वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१४ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ९/१४ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. नोव्हेंबर आणि डिसेंबर: बायबल नेमके काय शिकवते? किंवा दु:ख कधी संपेल का? ही पत्रिका.

◼ २०१५ सालच्या स्मारकविधीनंतरचे खास जाहीर भाषण ६ एप्रिलच्या आठवड्यात दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर सांगितला जाईल. या आठवड्यादरम्यान ज्या मंडळ्यांना विभागीय पर्यवेक्षक भेट देणार असतील किंवा ज्या मंडळ्यांचे संमेलन असेल त्या मंडळ्यांत खास भाषण त्याच्या पुढील आठवड्यात दिले जाईल. ६ एप्रिलच्या आधी कोणत्याही मंडळीत हे भाषण दिले जाऊ नये.

◼ सप्टेंबर पासून विभागीय पर्यवेक्षक मंडळ्यांमध्ये जे जाहीर भाषण देतील त्याचा विषय असेल: “देवाच्या ज्ञानाचा आपल्याला कसा फायदा होतो?”

◼ मंडळीच्या सचिवाने व सेवा पर्यवेक्षकाने मंडळीतील प्रत्येक सामान्य पायनियरच्या कार्याचा आढावा घ्यावा. त्यांपैकी काहींना तासांची मागणी पूर्ण करणे कठीण जात असेल, तर वडिलांनी त्यांना आवश्‍यक मदत पुरवण्याची व्यवस्था करावी.

◼ बहिष्कृत झालेले किंवा ज्यांनी मंडळीशी आपला संबंध तोडला आहे अशांपैकी ज्यांना मंडळीत पुन्हा येण्याची इच्छा आहे त्यांना भेटण्याच्या संबंधाने १ फेब्रुवारी १९९२ च्या टेहळणी बुरूजमधील पृष्ठे १७-१९ वर देण्यात आलेल्या सूचनांचे वडिलांनी पालन करावे अशी आठवण त्यांना करून देण्यात येत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा