नमुना सादरीकरणे
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“आपल्यापैकी बरेच जण कधी ना कधी देवाला प्रार्थना करतात. देवाला आपल्या प्रार्थना कशा वाटतात? तो त्यांची कदर करतो का, की फक्त त्या ऐकाव्या लागतात म्हणून ऐकतो?” उत्तरासाठी थांबा. “माझ्याजवळ या विषयावर चांगली माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो का?” त्यानंतर घरमालकाची हरकत नसल्यास ऑक्टोबर - डिसेंबर टेहळणी बुरूज अंकातील शेवटचे पान दाखवा. पहिल्या प्रश्नाखाली दिलेल्या माहितीवर व तेथे दिलेल्या निदान एका शास्त्रवचनावर सोबत मिळून चर्चा करा. त्याला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा.
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं, हा प्रश्न आज अनेकांच्या मनात येतो. तुम्हाला काय वाटतं देव यासाठी जबाबदार आहे का? [उत्तरासाठी थांबा.] पवित्र शास्त्रात याबद्दल काय सांगण्यात आलं आहे ते मी तुम्हाला दाखवू का? [घरमालक तयार असल्यास याकोब १:१३ वाचा.] वाईट गोष्टी का घडतात आणि देव लवकरच सर्व वाईट गोष्टींचा आणि दुःखाचा कशा प्रकारे अंत करेल याबद्दल या नियतकालिकात सांगितलं आहे.”