नियतकालिके कशी सादर कराल?
टेहळणी जानेवारी - मार्च
“आज अनेक लोक वाईट कामे करतात. आपल्याला या जुलूम व अन्यायापासून सुटका कधी मिळू शकते का? [उत्तरासाठी थांबा.] जे अन्याय व जुलूम सहन करतात त्यांना देव काय अभिवचन देतो, याबद्दल शास्त्रवचनात काय सांगितले आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर स्तोत्र ७२:१२, १४ वाचा.] लोक वाईट कामे का करतात आणि देव लवकरच दुष्टाईचा अंत कसा करणार आहे हे या नियतकालिकात सांगितले आहे.”
टेहळणी एप्रिल - जून
“आपल्या हालअपेष्टांचा व समस्यांचा देवाला काही फरक पडतो का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तुम्हालाही तसेच वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत पवित्र शास्त्र आपल्याला काय आश्वासन देते हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने होकार दिल्यास स्तोत्र ३४:१८ वाचा.] ९ पृष्ठावरील लेखात, कुचकामी, अतोनात दुःख व अपराधीपण यासारख्या नकारात्मक भावनांवर मात करण्यास देव आपली मदत कशी करतो हे सांगण्यात आले आहे.”