देवाला खरोखरच आपली काळजी आहे का? युद्ध, दुःख कधी नाहीसे होतील का? जीवनात खरा आनंद कसा मिळवता येईल? आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील का?
वचन: योहान १७:१७
सादरता: या पत्रिकेत अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक आणि भरवशालायक उत्तरं दिली आहेत.
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.