नमुना सादरीकरणे
जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल?
घरमालकाला पत्रिका पाहता यावी म्हणून ती त्याला द्या आणि असे म्हणा: “नमस्ते. सर्व लोकांना एक महत्त्वाचा संदेश सांगण्यासाठी जगभरात एक मोहीम राबवली जात आहे. तो संदेश काय आहे ते या पत्रिकेत सांगितलंय.”
बंद असलेल्या घरांत तुम्ही ही पत्रिका टाकणार असाल, तर येणाऱ्या-जाणाऱ्यांना ती दिसणार नाही याची काळजी घ्या. तसेच, पत्रिकेची विनाकारण घडी घालू नका.
घरमालकाने आवड दाखवली किंवा त्याला बोलायची इच्छा असेल, तर पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या प्रश्नाबद्दल त्याचे मत विचारा. जीवनातील प्रश्नांची बायबलमध्ये काय उत्तरे दिली आहेत ती तुम्हाला माहीत करून घ्यायला आवडतील का? पत्रिका उघडा आणि स्तोत्र ११९:१४४, १६० काय म्हणते ते दाखवा. या पत्रिकेत एका वेबसाईटविषयी माहिती दिली आहे जी त्याला बायबलमधून समाधानकारक उत्तरे शोधण्यास मदत करू शकते. तुम्ही त्याला, बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओदेखील दाखवू शकता. निघण्याआधी, पत्रिकेच्या शेवटच्या पानावर असलेल्या तीन प्रश्नांकडे घरमालकाचे लक्ष वेधा आणि त्यांपैकी कोणत्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला त्याला आवडेल हे विचारा. त्या प्रश्नाचे बायबल काय उत्तर देते हे जाणून घेण्यासाठी jw.org या वेबसाईटचा उपयोग कसा करावा हे दाखवण्याकरता पुन्हा भेटण्याची योजना करा. तुम्ही पुन्हा भेटता तेव्हा विचारलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर देणाऱ्या पत्रिकेवर चर्चा करा. ही पत्रिका तुम्हाला प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके या टॅबखाली पाहायला मिळेल. हे तुमच्या भाषेत उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेतील ऑनलाईन लायब्ररी दाखवू शकता किंवा तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या छापील प्रकाशनातून या उत्तराची चर्चा करू शकता.
तुम्ही तुमच्या अधिवेशनाची निमंत्रणपत्रिका देत असाल, तर या पत्रिकेसोबतच तीही द्या व असे म्हणा, “त्या पत्रिकेसोबतच एक निमंत्रणपत्रिकाही तुम्हाला दिली आहे. ते निमंत्रण एका कार्यक्रमाबद्दलचे आहे आणि त्यासाठी प्रवेश मोफत असेल.”
टेहळणी जुलै ते सप्टेंबर
शनिवारी-रविवारी जेथे शक्य आहे तेथे टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करताना असे म्हणा: “या पत्रिकेसोबतच आम्ही हे अलिकडील नियतकालिकही देतोय, तुम्हाला ते वाचायला आवडेल का? नियतकालिकाचा विषय आहे, धुम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन.”