७-१३ ऑगस्ट
यहेज्केल २८-३१
गीत २६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा मूर्तीपूजक राष्ट्राला प्रतिफळ देतो”: (१० मि.)
यहे २९:१८—बाबेलचा राजा नबुखदनेस्सरने सोर शहराला काबीज करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले, पण त्याला याचा काहीच मोबदला मिळाला नाही (इन्साइट-२ पृ. ११३६ परि. ४)
यहे २९:१९—राजा नबुखदनेस्सरला सोर शहराऐवजी मिसर देशाची संपत्ती मिळाली (इन्साइट-१ पृ. ६९८ परि. ५)
यहे २९:२०—बाबेलच्या सैनिकांनी यहोवासाठी काम केलं त्यामुळे यहोवाने त्यांना प्रतिफळ दिलं (सावध राहा!८६-E ११/८ पृ. २७ परि. ४-५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यहे २८:१२-१९—सोर शहराच्या शासकांनी निवडलेला मार्ग सैतानाने निवडलेल्या मार्गाला कसा सूचित करतो? (इन्साइट-२ पृ. ६०४ परि. ४-५)
यहे ३०:१३, १४—या वचनात दिलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज०३ ७/१ पृ. ३२ परि. १-३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे २९:१-१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. आपल्या सादरीकरणात सध्या चालू असलेल्या घडामोडींचा समावेश करण्याचं प्रचारकांना प्रोत्साहन द्या. तसंच, आनंदाची बातमी माहितीपत्रक सादर करताना, तुम्हाला आनंदाचा संदेश ऐकायला आवडेल का? हा व्हिडिओ जास्तीतजास्त दाखवण्याचंही प्रोत्साहन द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.) पर्याय म्हणून इयरबुकमधून शिकलेल्या धड्यांवर चर्चा करता येईल. (इयरबुक१७ पृ. ३५-३६ आणि पृष्ठ ३५ वरील चौकट)
“देवाला आवडणारे गुण विकसित करा—नम्रता”: (१० मि.) चर्चा. यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—गर्विष्ठपणा, हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम, परिशिष्ट पृ. २३७-२३९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५२ आणि प्रार्थना