नमुना सादरीकरण
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“देवाने दुष्टाईला आणि दुःखाला अजूनपर्यंत का राहू दिले आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] यावर आधारित तुम्हाला आवडेल अशी माहिती मी दाखवली तर चालेल का?” जर घरमालकाने आवड दाखवली तर ऑक्टोबर - डिसेंबर टेहळणी बुरूज पृष्ठ १८ वरील पहिल्या पोटमथळ्याची माहिती आणि तेथे उद्धृत केलेले वचन दोघांनी मिळून वाचा. घरमालकाला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“येशूबद्दल अनेक जणांचे वेगवेगळे विचार आहेत. पण तुमचे काय मत आहे? [उत्तरासाठी थांबा.] येशूच्या भूमिकेबद्दल बायबल काय म्हणते हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर योहान १७:३ वाचा.] हे नियतकालिक येशूबद्दलचे सत्य काय आहे, म्हणजे तो पृथ्वीवर कोठून आला, तो कसा जगला व तो का मरण पावला ते सांगते.”