वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१३ पृ. ११-१२
  • नियमन मंडळाकडून पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियमन मंडळाकडून पत्र
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • प्रिय बंधुभगिनींनो:
आमची राज्य सेवा—२०१३
km ३/१३ पृ. ११-१२

नियमन मंडळाकडून पत्र

प्रिय बंधुभगिनींनो:

आपला स्वर्गीय पिता यहोवा, प्रेमाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे बायबल म्हणते: “देव प्रीती आहे.” (१ योहा. ४:८) यहोवा देव सर्वशक्‍तिमान असला तरी त्याचे वचन बायबल “देव शक्‍ती आहे” असे म्हणत नाही. तो प्रेमानेच त्याचा अधिकार गाजवतो. म्हणूनच आपण त्याच्याकडे आकर्षित होतो.

देव आपल्यावर त्याची सेवा करण्याची बळजबरी करत नाही ही किती आनंदाची गोष्ट आहे. तो हुकूमशाह नाही. आपण यहोवावर प्रेम करून मनापासून त्याची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. असे जेव्हा आपण करतो तेव्हा हे दाखवून देतो की आपल्याला त्याचे राज्य मान्य आहे कारण त्याची राज्य करण्याची पद्धत योग्य व प्रेमळ आहे. मानव इतिहासाच्या सुरुवातीपासूनच हे स्पष्ट दिसत आहे.

यहोवाने आदाम आणि हव्वा यांना त्याची सेवा करण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांना निवड करण्याची संधी दिली. यहोवावर त्यांचे खरेच प्रेम असते आणि त्याने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याची त्यांना कदर असती तर सैतान त्यांना यहोवाविरुद्ध बंडाळी करण्यास प्रवृत्त करत होता तेव्हा त्यांनी त्याचा प्रतिकार केला असता.

नंतर, मोशेने इस्राएल लोकांना दिलेल्या शेवटल्या भाषणात असे सांगितले: “पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत.” (अनु. ३०:१५) लोकांना जीवन जगण्याचे स्वातंत्र्य होते. यहोशवादेखील इस्राएली लोकांना म्हणाला: “यहोवाची सेवा करणे हे तुम्हाला वाईट वाटत असेल तर ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या.” लोकांनी त्याला उत्तर दिले: “अन्य देवांची सेवा करण्यास आम्ही यहोवाला सोडून द्यावे हे आम्हापासून दूरच असो!” (यहो. २४:१५, १६, पं.र.भा.) आजही आपल्याला असेच वाटते कारण आपले यहोवावर प्रेम आहे. त्याला नाकारण्याचा “विचारसुद्धा” आपण करू शकत नाही.

खरे ख्रिस्ती या नात्याने इच्छास्वातंत्र्यात काय समाविष्ट आहे हे आपल्याला माहीत आहे. मंडळीच्या वडिलांना सल्ला आणि ताडन देण्याचा अधिकार असला तरी ते इतरांवर वर्चस्व गाजवत नाहीत. प्रेषित पौलाने लिहिले: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.”—२ करिंथ. १:२४.

एखादी गोष्ट जबरदस्तीने करण्याऐवजी आपण ती मनापासून करू इच्छितो तेव्हा आपल्याला किती समाधान मिळते! यहोवा आपल्याला जे योग्य आहे ते त्याच्या प्रेमापोटी करण्याचे उत्तेजन देतो. असे करणे महत्त्वाचे का आहे हे पौलाने आपल्या प्रेरित वचनात सांगितले: “मी आपले सर्व धन अन्‍नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.”—१ करिंथ. १३:३.

आज आपले लाखो बंधुभगिनी त्याची सेवा अगदी मनापासून करतात हे पाहून यहोवाला किती आनंद होत असेल!

आणि यहोवाचे त्याच्या सर्व सेवकांवर, ज्यात तुम्हा चिमुकल्यांचा आणि तरुणांचाही समावेश होतो, प्रेम आहे. कारण तुम्ही, जग देत असलेल्या सुखचैनीच्या मोहात न पडता यहोवावर मनापासून प्रेम करत आहात. आणि आमचेही तुमच्यावर मनापासून प्रेम आहे ही खातरी बाळगा.—लूक १२:४२, ४३.

यहोवावर प्रेम असल्यामुळेच, मागील वर्षी तुम्ही बंधुभगिनींनी आणि तरुणांनी सुवार्ता सांगण्यासाठी १,७४,८६,९७,४४७ तास खर्च केले. प्रेमामुळेच जगभरातील ७७,८२,३४६ प्रचारकांनी क्षेत्र सेवेत भाग घेतला. २,६८,७७७ नवोदितांनी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. या नवोदितांमध्ये बरेच तरुणही समाविष्ट आहेत. म्हणजे, प्रत्येक आठवडी ५,१६८ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. यामुळे आमचे मन खूपच भरून आले!

या शेवटल्या काळात, देवाच्या लोकांना अनेक समस्या, अडचणी, छळ, आजारपण यांना तोंड द्यावे लागते आणि काहींना वृद्धत्वाचा सामना करावा लागतो. पण आपण “माघार घेणाऱ्‍यांपैकी” किंवा “धैर्य” सोडणाऱ्‍यांपैकी नाही. आमचे तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.—इब्री १०:३९; २ करिंथ. ४:१६.

आपले बांधव,

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा