ऑगस्ट ११ च्या सप्ताहाचा आराखडा
११ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ११ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
यहोवाची इच्छा पाठ २६-२८ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना ७-९ (१० मि.)
क्र. १: गणना ९:९-२३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आध्यात्मिक रीत्या निरोगी झाल्यामुळे चिरकालिक फायदे मिळतात—बायबल विषय २२क (५ मि.)
क्र. ३: आखान—देवाच्या मालकीच्या गोष्टींची चोरी केल्याने वाईट परिणाम होतात—यहो ७:४-२६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: “१९१४-२०१४: राज्य शासनाला शंभर वर्षे पूर्ण!” चर्चा. या पानाच्या वर जो परिच्छेद दिला आहे तो वाचा. या महिन्याच्या सेवा सभेत राज्याच्या विषयावर भर देण्यात येईल. क्षेत्र सेवेसाठी ज्या योजना केल्या आहेत त्या थोडक्यात सांगा.
१० मि: “नवीन वेबसाईट पत्रिकेचा वापर करा.” पत्रिकेतील माहितीवर चर्चा करा. असे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक एका व्यक्तीला पत्रिका देत आहे आणि त्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून तिला jw.org ही वेबसाईट दाखवत आहे.
१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आत्मविश्वासाने राज्याबद्दल बोला.” चर्चा. पुढील दृश्य दाखवणारे एक प्रात्यक्षिक सादर करा: एक प्रचारक दुकानात रांगेत उभा आहे. त्याच्या शेजारी असलेली व्यक्ती वृत्तपत्रातील बातमी वाचते आणि म्हणते: “काय अवस्था झालीय या जगाची! प्रत्येकाला वाटतं मी सुधारू शकतो, पण कसलं काय? जग आणखीनच बिघडत चाललंय.” प्रचारक स्वतःशी बोलतो: ‘मी काहीतरी बोललं पाहिजे. मी या व्यक्तीला राज्याबद्दल सांगितलंच पाहिजे.’ प्रचारक म्हणतो: “हो ना. जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चाललीय. याच विषयाबद्दल माझ्याकडं एक पत्रिका आहे. तुम्हाला ती दिली तर चालेल का? यामध्ये ज्या वेबसाईटविषयी सांगितलं आहे, त्यावर मला जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.” प्रचारक पत्रिकेतील एका मुद्द्यावर बोलतो आणि ती व्यक्ती आवड दाखवते.
गीत ४७ आणि प्रार्थना