नमुना सादरीकरणे
एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“जगात होणाऱ्या वाईट गोष्टींमागं सैतानाचा हात आहे असं अनेकांना वाटतं. पण त्यांच्या मनात असे प्रश्न येतात: ‘सैतान मुळात आला कोठून? देवानं त्याला बनवलं का?’ तुम्हाला काय वाटतं? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत काही माहिती मी तुम्हाला सांगितली तर चालेल का?” घरमालकाची हरकत नसल्यास, एप्रिल - जून या टेहळणी बुरूज अंकातील शेवटचे पान दाखवा आणि त्यातील पहिल्या परिच्छेदावर व तेथे दिलेल्या वचनांवर चर्चा करा. ते नियतकालिक घरमालकाला द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी जानेवारी - जून
“कुटुंबात एखादं अपंग मूल असतं तेव्हा त्याला वाढवणं सोपं नसतं. आईवडील या समस्येचा सामना कसा करू शकतात? [उत्तरासाठी थांबा.] भविष्यात राखून ठेवलेल्या एका उत्तम आशेबद्दलचं एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास प्रकटीकरण २१:३, ४ वाचा आणि त्याला पृष्ठ १० वरील लेख दाखवा.] या वचनात भविष्यात आपल्याला काय पक्की आशा आहे ते सांगण्यात आलं असलं तरी आत्ता पालक या परिस्थितीला यशस्वीपणे कसं तोंड देऊ शकतात याबद्दल काही व्यावहारिक तोडगे या लेखात देण्यात आले आहेत.”