इंडोनेशियातील दोन बहीणी देवाचे ऐका माहितीपत्रक सादर करताना
नमुना सादरीकरणं
दुःख कधी संपेल का? (T-34 पत्रिका)
प्रश्न: स्थानिक लोकांना चिंता वाटत असलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख केल्यानंतर असं विचारा: “दुःख कधी संपेल का, असा अनेकांच्या मनात प्रश्न येतो. याबद्दल देव आपल्याला काय आश्वासन देतो ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?”
वचन: प्रकटी २१:३, ४
सादरता: देवानं दिलेल्या वचनावर आपण भरवसा का ठेवू शकतो त्याची दोन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.
दुःख कधी संपेल का? (T-34 पत्रिका) शेवटचं पान
प्रश्न: जगात आपण खूप दुःख पाहतो. देव हे दुःख काढून का टाकत नाही, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे? पवित्र शास्त्रात या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं आहे.
वचन: रोम ५:१२
सादरता: देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाच्या धडा ८ मध्ये या प्रश्नाचं शास्त्रातील उत्तर दिलं आहे. या चित्रात दिसतं तशा जगात तुम्हाला राहायला आवडेल का? [पृष्ठ २-३ दाखवा आणि घरमालकाच्या उत्तरासाठी थांबा.]
देवाचे ऐका
प्रश्न: या चित्रात दिसणाऱ्या परिस्थितीत तुम्हाला राहायला आवडेल का? [पृष्ठे २-३ वरील चित्र दाखवा आणि उत्तरासाठी थांबा.]
वचन: यिर्म २९:११
सादरता: देवाचं ऐकून आपण एका सुंदर भविष्याचा आनंद कसा घेऊ शकतो, हे या माहितीपत्रकात सांगितलं आहे. [पृष्ठे ४-५ वर चर्चा करा.]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.